इंदू आजी त्यांच्या अठरा वर्षाच्या नातीला, वेदिकाला घेऊन आल्या.” अगं, तिचे केस भयंकर गळत आहेत. घरभर नुसते केस!” आजी काळजीच्या सुरात म्हणाल्या. पण आजी, तिचेच केस कशावरून? घरात तुम्ही तिघी. वेदिका, तिची आई  नताशा  आणि तुम्ही.” माझा प्रश्न.

“माझे केस पांढरे, नताशाचा बॉयकट आणि घरभर पसरणारे केस लांब व काळे. सांग पाहू कोणाचे ते?” आजींनी मलाच कोडे  घातले.
 वेदिकाची माहिती घेताना, तिला दोन महिन्यांपूर्वी डेंग्यू झाल्याचे समजले. तिच्या केस गळतीचे कारण होते डेंग्यू. अशा प्रकारच्या केस गळतीमध्ये सर्व केस परत येण्याची शक्यता जवळजवळ शंभर टक्के असते. फक्त थोडा धीर धरावा लागतो इतकेच.

How does Set dosa differ from Benne dosa (1)
सेट डोसा हा बेन्ने डोसापेक्षा वेगळा कसा आहे? कोणता डोसा आहे आरोग्यदायी? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत

आजकाल केस गळण्याची समस्या सार्वत्रिक झालेली आहे. अगदी पौगंडावस्थेपासून ते ८० वर्षाच्या आजींपर्यंतचे रुग्ण केस गळतीसाठी डॉक्टरांकडे येतात. याचे एक कारण आहे स्वप्रतिमेला दिले जाणारे अवास्तव महत्त्व आणि सोशल मीडिया वरून सतत दिसणाऱ्या मुलायम, चमकदार, लांब सडक केसांच्या महिला अथवा पुरुष – आणि ते जाहिरात करीत  असलेली विविध केशवर्धक सौंदर्यप्रसाधने! केस गळती आणि त्याचे उपचार समजून घेण्यापूर्वी प्रथम आपण केसांचे नॉर्मल जीवन चक्र समजून घेऊ या. मानवाच्या डोक्यावर साधारणपणे 80 हजार ते एक लाख केस असतात. हे  केस मूल जन्मतःच बरोबर घेऊन येते. आणि हा आकडा नंतर वाढत नाही. आपले दररोज साधारणतः ५० ते ७० केस त्यांचे आयुष्य संपल्यामुळे गळून पडतात, परंतु त्यांची जागा नवीन केस घेत असतात त्यामुळे आपल्या डोक्यावरचे केसांचे छप्पर पूर्ववत राहते.

केसांच्या वाढीच्या चक्राचे तीन भाग पडतात. पहिला भाग म्हणजे ॲनाजेन फेज. यामध्ये  केसाची वाढ होत असते. ही फेज दोन ते सात वर्ष असते. जेवढी ही फेज मोठी तेवढी केसाची लांबी मोठी. त्यानंतरची फेज म्हणजे कॅटाजेन. या फेजमध्ये केसांची मुळे त्वचेच्या खालच्या थरातील रक्तपुरवठा करणाऱ्या भागाशी संपर्क तोडतात. त्यामुळे केसांची वाढ खुंटते. ही फेज काही दिवसांचीच असते. त्यानंतरच्या फेजला टिलोजेन असे म्हणतात. ही फेज दोन ते तीन महिने टिकते. या फेजमध्ये वरील केस गळून जातो आणि हळूहळू नवीन केस त्याची जागा घेतो.

टक्कल पडणे यालाच पॅटर्न हेअर लॉस असे म्हणतात कारण ही केस गळती एका विशिष्ट प्रकारे होत असते. हा प्रकार स्त्रियांमध्ये देखील आढळतो. परंतु त्याचा पॅटर्न वेगळा असतो. पन्नाशीपर्यंत पन्नास टक्के पुरुषांमध्ये, तर सत्तरी पर्यंत ४०% स्त्रियांमध्ये टक्कल पडण्याचा प्रादुर्भाव दिसून येतो. आता तुमच्या लक्षात येईल की ८० वर्षाच्या आजींचे केस का कमी झाले. पूर्वी ही नैसर्गिक बाब म्हणून स्वीकारली जायची. आजचे आधुनिक  स्त्री पुरुष हे वास्तव स्वीकारताना दिसत नाहीत.

