थंडीमध्ये भूक वाढण्यामागे शास्त्रीय-सांस्कृतिक व मानसिक कारणे आहेत. शास्त्रीय कारणांपैकी एक कारण म्हणजे शरीराचे घटलेले तापमान. सभोवतालच्या घटलेल्या तापमानामुळे शरीराचे तापमानही घटते. शरीराचे तापमान घटणे, हे आरोग्याला बाधक होणार असल्याने शरीर लगेच तापमान वाढवण्याचे प्रयत्न सुरु करते. कमी झालेल्या तापमानाला वाढवण्याचा सहज मार्ग म्हणजे उर्जानिर्मिती आणि उर्जानिर्मितीचा सोपा मार्ग अन्नसेवन असे हे सरळ गणित आहे. शरीराला लागणार्या थंडीमुळे उष्णता निर्माण करण्यासाठी शरीराची आहारसेवनाची इच्छा वाढते अर्थात भूक वाढते, त्यातही सहज पचणार्या आणि त्वरित उर्जा देणार्या कर्बोदकांच्या सेवनाची इच्छा वाढते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दुसरं महत्त्वाचं शास्त्रीय कारण म्हणजे थंडीमध्ये त्वरित उर्जा देणार्या कर्बोदकांचे सेवन करण्याची इच्छा होत असल्याने साहजिकच या थंडीच्या दिवसांत अधिककरुन कर्बोदकांचे (त्यातही गोडधोडाचे) सेवन केले जाते. एकदा गोडधोड खाल्ले की त्या पदार्थांमधील साखर रक्तामध्ये एकदम वाढते आणि जशी वाढते तशीच अचानक कमी सुद्धा होते. प्रत्यक्षात समुद्राची लाट यावी त्याप्रमाणे साखरेची मोठ्ठी लाट रक्तामध्ये येते व लाट निघून गेल्यावर जसे पाणी ओसरते तशीच रक्तातली साखरेची पातळी घटते. रक्तात अचानकपणे साखरेची पातळी कमी झाली तरी त्यापूर्वी अतिप्रमाणात वाढलेल्या साखरेसाठी इन्शुलिनसुद्धा खूप प्रमाणात तयार झालेले असते. साखर घटली की एकीकडे उर्जेचा अभाव झाल्याने अन्नसेवनाची इच्छा होते, तर दुसरीकडे साखर घटली तरी रक्तात वाढलेले इन्शुलिन तसेच राहते. रक्तामध्ये इन्शुलिन वाढलेले असल्याने पुन्हा आपली भूक जागरूक होते, अन्नसेवनाची इच्छा होते आणि आपण पुन्हा अन्नसेवन करू पाहतो,तेसुद्धा गोड. सदासर्वदा गोड खाणार्यांबाबत हे चक्र चालू राहते, सर्व ऋतूंमध्ये, बाराही महिने. मात्र थंडीमध्ये सर्वसामान्य लोक सुद्धा गोड खाणेच पसंत करत असल्याने पुन्हा- पुन्हा भूक लागण्याचे चक्र सुरुच राहते. हिवाळ्यात शरीराची उर्जेची मागणी वाढलेली असल्याने अधिक उर्जा मिळावी म्हणून अधिक अन्नसेवनाची गरज आणि अधिक अन्नसेवनासाठी अधिक भूक हे तर थंडीचे समीकरणच आहे. थंडीमध्ये पुन्हा-पुन्हा अन्नसेवन करावेसे का वाटते, त्याचे हे शास्त्रीय स्पष्टीकरण.
