पल्लवी सावंत पटवर्धन
रवी आणि रिमाने मला त्यांनी केलेल्या मेथीच्या लाडवांचे फोटो पाठवले. त्यावर रवीने खूप हसायचे इमोजी पाठवून हे केवढेसे लाडू आहेत. मी तर ३-४ खाऊ शकतो असा मेसेज पाठवला. त्यावर रिमाने पुढे एक व्हीडिओ पाठवला.

ज्यात रवीचं तोंड लाडू खाताना अगदी कसंनुसं झालं होतं. त्याउपर त्याने एकच खाऊ शकतो अशी साभार कबुली देऊ केली होती. मेथीचे लाडू म्हटलं की अनेकांना हे दृश्य माहिती झालं असेलच. निसर्गात उपलब्ध असणारे काही पदार्थ अत्यंत औषधी मात्र चवीला कडू असतात.

MMC , complaints against doctors,
डॉक्टरांविरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात एमएमसीला यश, तक्रारींची संख्या १,७०० वरून ६०० वर
Goa Shack Owners
Goa Tourism : गोव्याकडे देश-विदेशातील पर्यटकांची पाठ? शॅक…
Vinod Kambli Message to Sachin Tendulkar
Vinod Kambli : विनोद कांबळीचं वक्तव्य, “मी मरणार नाही, सचिनला निरोप द्या, मी लवकरच…”
Vinod Kambli Reaction , Bhiwandi Hospital,
मी धावायला तयार.. रुग्णालयात उपचारासाठी दाखल विनोद कांबळी यांची पहिली प्रतिक्रिया
TB survey in Satara, 160 teams for TB survey ,
साताऱ्यात क्षयरुग्ण सर्वेक्षणासाठी १६० पथके
Only difference is education toddlers strugglet to help family a video
“प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते, तुला संधी मिळाली सोन कर” वयात येणाऱ्या मुलांना बापानं दाखवावा असा VIDEO; पाहून आयुष्य बदलेलं
Shocking video Suv overturned 8 times nagaur bikaner highway accident Live video
याला काय म्हणाल नशीब की चमत्कार? ८ वेळा पलटली SUV कार; समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
emotional quote viral video rickshaw driver write heart touching best line for father
VIDEO : रिक्षाच्या मागे पठ्ठ्यानं लिहिलं असं काही की, पाहून अनेकांना झाली वडिलांच्या कष्टाची जाणीव; लोक म्हणाले, “लाखात एक…”

तांबड्या रंगाचे अगदी चौकोनी अशा आकाराचे मेथीचे दाणे एव्हाना तुमच्या डोळ्यासमोर आले असतीलच. अनेक स्वयंपाक घरात फोडणीसाठी वापरले जाणारे हे दाणे बहुगुणी आणि उपायकारक आहेत.

आपण जर एक चमचा मेथीच्या दाण्याच्या पोषकतत्त्वांबद्दल विचार केला तर त्यामध्ये दिवसभराच्या साधारण आहाराच्या २० % इतके लोह असते आणि साधारण ६० % इथे मॅग्नेशियम आढळते म्हणजे तीन ते पाच ग्राम मेथी दाण्यांमध्ये मुबलक प्रमाणामध्ये पोषण असते.

दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहींमध्ये इन्शुलिनवर अंकुश ठेवणाऱ्या या दाण्यामुळे टाईप २ मधुमेह असणाऱ्यांना मेथी सगळ्यात जवळची वाटते. खरं तर लहान मुलांपासून ते गरोदर बायकांमध्ये आणि तरुणापासून ते वयोवृद्धांसाठी मेथी उपकारक आहे.

हेही वाचा : नियमित व्यायाम आणि व्हिटॅमिन डीचे सेवन केल्यास हिवाळ्यात येणारे हार्ट अटॅक टाळता येतील का? तज्ज्ञ काय सांगतात…

गरोदर स्त्रियांमध्ये दुधाचे प्रमाण वाढविण्यासाठी, सांधेदुखी कमी करण्यासाठी, केसगळती कमी करण्यासाठी मेथीचे दाणे अत्यावश्यक आहेत.

शरीरात टेस्टोस्टेरॉनचे प्रमाण वाढवण्यासाठी देखील मेथीचे दाणे अत्यंत उपयुक्त असतात. लेप्टीन आणि घ्रेलिन यांच्यावर योग्य अंकुश ठेवण्यासाठी देखील मेथीच्या दाण्याचे पाणी अत्यंत उपायकारक ठरू शकते.

मेथीचे दाणे दुधामध्ये थोडेसे भिजवून किंवा हलके तुपावर भाजून देखील तुम्ही लाडवामध्ये वापरू शकता.

