Dental Care Tips In Winter: हिवाळ्यात त्वचा आणि केस कोरडे होण्याबरोबर दातांच्या समस्याही उद्भवतात. अनेकांना हिवाळ्यात दातांमध्ये वेदना जाणवतात. थंडीमुळे दातांमध्ये सेन्सिटिव्हीटीचा त्रास सुरू होतो. त्यामुळे हिवाळ्यात दातांची विशेष काळजी घेण्याचा सल्ला डेंटिस्ट देतात. जर सतत दातांमध्ये वेदना जाणवत असतील तर अशावेळी दातांची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.
हिवाळ्यात अशी घ्या दातांची काळजी
आणखी वाचा: चहा करून पावडर फेकून देताय? त्याचे फायदे जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित
भरपुर पाणी प्या
हिवाळ्यात थंडीमुळे अनेकजण कमी पाणी पितात. त्यामुळे तोंड कोरडे होते, त्यामुळे लाळ तयार होण्याचे प्रमाण कमी होते. यामुळे तोंडातील चांगल्या बॅक्टेरियाची कमतरता निर्माण होते, यामुळे दातांना किड लागण्याची शक्यता वाढते. त्यामुळे हिवाळ्यात भरपुर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो.
गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करा
चहा, कॉफीसह गोड पदार्थ खायला अनेकांना आवडते. पण गोड पदार्थ तोंडात लहान बॅक्टेरियाला आकर्षित करतात, ज्यामुळे दातांना किड लागू शकते. त्यामुळे गोड पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी ठेवा.
दात नीट स्वच्छ करा
दातांची काळजी घेण्यासाठी दात नीट स्वच्छ करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला सेन्सिटिव्हीटीचा त्रास असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने सेन्सिटिव्ह टूथब्रश आणि टूथपेस्ट वापरावे.
आणखी वाचा: घराच्या खिडकीत कबुतरांनी मांडलाय उच्छाद? ‘या’ सोप्या ट्रिक्स वापरून लगेच पळवून लावा
नियमित चेकअप करा
सेन्सिटिव्हीचा त्रास वाढू नये यासाठी नियमित चेकअप करावे. यासाह वर्षातून एकदा दाताचे क्लीनिंग करावे आणि दिवसातून दोनदा दात घासावे.