सामान्यतः असे मानले जाते की, ”आहारातील कोलेस्ट्रॉल रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी वाढवते आणि परिणामी हृदयविकाराचा धोका संभवतो.” परंतु अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, ”आहारातील कोलेस्ट्रॉलचा हृदयविकाराच्या वाढत्या धोक्याशी काही संबंध नाही. खरे तर यकृताच्या जास्त उत्पादनाचा परिणाम रक्तातील कोलेस्ट्रॉलवर दिसून येतो. सोप्या शब्दांत सांगायचे, तर तुम्ही दिवसाला एक अंडे खात असाल, तर ते तुमच्या कोलेस्ट्रॉलची संख्या वाढवेल, असा विचार करून काळजी करण्याची गरज नाही.
याबाबत दिल्लीच्या फोर्टिस एस्कॉर्ट्स हार्ट इन्स्टिट्यूट, इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजी, प्रधान संचालक डॉ. निशिथ चंद्रा यांच्याशी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने संवाद साधला. त्यांनी सांगितले, ”आहारातील कोलेस्ट्रॉल म्हणजे तुम्ही सेवन करीत असलेले कोलेस्ट्रॉलचे प्रमाण आणि दुसरे म्हणजे रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण. आहारातील कोलेस्ट्रॉल तुमच्या रक्तातील एकूण कोलेस्ट्रॉलच्या संख्येपैकी एक-तृतियांश योगदान देते. उर्वरित दोन-तृतियांश यकृताद्वारे तयार केले जाते. आता ही पातळी वाढली, तर ती यकृताच्या जास्त उत्पादनामुळे. म्हणूनच माझे काही रुग्ण मला म्हणतात, “डॉक्टर, मी फॅट्सचे पदार्थ खात नाही. तरीही माझ्या रक्तातील कोलेस्ट्रॉल जास्त आहे.”
”आहारातील कोलेस्ट्रॉल हे प्राण्यांवर आधारित अन्न, सामान्यतः मांस, अंडी, लोणी व पूर्ण फॅटसयुक्त दुग्धजन्य पदार्थांपासून मिळते. ते तुम्हाला प्रक्रिया केलेले मांस, सॉसेज, बर्गर आणि अगदी बेक केलेल्या वस्तूंमध्येही भरपूर प्रमाणात मिळेल. परंतु, जर तुम्हाला कॉमोरबिडीटीज (इतर आजार) असतील किंवा आनुवांशिकदृष्ट्या जास्त कोलेस्ट्रॉलचा धोका असेल किंवा तुमचे यकृत जास्त पातळीमध्ये कोलेस्ट्रॉल निर्माण करीत असेल, तर चांगल्या आरोग्यासाठी ते माफक प्रमाणात सेवन केले पाहिजे.”
आहारातील कोलेस्ट्रॉलबद्दल मिथक/गैरसमज काय आहेत?
पहिला समज असा आहे, ”नट्सपासून म्हणजे जे सुका मेवा म्हणून आपण जे पदार्थ सेवन करतो, त्यात कोलेस्ट्रॉल असते, असा एक समज आहे.” पण यापैकी कशामध्येच कोलेस्ट्रॉल नाही. दूध, लोणी, चीज व अंडी यांसारख्या सर्व प्राणी आधारित उत्पादनांमध्ये कोलेस्ट्रॉल असते. शेंगदाणे आणि काजूमध्येही कोलेस्ट्रॉलचे प्रमाण शून्य असते. खरे तर, काजू खराब कोलेस्ट्रॉल कमी करू शकतात त्याचबरोबर त्यांच्यातील उच्च मॅग्नेशियम तत्त्वांमुळे हृदयरोगही टाळू शकतात. मॅग्नेशियम हे इस्केमिक हृदयरोग (Ischemic Heart )आणि स्ट्रोकची शक्यता कमी करण्यासाठी ओळखले जातात,” असे डॉ. निशिथ चंद्रा सांगतात.
दुसरा समज असा आहे, “अंडी हृदयासाठी वाईट असतात.” खरे तर, एक अंड्यातील पिवळा बलक हृदयासाठी ठीक आहे. अंड्यातील पिवळ्या बलकामध्ये १८० मिलिग्रॅम चांगले कोलेस्ट्रॉल असते. अनेक अभ्यासांतून असे दिसून आले आहे की, ते खाल्ल्याने धोका वाढत नाही आणि त्यापैकी काही अंडी तुमच्या लिपोप्रोटीन प्रोफाइलमध्ये (Lipoprotein Profile) सुधारणा करण्यास, एचडीएल वाढवण्यास, एलडीएल कमी करून धोका कमी करण्यास मदत करतात.
आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन किती प्रमाणात करू शकतो?
तुमच्या आरोग्याशी निगडित सर्व संख्या आणि मार्कर सामान्य श्रेणीत आहेत, असे गृहीत धरून तुम्ही आहारातील कोलेस्ट्रॉल दररोज १०० ते २०० मिलिग्रॅम सुरक्षितपणे घेऊ शकता. परंतु, जर ते जास्त असेल, तर आहारातील कोलेस्ट्रॉलचे सेवन कमी करा. लक्षात ठेवा, आपण मध्यम प्रमाणात खाणे आवश्यक आहे. याशिवाय, कोलेस्ट्रॉल असलेल्या काही प्राण्यांच्या खाद्यपदार्थांमध्येही सॅच्युरेडेट फॅट्सचे (saturated fat) प्रमाण जास्त असते. याला अपवाद फक्त अंडी आणि शेलफिश आहेत.