“हिवाळ्यात भूक वाढते आणि गोड खाण्याचीच इच्छा होते”,यामागे मानसिक कारण हे असते की आपल्या थंडीच्या आठवणी या गोडधोड खाण्याशी जोडलेल्या असतात. थंडीत भूक लागली म्हणून तुम्हांला चटणी-भाकर,पोळी-भाजी किंवा वरण-भात खावंसं वाटतं का? सहसा नाहीच,कारण थंडी म्हटले की पौष्टीक आहार असेच आपले गणित असते, कारण तसे संस्कारच लहानपणापासून झालेले असतात. थंडीतल्या दिवसांमध्ये आपल्या मनामध्ये एकीकडे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू, उडदाचे लाडू, तिळगूळ, तिळपोळी, गूळपोळी, पुरणपोळी, गाजर हलवा आणि एकंदरच तीळ-शेंगदाणे-काजू-बदाम-अंजीर-खजूर-खारीक- डिंक- अहळीव-उडीद युक्त विविध गोड मिष्टान्नांचा संबंध थंडीशी जुळलेला आहे, तर दुसरीकडे थंडीतल्या घरगुती मेजवान्या व सणसमारंभांमध्ये खाल्लेला सामिष वा निरामिष पौष्टिक आहार आपल्याला थंडी आली की आठवू लागतो आणि आधीच भूक वाढलेली असल्याने त्या अन्नाच्या स्मरणाने सुद्धा तोंडाला पाणी सुटत राहते.
हेही वाचा… Health Special : जाणून घ्या लठ्ठपणावरचे विविध उपचार
थंडीत भूक वाढण्यामागील सांस्कृतिक कारण म्हणजे लहानपणापासून दिवाळी आणि थंडी यांचा असा काही अतूट संबंध आपल्या स्मृतीमध्ये घट्ट बसलेला असतो की थंडी म्हटले की दिवाळी आठवते आणि दिवाळी आठवली की गोडधोड-चमचमीत खाणे आठवते.जो मुद्दा दिवाळीला लागू होतो,अगदी तसाच तो जुळतो ३१ डिसेंबरच्या रात्रीशी सुद्धा! लहानपणापासून ३१ डिसेंबरच्या रात्री भर थंडीमध्ये नववर्ष आगमनानिमित्त केलेल्या धमाल मेजवानीच्या आठवणी अशा काही मनात रुजलेल्या असतात की थंडीचे गार वारे अंगाला सुख देऊ लागले की त्या आठवणी मनात फेर घालू लागतात. थंडीत चमचमीत,गोडधोड,रुचकर खाण्याची अनावर इच्छा आपल्याला होऊ लागते,त्यामागचे हे झाले सांस्कृतिक कारण.
“थंडीमध्ये खा-खा का होते?” याचे जे पुढचे कारण आहे ते शास्त्रीय व मानसिक दोन्ही प्रकारात मोडणारे आहे, जे सूर्यप्रकाशाशी संबंधित आहे. थंडीमध्ये दिवस लहान असतो. त्यामुळे सूर्य लवकर मावळतो, सूर्यप्रकाश कमी होतो व त्यामुळे फ़ार लवकर अंधार पडतो, काही काही ठिकाणी तर संध्याकाळी चार-पाचलाच अंधार पडायला लागतो. मानवी मस्तिष्कामध्ये या अंधाराचा संबंध अन्नसेवनाशी जुळलेला आहे. हजारो वर्षांपासून माणूस उदरनिर्वाहासाठी दिवसभर घराबाहेर राहायचा व अंधार पडला की प्राण्या-पक्ष्यांप्रमाणेच आपल्या निवार्याच्या जागी परतायचा. दिवसभर अंगमेहनत करुन थकलेला तो घरी आल्यावर अन्न सेवन करायचा. हजारो वर्षांच्या या स्मृती आपल्या मस्तिष्कामध्ये अजूनही जतन आहेत आणि त्या स्मृती अंधार पडला की आपल्याला अन्नग्रहणास उद्युक्त करतात. या सर्व स्मृतींच्या परिणामी ’हिवाळ्यामध्ये जेव्हा दिवस लहान असतो-अंधार लवकर पडतो तेव्हा अन्नसेवन अधिक आणि उन्हाळ्यामध्ये जेव्हा दिवस मोठा असतो-अंधार उशिरा पडतो ,तेव्हा अन्नसेवन कमी”, असे गणित मेंदूमध्ये तयार झालेले आहे व त्याच्या परिणामी थंडीमध्ये अंधार पडला की अन्नसेवन करायला हवे असे आपल्याला वाटते. मग भले २१व्या शतकात आपण दिवसभर अंगमेहनत केली नाही तरी वा दिवसभर सतत चरत राहिलो तरी अंधार होतो आहे म्हणून केवळ… आपल्याला खावेसे वाटते!