बडीशेप ही त्यांच्या औषधी गुणधर्मांमुळे आपल्या आहाराचा एक भाग म्हणून वापरली जाते. तसेच बडीशेप ही स्वयंपाकात घरात सहज उपलब्ध होणारा पदार्थ आहे. बडीशेपचे जेवणानंतर चघळण्यासाठी, चहा किंवा पाण्यात टाकून वापरली जातेय पण, बडीशेप किंवा बडीशेपचच्या पाण्याचा तुमच्या शरीरावर जास्तीत जास्त चांगला परिणाम देऊ शकते. बडीशेपचे पाणी तुमची पचनक्रिया सुधारते आणि सकाळी पिण्यासाठी ते उत्तम पेय आहे.

बडीशेपचे पाणी हे त्याच्या दाहकविरोधी (Anti-Inflammatory) गुणधर्म, अँटिऑक्सिडंट्स आणि विरघळणारे फायबर्स यांच्यामुळे पचनक्रिया पचनक्रियासुधारण्यासाठी आदर्श आहे, असे नवी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयाच्या सल्लागार, आहारतज्ज्ञ प्रतीक्षा कदम सांगतात.

Fight Winter Cold Cough with lemon and clove water
Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Purple Cabbage Healthy Salad Recipe In Marathi
वाढलेले वजन झपाट्याने होईल कमी; नाश्त्यामध्ये करा पर्पल कॅबेज सॅलेडचा समावेश, ही घ्या सोपी रेसिपी
Kitchen jugad video orange peel and milk scrub for tanning skin
Kitchen Jugaad: दुधात संत्र्याची साल टाकताच कमाल झाली; Video पाहाल तर दररोज कराल हा उपाय
dudhi barfi recipe
अवघ्या काही मिनिटांत बनवा दुधी भोपळ्याची पौष्टिक बर्फी; वाचा साहित्य आणि कृती…
quickly make delicious egg cutlets Read materials and actions
व्हेज कटलेट खाऊन कंटाळा आलाय? मग झटपट बनवा अंड्याचे स्वादिष्ट कटलेट; वाचा साहित्य आणि कृती
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Can even 1.5 grams of weight gain increase the risk
१.५ ग्रॅम वजन वाढल्यानेही वाढू शकतो मधुमेहाचा धोका? तज्ज्ञांचे मत काय…

बडीशेपचे पाणी पिऊन तुमचा दिवस का सुरू करावा याची सात कारणे खालीलप्रमाणे:

१) सकाळी एक ग्लास बडीशेपचे पाणी त्याच्या पाचक गुणधर्मांमुळे पचन प्रक्रिया उत्तेजित करण्यास आणि पचनास मदत करते; ज्यामुळे गॅस होणे, सूज येणे व अपचन अशा समस्यांपासून आराम मिळतो. बडीशेपमुळे एकंदरीत संपूर्ण गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आरोग्य सुधारते.

२) बडीशेपमध्ये काही विशिष्ट संयुगे असतात; ज्यात दाहकविरोधी (Anti-Inflammatory) गुणधर्म असतात. बडीशेपचे पाणी नियमित सेवन केल्याने शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. बडीशेपमधील नायट्रेट्स हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या प्रणालीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण- ते हृदयाच्या रक्तवाहिन्या विस्तृत (dilate) करून, त्यांच्यावरील ताण कमी करतात आणि त्यांना आराम देतात. एकंदर प्रक्रियेत हृदयाच्या स्नायूंपर्यंतचा (heart muscle) रक्तप्रवाह सुधारतात. बडीशेप हे आधीपासून अस्तित्वात असलेल्या रक्तवाहिन्यांपासून नवीन रक्तवाहिन्यांच्या निर्मितीमध्येही मदत करते. बडीशेपमधील पोटॅशियमचे प्रमाण रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

हेही वाचा – सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा मेथीचे पाणी का प्यावे? काय सांगतात आहारतज्ज्ञ, जाणून घ्या…

३) बडीशेपचे पाणी हे फ्लेव्होनॉइड्स आणि फिनोलिक संयुगासह अँटिऑक्सिडंट्सचा समृद्ध स्रोत आहे. अँटिऑक्सिडंट्स हानिकारक फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या ऑक्सिडेटिव्ह तणावापासून शरीराचे संरक्षण करण्यास मदत करतात आणि अस्थमा, अल्झाइमर, कॅन्सर सारख्या क्रॉनिक आजारांचा धोका कमी करतात.