हेही वाचा – National Nutrition Week 2023 : आहारातील सूक्ष्म पोषक तत्वांचे महत्त्व समजून घ्या
कोलेस्ट्रॉल कशामुळे ट्रिगर होते?
जेव्हा तुमच्याकडे कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन (cortisol and adrenaline)सारख्या तणाव संप्रेरकांची (stress hormones)
संख्या जास्त असते, तेव्हा ती रक्तातील साखर वाढवतात आणि शरीरात दाह निर्माण करतात. कालांतराने यामुळे तुमचे यकृत अधिक कोलेस्ट्रॉल बाहेर टाकू शकते.
गर्भनिरोधक गोळ्या, रेटिनॉइड्स (Retinoids), कॉर्टिकोस्टिरॉईड्स (corticosteroids), अँटीव्हायरल, अँटीकॉनव्हलसंट्स (anticonvulsants) यांसारखी काही औषधेदेखील तुमचे कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात. तुमच्या थायरॉइड ग्रंथींद्वारे तयार होणारे हार्मोन्स तुमच्या शरीराला आवश्यक नसलेले अतिरिक्त कोलेस्ट्रॉल काढून टाकतात. त्यामुळे जेव्हा तुम्हाला अकार्यक्षम थायरॉईड किंवा हायपोथायरॉइडिझमचा (underactive thyroid or hypothyroidism) त्रास होतो, तेव्हा तुमचे एकूण आणि एलडीएल कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढते.
टाईप-२ मधुमेह हा उच्च रक्त शर्कराद्वारे वैशिष्ट्यीकृत केला आहे, जे स्वतःला कोलेस्ट्रॉलचे रेणू, कमी घनता लिपोप्रोटीनच्या (LDL) प्रथिनांशी जोडतात, जे हृदयविकाराचा धोका वाढवतात. कारण- कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईनसारखे तणाव संप्रेरक हे बदल घडवून आणतात; ज्यामुळे रक्तातील साखरेची वाढ आणि दाह निर्माण होऊ शकतो. कालांतराने यामुळे तुमचे यकृत अधिक कोलेस्टेरॉल आणि रक्तातील फॅट्स किंवा ट्रायग्लिसराइड्स (triglycerides) बाहेर टाकू शकते.
तुमची बैठी जीवनशैली असल्यास आणि बराच वेळ बसून राहिल्यास, हानिकारक LDL कोलेस्ट्रॉलला तटस्थ करणारे आणि चांगले कोलेस्ट्रॉल किंवा HDL (उच्च घनता लिपोप्रोटीन) वाढविणारे एन्झाइम ९५ टक्क्यांनी कमी होते. मग लठ्ठपणासारख्या समस्या आहेत; ज्याचा परिणाम आपल्या शरीराच्या कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्ससह (triglycerides) लिपोप्रोटीन (lipoproteins) बनवण्याच्या आणि व्यवस्थापित करण्याच्या पद्धतीवर होतो.
खरे तर जेव्हा शरीरात जळजळ होते तेव्हा कोलेस्ट्रॉलची सामान्य पातळीदेखील प्लेक्स (plaques) तयार करू शकते. जीवनशैलीतील आजारांमुळे हृदयातील एंडोथेलियम (endothelium) किंवा रक्तवाहिन्यांचा बाह्य थर नष्ट होतो. जेव्हा रक्त दुरुस्त करण्यासाठी ते आत शिरते आणि कोलेस्ट्रॉलच्या साठ्यामुळे गुठळ्या होऊन मोठा ब्लॉक तयार होतो. त्यामुळे हृदयविकाराचा झटका येतो.
हेही वाचा – National Nutrition Week 2023: प्रजननासाठी उपचार घेताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात, डॉक्टरांकडून जाणून घ्या…
कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी निर्माण करण्याची आनुवांशिक प्रवृत्ती आहे का, हे कसे कळेल?
त्यासाठी तुम्हाला दर सहा महिन्यांनी लिपिड प्रोफाइल (lipid profile)आणि लिव्हर फंक्शन टेस्ट (liver function test) करावी लागेल. त्यामुळे हृदयरोगतज्ज्ञांना तुमच्या यकृताच्या कार्याविषयी योग्य कल्पना मिळते आणि ते अवयव जास्त कोलेस्ट्रॉल निर्माण करीत आहेत की नाही हे ठरवतात. मग डॉक्टर तुम्हाला ‘स्टॅटिन’ देतील. परंतु, स्वत:च मनाने हे औषध घेऊ नका कारण- ‘स्टॅटिन’ काउंटरवर सहज उपलब्ध आहेत.
मध्यम ॲरोबिक व्यायाम, अधिक फळे व हिरव्या पालेभाज्या खाणे, ऑलिव्ह ऑइल आणि प्रथिने समृद्ध असलेल्या मेडिरटेरिअन आहाराचे (Mediterranean diet) अंदाजे सेवन करणे आणि योग्य झोपेची खात्री करून तुम्ही प्लेक तयार करणे कमी करू शकता.