आणखी वाचा: मुरुमांवरील उपचार

आज टक्कल पडणे हे पन्नाशीच्या आधी आणि तरुण वयात अधिकाधिक प्रमाणात दिसू लागले आहे. काय कारणे आहेत टक्कल पडण्याची? स्त्री आणि पुरुष दोघांच्याही बाबतीत अनुवंशिकता किंवा जीन्सच्या प्रभावामुळे टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाचा केसांच्या मुळावर परिणाम होऊन केस हळूहळू पातळ होऊ लागतात आणि कालांतराने समूळ नष्ट होतात.
 
पुरुषांमध्ये समोरचे केस, कानशीलाच्या वरच्या बाजूचे केस आणि डोक्याच्या माथ्यावरचे केस कमी होऊ लागतात. परंतु डोक्याच्या मागील भागातले आणि कानाच्या अगदी वरचे केस टिकून राहतात. कारण हे केस संप्रेरकाच्या अमलाखाली नसतात. स्त्रियांमध्ये डोक्याच्या माथ्यावरून केस विरळ होऊ लागतात. तरी देखील समोरची हेअर लाईन ही कायम टिकते. दुसऱ्या प्रकारात भांग फाटत जाऊन केस विरळ होतात. स्त्रियांमध्ये केस पातळ होण्याची गती संथ असते. त्यामुळे स्त्रियांमध्ये सहसा संपूर्ण टक्कल पडताना दिसत नाही.

ताण-तणाव, आहारातील बदल, बैठी जीवनशैली यामुळे तरुण मुलींमध्ये अनियमित पाळी, वाढलेले वजन, सतत येणारी मुरमे, गळणारे केस व  चेहरा आणि इतर त्वचेवर येणारे जाड  केस. ही आहेत पीसीओएस ची लक्षणे. पुरुषांमध्ये देखील  वाढलेले वजन, ताण-तणाव बैठी जीवनशैली आणि  धूम्रपान यामुळे लवकर टक्कल पडण्याची  शक्यता असते.

आणखी वाचा: मुरुमांचे डाग आणि व्रण पूर्णपणे जातात का?

सर्वसाधारण केस गळती: यामध्ये संपूर्ण डोक्यावरचे केस थोडे थोडे गळतात. परंतु ते पातळ होत नाहीत. या केस गळतीची कारणे खालीलप्रमाणे आहेत:
 बाळंतपण: मूल जन्मल्यानंतर दोन-तीन महिन्यांनी बहुतेक स्त्रियांचे केस गळायला सुरुवात होते. गरोदरपणात इस्ट्रोजेन हे संप्रेरक मोठ्या प्रमाणात स्त्रवल्यामुळे केसांची भरपूर वाढ होते. बाळंतपणानंतर हे संप्रेरक पूर्वस्थितीला येते. त्यामुळे केसांचा वाढीव खुराक बंद होतो आणि त्यांची गळती सुरू होते.
 
शारीरिक आणि मानसिक ताणतणाव: विविध प्रकारचे साथीचे रोग आणि मोठ्या शस्त्रक्रिया यांच्यानंतर दोन ते तीन महिन्यांनी केसांची गळती दिसू लागते. मानसिक तणावाने अशाच प्रकारची केस गळती दिसते.

अन्नघटकांची कमतरता: लोह, ड जीवनसत्व, प्रथिने, झिंक आणि बायोटिन यासारख्या जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे केस गळू लागतात. म्हणून डाएटिंग करताना तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

थायरॉईड : थायरॉईडच्या कमतरतेने ही केस गळती दिसू लागते.
 
किमोथेरपी: कॅन्सरच्या उपचारांमध्ये किमोथेरपीचा वापर होतो. या औषधांमुळे सगळे केस अतिशय वेगाने व कमी कालावधीत गळून जातात. परंतु औषधोपचार थांबवल्यानंतर सर्व केस पुन्हा वर्षभरात येतात.

केस हे आजच्या युगात सौंदर्याचे महत्त्वाचे लक्षण असल्याने त्याच्यावर विविध औषधे, उपचार पद्धती आणि  केशारोपण शस्त्रक्रिया यांच्या उपयोगाने केस परत येऊ शकतात. कसे ते पाहूया पुढच्या लेखात.