४) सकाळी एक ग्लास बडीशेपचे पाणी प्यायल्याने तुमच्या रोजच्या हायड्रेशनच्या गरजा पूर्ण होतात. पचन, रक्ताभिसरण व तापमान नियंत्रण यांसह योग्य शारीरिक कार्ये पूर्ण करण्यासाठी शरीर पुरेसे हायड्रेटेड राहणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा – जांभूळ रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी मदत करते का? जाणून घ्या आहारतज्ज्ञ काय सांगतात …

५) बडीशेपमध्ये काही गुणधर्म असू शकतात; जे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात. त्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे भूक नियंत्रित करण्यास मदत होऊ शकते. तुमच्या सकाळच्या नित्यक्रमात बडीशेपचे पाणी घेतल्यास तुम्ही वजन नियंत्रणाच्या निरोगी उद्दिष्टांना साध्य करू शकता. जेवणादरम्यान बडीशेपचे पाणी घेतल्याने तुमची काहीतरी खाण्याची इच्छा बिनदिक्कतपणे कमी करू शकते. तुमच्या अन्नाच्या सेवनाचे प्रमाण नियंत्रणात ठेवते, भूक कमी करण्यासाठी आणि वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. भिजवलेले बडीशेपचे पाणी लघवीचे प्रमाण वाढवणारे औषध म्हणूनदेखील कार्य करते आणि तुमची चयापचय प्रक्रिया सुधारते; जी तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासात फायदेशीर ठरते.

६) बडीशेपचे सोल्युबर फायबर्स रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यास आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारण्यास मदत करू शकतात. बडीशेप बीटा-कॅरोटीनने समृद्ध आहे. हे आणखी एक असे अँटिऑक्सिडंट आहे; जे टाइप-२ मधुमेह असलेल्या रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करण्यास मदत करू शकते.

७) बडीशेपमध्ये नैसर्गिक शांतता प्रदान करणारे गुणधर्म असतात; जे तुम्हाला आराम देतात आणि तणाव कमी करण्यास मदत करतात. एक कप बडीशेपच्या पाण्याने तुमचा दिवस सुरू केल्याने तुमचे मन आणि शरीर यांच्यावर सुखदायक प्रभाव पडू शकतो आणि तुम्हाला दिवसातील आव्हानांचा सामना करण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा – दिवसा घेतलेली डुलकी तुमच्या मेंदूसाठी चांगली आहे का? काय सांगते संशोधन, जाणून घ्या… 

बडीशेपचे पाणी कसे सेवन करावे?

भिजवणे : एका चमचा बडीशेप घ्या आणि ती एका काचेच्या किंवा पाण्याने भरलेल्या भांड्यात (१-२ चमचे) घाला. बडीशेप रात्रभर भिजवू द्या. सकाळी पाणी गाळून रिकाम्या पोटी ते सेवन करा. तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी थोडे गरम करू शकता.

उकळणे : एका चमचा बडीशेप घ्या आणि एका भांड्यात (सुमारे दोन कप) घाला. पाण्याला एक उकळी आणा आणि ५ ते १0 मिनिटे उकळू द्या. गरम पाणी थंड होऊ द्या मग ते पाणी गाळून घ्या. ते सकाळी रिकाम्या पोटी प्या.

बडीशेपच्या पाण्याचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठरवले जाऊ शकते. काही लोक बडीशेपचे अधिक प्रमाण पसंत करतात; तर काही लोक सौम्य चव पसंत करतात.

हेही वाचा – दिवसाची सुरुवात Detox Drink घेऊन करावी का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या

लक्षात ठेवा, बडीशेपचे पाणी संभाव्य फायदे देऊ शकते. हा एक जादुई उपाय नाही; तर संतुलित आणि विविध आहाराचा भाग म्हणून तो सेवन केला पाहिजे. याव्यतिरिक्त कोणत्याही संभाव्य ॲलर्जी, संवेदनशीलता किंवा तुमच्याकडे असलेल्या औषधांशी परस्पर प्रक्रिया लक्षात घेणे महतत्त्वाचे आहे. तुम्हाला काही विशिष्ट आरोग्यविषयक चिंता किंवा परिस्थिती असल्यास, वैयक्तिक सल्ल्यासाठी नेहमी डॉक्टरांचा सल्ला घ्या.