सध्या देशभरात गुलाबी थंडीची चाहूल लागली आहे. उन्हाळा आणि पावसाळ्यापेक्षा गुलाबी थंडी तुम्हाला हवीहवीशी वाटत असली तरीही ती अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते बरे का? या हिवाळ्याच्या दिवसांत वेगवेगळे आजार डोके वर काढतात. हिवाळ्यामध्ये आरोग्याच्या (Health) छोट्या-मोठ्या तक्रारी उदभवतात. हिवाळ्यात साधारणतः सामान्य सर्दी, फ्लू (Flu) यांसारख्या संसर्गजन्य परिस्थितींच्या प्रकरणांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. फ्लूचा प्रादुर्भाव वर्षभर दिसून येतो, त्यात फ्लूचे विषाणू हिवाळ्यात सर्वाधिक आढळतात.
हिवाळ्यात फ्लू किंवा इतर संसर्ग झपाट्याने पसरतात. सामान्य सर्दीपेक्षा वेगळी कधीही होणारी सर्दी, फ्लूचा प्रादुर्भाव सामान्यपणे शरद ऋतू आणि हिवाळ्यात दिसून येतो. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी चांगली प्रतिकारशक्ती असणे आवश्यक आहे. पण आपल्या सर्वांना हिवाळ्याच्या दिवसांतच सर्दी आणि फ्लू का होतो? तुम्हाला माहीत आहे का, याच विषयावर द इंडियन एक्स्प्रेसने माहिती दिली असल्याचे वृत्त आहे. ती सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ.
(हे ही वाचा : सकाळच्या नाश्त्यात अंड्यांऐवजी दररोज मूठभर काजू खाल्ल्याने हृदय राहील निरोगी, ठणठणीत? तज्ज्ञांचे मत जाणून घ्या…)
थंडीच्या दिवसांत शरीराच्या अंतर्गत अवयवांचे तापमान राखण्यासाठी अनेक गोष्टी बदलतात. जर शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्ताभिसरण स्थिर असेल, तर थंडीची भावना सामान्य असते. परंतु, काही लोकांना जास्त थंडी जाणवते; याचे कारण असे आहे की, शरीर आपले तापमान स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करते. सर्दी पहिल्यांदा नाकाला जाणवते. हिवाळा सुरू होताच, काही लोकांना सर्दी सुरू होते; विशेषत: जेव्हा त्यांना घराबाहेर पडावे लागते. घरातून बाहेर पडताच सगळी सर्दी नाकातोंडात जाते.
आता प्रथमच, हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासाने आपल्या शरीराची स्थिती आणि सामान्य प्रतिकारशक्तीची पातळी विचारात न घेता, हिवाळ्यात आपल्याला सर्दी आणि फ्लू का होते याचे अचूक उत्तर दिले आहे. अभ्यासाचे प्रमुख लेखक, सहयोगी प्राध्यापक डॉ. बेंजामिन ब्लेअर यांनी सांगितले, “आपल्या नाकात इन्फेक्शन आणि अॅलर्जी पसरवणाऱ्या घटकांपासून बचावण्यासाठी एक आवरण असतं. बाहेरील तापमान कमी असल्यानं नाकातील तापमानही चार डिग्रीने कमी होतं. या आवरणात विषाणू आणि अॅलर्जी पसरवणारे घटक अडकून राहतात; ज्यामुळे व्हायरल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते.”
हिवाळ्यात आपली इम्युनिटी कमी होते. त्यामुळे जीवाणूंचा सहजपणे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. हार्वर्ड मेडिकल स्कूलमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, थंड हवामानात प्रतिकारशक्ती कमी होते; ज्यामुळे विषाणू नाकाच्या पेशींना चिकटून राहतात आणि त्यामुळे संसर्ग होतो.
(हे ही वाचा : शाहिद कपूरची बायको मीरानं थंडीत कोरड्या पडणाऱ्या त्वचेसाठी सांगितला १ उपाय, सौंदर्य तज्ज्ञ म्हणतात, “सुंदर त्वचेसाठी…” )
थंडीच्या दिवसांत वातावरणात उडणारे परागकण नाकावाटे शरीरात जाऊन अॅलर्जी होण्याची शक्यता असते. अॅलर्जीमुळेही अंगदुखी, सर्दी, खोकला व ताप येण्याची शक्यता असते. ऋतू बदलताना तापमानात होत असलेल्या चढ-उतारामुळे विषाणूवाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होते आणि त्यामुळे साहजिकच संसर्गाची शक्यताही वाढते. पण, हिवाळा स्थिरावल्यावर जो सर्दी-खोकला होतो, त्यासाठी विषाणूसंसर्ग हे कारण सहसा नसते. हिवाळ्यात हवा थंड झाल्याने जमिनीलगतच्या हवेच्या थरात अनेक धूलिकण, परागकण अडकून बसतात. वैज्ञानिक परिभाषेत त्याला धुरके म्हणतात; जे धूर आणि धुके यांचे मिश्रण असते. अशा हवेत धुळीची घनता वाढलेली असते. या धूलिकणांच्या, प्रदूषक घटकांच्या अॅलर्जीमुळे या काळात सर्दी होते.
हिवाळ्यात फिट आणि आरोग्य निरोगी राहण्यासाठी आहारापासून ते व्यायामापर्यंत सर्व दृष्टींनी स्वत:ची योग्य ती काळजी घ्यायला हवी. आपल्याला फळे, भाज्यांचा आहारात समावेश करायला हवा. तज्ज्ञांच्या मते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी व्हिटॅमिन-बी ६, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-ई व झिंकची गरज असते. झिंक सर्दी आणि फ्लूच्या लक्षणांपासूनही आराम देते.
(टीप : अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)