पुरुष आणि स्त्रिया दोघेही समान प्रमाणात मद्यपान करतात, तरी महिलांना ती अधिक प्रमाणात चढते अशी माहिती समोर आली आहे. मद्यपान करण्याची कारणे ज्याप्रमाणे वेगवेगळी असू शकतात, तसेच मद्यपानामुळे दोघांच्या शरीरावर होणारे परिणामदेखील भिन्न आहेत. एपिडेमियोलॉजिकल पुरावे असे सूचित करतात की, जवळजवळ २० टक्के प्रौढ पुरुषांना मद्यपानाशी संबंधित अडचणी उद्भवू शकतात; तर दुसरीकडे केवळ सहा टक्के प्रौढ स्त्रिया मद्यपी असून त्या नियमितपणे मद्याचे सेवन करतात. तरीही पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या आरोग्यावर मद्यपानाचा परिणाम अधिक दिसून येतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील शारीरिक भिन्नता मद्यपानाच्या पचनावर कसा परिणाम करते?

यकृतातील अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) आणि माइटोकॉन्ड्रियल अल्डीहाइड डिहायड्रोजनेज (ALDH2) द्वारे दारू प्रामुख्याने डिटॉक्सिफिकेशन केले जाते, जे पुरुष आणि स्त्रिया दोघांमध्ये भिन्न असते. तसेच, स्त्रिया इथेनॉल चयापचय उत्पादन एसीटाल्डिहाइड-प्रेरित कार्डियाक कॉन्ट्रॅक्टाइल डिप्रेशनसाठी अधिक संवेदनशील असू शकतात, ज्यामुळे अल्कोहोलिक कार्डिओमायोपॅथीमध्ये लैंगिक भिन्नता वाढू शकते.

जास्त मद्यपान केल्याने मेंदूच्या आरोग्याच्या समस्या, हृदयविकाराचा झटका आणि यकृताचे आजार महिलांमध्ये जास्त प्रमाणात होण्याचा धोका असतो का?

जास्त प्रमाणात मद्यपान केल्याचा परिणाम स्त्रियांमध्ये वेगाने दिसून येतो. उदाहरणार्थ, एक पुरुष २० ते ३० वर्षांपर्यंत जास्त मद्यपान करणारा असेल, तर त्याला मध्यम स्वरूपाच्या अडचणी येऊ शकतात. परंतु, स्त्रीने केवळ पाच वर्षांपर्यंत जास्त मद्यपान केले तरी तिला मध्यम समस्या उद्भवू शकतात. स्त्रियांना पुढील आयुष्यात मद्यपानामुळे अनेक समस्या निर्माण होण्याचा धोका असतो. कारण अल्कोहोल-संबंधित आरोग्याच्या समस्या उद्भवण्याचा धोका जास्त असतो. शास्त्रज्ञांनी शोधून काढले आहे की, स्त्रिया अल्कोहोल डिहायड्रोजनेज (ADH) नावाचे एन्झाइम कमी प्रमाणात तयार करतात, जे यकृतामध्ये तयार होते आणि शरीरातील अल्कोहोल ब्रेक करतात. तसेच अल्कोहोल चरबीद्वारे शोषले जाते आणि पाण्यामुळे पसरले जाते. नैसर्गिकरित्या शरीरातील चरबीचे प्रमाण जास्त असल्याने आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने महिलांच्या शरीरात दारूला अधिक तीव्र शारीरिक प्रतिसाद मिळतो. त्यामुळे पुरुषांइतके मद्यपान केले तरीही स्त्रियांच्या रक्तातील अल्कोहोल उच्च पातळी गाठते.

हेही वाचा- महिनाभर अंडी खाणे सोडल्यास शरीरात काय बदल होतात? अंड्याला पर्यायी पदार्थ कोणते? तज्ज्ञ काय सांगतात जाणून घ्या

गर्भपात, मुदतपूर्व जन्म आणि गर्भाच्या अल्कोहोल स्पेक्ट्रम विकारा (FASDs) च्या समस्यांसह गर्भधारणेदरम्यान मद्यपानाच्या वापराचे गंभीर परिणाम काय असतात?

आईच्या रक्तातील अल्कोहोल बाळाकडे जाऊ शकते; ज्यामुळे गर्भपात, मृत गर्भ आणि विविध शारीरिक, वर्तणूक आणि बौद्धिक समस्या उद्भवू शकतात. ज्याला गर्भ अल्कोहोल स्पेक्ट्रम विकार (FASDs) असे म्हटले जाते. FASD च्या समस्येने ग्रस्त असलेल्या मुलांमध्ये अशा प्रकारची वैशिष्ट्ये आणि हालचाली दिसून येतात. –

  • नाक आणि वरच्या ओठांमधील एक रिज (फिल्ट्रम) चेहऱ्यावर असामान्य असे वैशिष्ट्य असते.
  • डोक्याचा आकार लहान असणं.
  • सरासरीपेक्षा कमी उंची.
  • शरीराचे वजन कमी.
  • खराब समन्वय.
  • अतिक्रियाशील वर्तन.
  • लक्ष देण्यात अडचण.
  • स्मरणशक्ती कमी असणे.
  • शिकण्यात अडचणी निर्माण होणे.
  • बोलण्यात गॅप पडणे.
  • बौद्धिक अपंगत्व किंवा कमी IQ
  • खराब तर्क आणि निर्णय क्षमता.
  • दिसण्याची किंवा ऐकण्याची समस्या.
  • हृदय, मूत्रपिंड किंवा हाडांशी संबंधित समस्या.

तुम्ही मद्यपान कसे थांबवू शकता?

तुम्ही मद्यपानामुळे होणाऱ्या नुकसानीचा गंभीरपणे विचार करा, ध्येय निश्चित करा आणि बदलाची तयारी सुरू करा. मद्यपान पूर्णपणे सोडणे आणि कमी करणे याच्या फायद्यांचे मूल्यांकन करा. मद्यपान व्यसन उपचार पर्याय शोधा, मद्यपानापासून सुरक्षितपणे माघार घ्या, यासाठी मदत घ्या तसेच जीवनाचा नवा अर्थ शोधा.