Why Diabetics Should Not To Wear Flip Flops : स्लीपर्स आणि चप्पलमध्ये सध्या ट्रेंडमध्ये आहे ती ‘फ्लिप फ्लॉप’ चप्पल. बिचवेअर म्हणून तरुण मंडळींमध्ये फ्लिप-फ्लॉपची वेगळीच क्रेज आहे. पण, आता रोजच्या वापरासाठी या फ्लिप फ्लॉपचा उपयोग अनेक जण करू लागले आहेत. कार्टून्स, इमोजी, काही मजेशीर मजकूर लिहिलेले फ्लिप फ्लॉप बाजारात विविध रंगांत आणि स्टाईलमध्ये उपल्बध असतात. पण, तज्ज्ञांनी मधुमेही असलेल्यांना मात्र या फॅन्सी चप्पल घालणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. नक्की काय आहे यामागचे कारण, चला जाणून घेऊ…
मधुमेह असलेल्या लोकांनी फ्लिप-फ्लॉप किंवा ओपन टोज (open-toe) चप्पल घालणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, फ्लिप-फ्लॉपवर असणाऱ्या या पट्ट्या पायाच्या काही भागांवर दाब देऊ शकतात, ज्यामुळे फोड येऊ शकतात, ज्यावर मधुमेहींमध्ये उपचार करणे कठीण असू शकते; त्यामुळे फ्लिप-फ्लॉप वापरू नये, कारण बहुतेक मधुमेहींना डायबेटिक पेरिफेरल न्यूरोपॅथी (diabetic peripheral neuropathy) असते, ज्यामध्ये पाय सुन्न होणे किंवा मुंग्या येणे अशी लक्षणे दिसून येतात. पायाच्या पहिल्या बोटाच्या आणि दुसऱ्या बोटाच्या दरम्यानच्या पट्ट्यांमुळे घर्षण किंवा जखम होऊ शकते; असे बंगळुरूच्या इंदिरानगरचे एचओडी-पोडियाट्री, केआयईआर, डॉक्टर बी. पवन म्हणाले आहेत.
फ्लिप-फ्लॉपमुळे रेती आणि लहान दगड सहज आतमध्ये जातात…
याव्यतिरिक्त, फ्लिप फ्लॉपमध्ये लहान बोटांना नखे येणे ही एक सामान्य गुंतागूंत आहे. कारण शरीर स्विंग फेजमध्ये असताना हे फ्लिप-फ्लॉप पकडण्याचा प्रयत्न करते; असे डॉक्टर पवन म्हणाले आहेत.
तर मधुमेहींनी कोणत्या प्रकारच्या चप्पल निवडाव्या किंवा घालाव्यात?
मधुमेही असलेल्या लोकांनी टाचांच्या भागाला पट्टा असलेली चप्पल निवडावी; जो स्विंग फेज दरम्यान या फ्लोटरला जागी ठेवतो. चप्पलच्या सीमलेस इनर्स, वाईड टो बॉक्स, मऊ, टिकाऊ आतील सोल बघणे आवश्यक असते, असे डॉक्टर पवन म्हणाले आहेत.
तज्ज्ञ असेही सुचवतात की, चांगला आधार आणि फिटिंग लेस असलेले शूज घाला…
प्रो टीप : मधुमेह असलेल्या लोकांना दिवस संपत असताना शूज वापरण्याचा सल्ला दिला जातो, कारण त्या वेळी तुमचे पाय थोडे सुजण्याची शक्यता असते. असे मानले जाते की, जर त्या वेळी शूज आरामदायी असतील तर ते दिवसाच्या उर्वरित वेळेतदेखील आरामदायी राहिले पाहिजेत.
चांगला सपोर्ट मिळणारे शूज खरेदी करा. मधुमेही म्हणून तुमच्या गरजा लक्षात ठेवून पोडियाट्रिस्ट किंवा पायाच्या डॉक्टरांशी बोलणेदेखील उचित ठरेल, असा डॉक्टरांनी सल्ला दिला आहे.