Heart Attack In Winter : गेल्या काही वर्षांमध्ये हृदयविकार आणि हृदयविकाराचा झटका येणाऱ्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ दिसून येत आहे. खरं तर हृदयविकाराचा झटका कोणालाही येऊ शकतो. त्यासाठी वेळीच लक्षणे ओळखून स्वत: सावध राहणे खूप गरजेचे आहे.
ऋतूमानानुसार हृदयाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? म्हणजेच एखाद्या ऋतूमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण जास्त असू शकते? याविषयी द इंडियन एक्स्प्रेसनी दिल्लीच्या मॅक्स हॉस्पिटलचे कार्डियाक सायन्सेसचे चेअरमन डॉ. बलबिर सिंह यांच्या हवाल्याने सविस्तर माहिती सांगितली आहे.

डॉ. बलबिर सिंह सांगतात, “हिवाळ्यात सर्वात जास्त हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका असतो. हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होणे, एखादा व्हायरस येणे फक्त एवढेच नसते, तर हिवाळ्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोकासुद्धा वाढू शकतो. हृदयविकाराचा झटका किंवा कोणत्याही आजाराबाबत काळजी घेणे, हिवाळ्यात खूप जास्त गरजेचे आहे. अनेक अभ्यासातून असे समोर आले आहे की, या ऋतूमध्ये हृदयविकाराचा झटका, स्ट्रोक, हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधित आजारांमध्ये वाढ दिसून येते.”

nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Cardamom benefit in winter Wonderful Cardamom Benefits You Should Definitely Know About
हिवाळ्यात वेलची खाण्याचे आश्चर्यकारक फायदे; आहारात समावेश करण्याआधी नक्की वाचा
The minimum temperature in Mumbai is decreasing and the winter season is beginning Mumbai print news
मुंबईत थंडीची चाहुल
Ginger benefits in winter This winter superfood will help keep the body warm and healthy
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या
Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात

हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाण का वाढते?

डॉक्टरांच्या मते, “हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका येण्यामागील एक कारण म्हणजे आपल्या शरीराचे तापमान कमी होणे. हिवाळ्यात आपल्या शरीरात जैविक बदल घडून येतात आणि रक्तवाहिन्या लहान होतात. अशावेळी शरीरात रक्त पुरवताना हृदयावर ताण येतो, त्यामुळे रक्तदाबाची पातळी वाढते.”
पुढे डॉक्टर सांगतात, “हिवाळ्यात तापमानात बदल जाणवतो, अशावेळी थंडीच्या दिवसांमध्ये तुमच्या शरीराला गरम ठेवण्यासाठी निर्माण करणारी उष्णता तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते, ज्यामुळे तुमच्या रक्तवाहिन्या खराब होऊ शकतात.”

हेही वाचा : Sleep in Winter : हिवाळ्यात जास्त झोप का लागते? झोपेच्या सवयीवर कसा परिणाम होतो? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात.. 

काही लोकांना आधीच हृदयाशी संबंधित आजार असतात. अशा लोकांना हिवाळ्यात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. हिवाळ्यात तापमान संतुलित ठेवण्यासाठी हृदय निरोगी राहणे गरजेचे आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
डॉ. सिंह सांगतात, “जर हृदय नीट काम करत नसेल, तर अशा रुग्णांच्या फुफ्फुसात द्रव पदार्थ साठू शकतो; ज्यामुळे व्यक्तीला श्वास घेणे कठीण होते. याशिवाय हिवाळ्यात अनेक लोकांना श्वास घेण्यास त्रास जाणवतो. त्यामुळे जास्तीत जास्त ऑक्सिजन मिळवताना हृदयावर ताण पडतो.”

हिवाळ्यात हृदयाची काळजी कशी घ्यायची?

हिवाळ्यात स्वेटर , जॅकेट आणि गरम कपडे घाला आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवा.
हिवाळ्यात खूप जास्त प्रमाणात मद्यपान किंवा धूम्रपान करू नका.
हिवाळ्यात संतुलित आहार घ्या. हिवाळ्यात अनेक जण कोलेस्ट्रॉलयुक्त आहार घेतात, पण यामुळे तुमच्या हृदयाच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.
भरपूर व्यायाम करा. धावणे, सायकल चालविणे इत्यादी गोष्टी करा. तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कामाचा ताण कमी करा आणि चांगली झोप घ्या.
जर तुम्हाला मधुमेह किंवा उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर तुम्ही अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.
नियमित आरोग्याची तपासणी करा.