दिवाळीमध्ये सर्व सोशल मीडियावर जाहिरातींचा पूर आलेला असतो. दिवाळी अंक व वर्तमानपत्रे यामधील बऱ्याच जागा कपडे आणि दागदागिन्यांच्या जाहिरातींनी नटलेल्या असतात. माझे असे निरीक्षण आहे की हल्ली जाहिरातींमध्ये जे आजी-आजोबा – बापरे…… आजी-आजोबा नाही म्हणायचे, तर ज्येष्ठ नागरिक असे म्हणायचे, खरे की नाही? – तर हे जे आजी-आजोबा दिसतात ते किती तरुण आणि सुडौल दिसतात शिवाय तंदुरुस्त देखील.

तर हा आहे आजचा जमाना. वाढलेलं वय झाकण्याचा किंवा काळाचे चक्र मागे नेण्याचा. होय ना? आजचा आपला लेख ह्या हौसेबद्दल योग्य ती शास्त्रीय माहिती करून घेण्यासाठी आहे. ॲन्टी-एजिंग म्हणजेच वय पालटताना जे प्रश्न तुम्हाला पडतात त्यांची माहिती देणे हे आजच्या लेखाचे प्रयोजन आहे.

hundred liver transplants at New Era Hospital in nagpur
अवयव दानाला बळ… मध्य भारतातील एकाच रुग्णालयात यकृत प्रत्यारोपणाचे शतक
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
shivali parab mother emotional after seeing the look of Mangla movie
‘मंगला’ चित्रपटातील शिवाली परबचा लूक पाहून आई झालेली भावुक; म्हणाल्या, “१२ तास चेहऱ्यावर मेकअप, जेवायला नाही अन्…”
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Moong dal health benefits
दररोज भिजवलेले मूग खाणं आरोग्यासाठी घातक? मग तज्ज्ञ काय सांगतात…
nagpur 6 662 tuberculosis cases were found but municipal corporation reduced death rate
बाप रे…नागपुरात क्षयरूग्णांची संख्या साडेसहा हजारांवर…मोदी यांनी दिलेली क्षयरोगमुक्तीची हाक…

जसजसे वय वाढते तसतसा मानवाच्या सर्वच अवयवांवर परिणाम होत असतो. फक्त त्वचा आणि चेहरा हे अवयव म्हणजे उघडे पुस्तक असल्यामुळे ते सतत नजरेला दिसत राहतात आणि खटकतात. मग सुरु होते या पाउलखुणा पुसण्याची धडपड.

हेही वाचा : तुमचे आतडे खाद्यपदार्थांच्या बाबतीत संवेदनशील असल्यास वाढू शकतो हृदयविकाराचा धोका? वाचा नवीन अभ्यासातून समोर आलेली माहिती…

वयोमानाप्रमाणे  हे बदल का बरे घडतात?

ढोबळ मानाने या बदलाची दोन कारणे आहेत. ती म्हणजे आंतरिक घटक म्हणजे शरीरात नैसर्गिकरीत्या आतून घडून येणारे बदल. या बदलाचे कारण असते अनुवंशिकता, संप्रेरकांची कमतरता, मानसिक अवस्था आणि त्वचेचा मूळ रंग. कधी कधी आपण भाजीवालीचा काहीही काळजी न घेता दिसणारा सुंदर चेहरा बघतो..ही असते अनुवंशिक देणगी.

दुसरे कारण म्हणजे बाह्य घटकांचा त्वचेवर होणारा परिणाम. यातील प्रमुख घटक म्हणजे सूर्यप्रकाश. सूर्यप्रकाशातील अतिनील किरणे सर्वात धोकादायक असतात. ही किरणे सूर्यप्रकाशाव्यतिरिक्त कंप्युटर किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधनांमधूनही फेकली जातात.त्याचबरोबर आगीची धगदेखील हानीकारक असते. वातावरणातील प्रदूषणकारक धूलिकण यामध्ये येतात. तसेच धूम्रपान, वाहनांवाटे बाहेर पडणारी प्रदूषित हवा, फटाक्यांचा धूर, जाळलेला कचरा आणि कारखान्यांमधून सोडला जाणारा धूर.

हेही वाचा : Mental Health Special: डीपफेकचे परिणाम काय? ओळखायचे कसे?

हे बदल कोणते असतात?