पाण्यामध्ये मेथीचे दाणे एकत्र केल्यानंतर आपण ते जर सकाळी खाता येईल ते पाणी प्यायलात तर तुमच्या इन्सुलिनची पातळी प्रमाणात राहण्यामध्ये मदत होते. यामुळे तुमची भुकेची संप्रेरके देखील अत्यंत व्यवस्थित प्रमाणामध्ये संतुलित राहू शकतात ज्यांना केस गळतीचा किंवा अकाली केस जाण्याचा त्रास आहे त्यांच्यासाठी मेथीचे दाणे अत्यंत औषधी आहेत.

विविध प्रकारच्या कर्करोगाला दूर ठेवण्यासाठी मेथीचे सेवन नियमितपणे आवश्यक आहे.

वजन आटोक्यात ठेवणे, कोणत्याही प्रकारची पचनसंस्थेचे जळजळ कमी करणे किंवा कोणत्याही प्रकारचे पोटाचे विकार दूर ठेवणे यासाठी मेथीचे दाणे गुणकारी आहेत. जर तुम्हाला सांधेदुखी असेल हाडांना बळकटी नसेल तर मेथीचे दाणे – पावडर स्वरूपात किंवा दाण्याच्या पाण्याच्या स्वरूपात आहारात समाविष्ट करता येऊ शकतात.

हेही वाचा : Heart Attack : हिवाळ्यात ह्रदय सांभाळा! हृदयाशी संबंधित समस्यांकडे दुर्लक्ष करू नका; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

व्यायाम करताना जर उत्साह वाटत नसेल किंवा थकवा येत असेल तर मेथीच्या दाण्याचे नियमित सेवन केल्याने तुमच्या व्यायामाच्या ताकदीमध्ये भरपूर फरक पडू शकतो.

अनेक जण मेथीची उसळ खातात. कोरडे मेथीचे दाणे रात्रभर पाण्यात भिजवावेत. त्यातील पाणी काढून टाकावे आणि त्याला मोड येऊ द्यावेत. मेथीच्या दाण्यांना जर मोड आले तर त्यातील कडवटपणा निघून जातो आणि ते नेहमीच्या कडधान्यांप्रमाणेच चवीला चविष्ट लागू शकतात. ही उसळ तुमच्या आहारामध्ये नियमितपणे असेल उत्तम त्वचा, उत्तम पचन आणि उत्तम केस असे परिणाम दिसून येतात.

मेथीचे लाडू करताना त्यामध्ये जर तुम्ही गूळ वापरला तर त्यातील मेथीचे लाडू चवीला नेमके ठरू शकतात.

स्त्रियांच्या मासिक पाळी दरम्यान जर चार मेथीच्या दाण्यांचे सेवन जरी व्यवस्थित केले तरी देखील मासिक पाळी दरम्यान होणारे दुखणे कमी होऊ शकते. ज्यांना डोळ्यांखाली काळी वर्तुळे आहेत त्यांच्यासाठी मेथी पावडर किंवा भिजवलेले दाणे सेवन केल्याने अत्यंत परिणामकारक दिसून आलेले आहेत. तारुण्यपीटिका कमी करण्यासाठी मेथीच्या दाण्यांचे सेवन किंवा मेथीच्या दाण्यांचे तुपातून सेवन अत्यंत उपाय कारक ठरू शकते.

ज्यांना किडनी स्टोन आहे किंवा ज्यांना ढेकर किंवा अपचनाचा त्रास आहे त्यांच्यासाठी देखील मेथीचे पाणी अत्यंत उपयुक्त आहे.

मेथीचे दाणे पेरून त्यापासून तयार झालेली हरितके सॅलडमध्ये वापरल्यास देखील तुम्हाला उत्तम फायबर मिळू शकते आणि उत्तम रोगप्रतिकारशक्ती वाढू शकते. अत्यंत चविष्ट लागणारी कोवळी मेथी रक्त शुद्ध करण्यासाठी उपयुक्त मानली जाते.

लहान मुलांमध्ये होणाऱ्या ताप सर्दी खोकला यासारख्या विकारांमध्ये मेथीच्या दाण्याचे सूप किंवा मेथीची उसळ तब्येत पूर्ववत करण्यास मदत करू शकते.

हेही वाचा : Health Special : हिवाळ्यात रोगप्रतिकारक्षमता कशी होते सक्षम?

पोषकतत्वांचा विचार केल्यास त्याच्यामध्ये साधारण ६० मिलिग्रॅम इतके कॅल्शियम असते शिवाय संपूर्ण मेथीच्या १००ग्राम दाण्यांमध्ये साधारण १५ ते २० ग्रॅम इतके प्रथिने असतात.

लाडू तयार करताना देखील साधारण एका लाडवात ३ ते ५ ग्राम मेथी असल्याची खात्री ठेवून त्याप्रमाणे प्रमाण ठरवावे. या हिवाळ्यात तुम्ही ही दाणेदार आणि बाणेदार मेथी वापरताय का ?

Story img Loader