हे बदल त्वचेच्या सर्वच थरांबरोबर त्यांच्याखालील स्नायू व  हाडे  यांच्यामध्ये देखील घडून येतात. त्वचेचा सर्वात वरचा थर म्हणजे एपीडर्मीस किंवा बाह्यत्वचा. यात होणारा बदल म्हणजे त्वचा रापणे, तिचा रंग काळपट होणे, ती निस्तेज दिसणे  आणि तिच्यावर विविध रंगी डाग किंवा चामखीळ दिसणे. 

डर्मीस किंवा अंतर्त्वचा म्हणजे  एपीडर्मीसच्या खालचा थर. या थरामध्ये वेगवेगळ्या पेशी, प्रथिनांचे तंतू आणि रक्तवाहिन्या असतात. या थरातील फायब्रोब्लास्ट या पेशींचे कार्य मंदावते. त्यांची जननक्षमता कमी होते. त्यामुळे कोलॅजेन  आणि इलास्टिन हे प्रथिनतंतू कमी प्रमाणात तयार होतात. त्यामुळे  त्वचेचा भरीवपणा आणि लवचिकता कमी होते. मग चेहऱ्यावर सुरकुत्या दिसू लागतात. ओपन पोअर्स  म्हणजे त्वचेतील रंध्रे मोठी होऊन खड्डे दिसू लागतात. आंतरिक वार्धक्यामुळे  पडणाऱ्या सुरकुत्या अतिशय बारीक असतात. त्या गोऱ्या त्वचेवर अधिक प्रमाणात आणि लहान वयात दिसण्यात येतात तर बाह्य वार्धक्याच्या  सुरकुत्या मोठ्या व जाड असतात. या बदलांमुळे  त्वचेचा मुलायमपणा, लवचिकता आणि  गुळगुळीतपणा कमी होऊ लागतो. जखमा सहज होतात आणि लवकर बऱ्या होत नाहीत. त्वचा जाडसर, फिकट,निस्तेज आणि पिवळट दिसू लागते. तसेच कोलॅजेन  आणि इलास्टिन  प्रथिनतंतू कमी झाल्यामुळे अंतर्त्वचेतील रक्तवाहिन्यांचा आधार कमजोर होतो व जरासे लागले तरी त्वचेखाली रक्त जमा होते.

हेही वाचा : कोणते आसन स्नायू बळकट अन् झपाट्याने वजन कमी करण्यास मदत करू शकतात? योग तज्ज्ञांनी दिलं उत्तर… 

डर्मीसच्या खालचा थर म्हणजे चरबी. ही चरबी वेगवेगळ्या कप्प्यांमध्ये बंदिस्त असते. त्यामुळे चेहऱ्याला विशिष्ट आकार प्राप्त होतो. या चरबीमुळे चेहऱ्याला गोलाई येऊन सौंदर्य प्राप्त होते. जसजसे वय वाढते तस तसे या चरबीला कप्प्यांमध्ये टिकवून ठेवणारे तंतूंचे थर सैल पडू लागतात. शिवाय गुरुत्वाकर्षणामुळे ही चरबी खाली उतरू लागते. त्यामुळे डोळ्याची पापणी, गाल, मान व दंड येथे त्वचा खाली लोंबू लागते, गाल खोल जातात आणि चेहऱ्याचा आकार बदलतो. या खालील थर असतो स्नायूंचा व  ते ज्यांच्यावर बसवलेले असतात त्या हाडांचा. हे स्नायू देखील हळूहळू सैलावत जातात आणि लोंबणाऱ्या त्वचेला हातभार लावतात. वयाप्रमाणे हाडे ठिसूळ होत जातात आणि नवीन हाडे तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे देखील चेहऱ्याचा आकार बदलतो. मणक्याची हाडे झिजल्यामुळे उंची कमी होते. हे सर्व बदल हळूहळू वयाच्या तिशीनंतर सुरू होतात आणि जसजसे वय वाढते तसतसे झपाट्याने दिसू लागतात.

या बदलांवर काही उपाय आहेत का? 

अनिल कपूर, हेमामालिनी, रेखा यांच्यासारखे तारे व तारका साठीच्या पुढे देखील आपले सौंदर्य टिकवून आहेत. त्याचे रहस्य काय ते पाहूया पुढच्या लेखात.

Story img Loader