“अगं…” , माझ्याशी बोलताना ती अतिशय त्रासलेली दिसत होती. “माझे वजन वगैरे फार दूरचे ध्येय आहे. आधी माझी ॲसिडिटी कमी व्हायला पाहिजे. बाहेरच खाणं तर दूर; नुसती भाजी-भाकरी खाल्ली तरी ॲसिडिटी होते मला आणि माझ्या फॅमिलीत बाबांना ॲसिडिटीचा खूप त्रास होता. तसाच तो मलाही आता सुरू झालाय. ते सगळे काढे, आइस्क्रीम, थंड दूध- कशाचाही फायदा होत नाही.” – त्रासलेल्या आवाजात ती सांगत होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“ऑफिस मीटिंग्समध्ये ढेकर येतात, अगं – आणि ते लपवताही येत नाहीत. माझी ब्लड टेस्ट केली तर फेसच येईल की काय, अशी भीती वाटते,” …यावर तीच स्वतः खळखळून हसली. माझ्यातली चिकित्सक वृत्ती तिच्या खाण्याच्या सवयी, खाण्याचे पदार्थ याभोवती फेर घालत घालत थेट तिच्या पचनसंस्थेच्या गुब्बारलेल्या तळाशी शोध घेऊ लागली…

पचनसंस्थेवर अतिताण पडतो म्हणजे काय होते, तर पोटातील विशेषतः आतड्यात आम्लाचे अतिरिक्त प्रमाण वाढते आणि असंतुलन तयार होते. त्यामुळे पोटाची जळजळ, पोटदुखी, भूकच न लागणे, पोटात ठराविक अंतराने दुखणे, पोट फुगल्यासारखे वाटणे असे एक ना अनेक विकार उद्भवू शकतात…

मुळात पचन म्हणजे काय?

आपण एखादा खाद्यपदार्थ खातो. तोंडातल्या लाळग्रंथींपासून अन्नाचे पचन सुरू होते. तोंडातून अन्ननलिकेद्वारे ते आतड्यामार्गे प्रवास करत करत शौचावाटे बाहेर पडते. या संपूर्ण क्रियेमध्ये विविध रासायनिक प्रक्रियांचाही समावेश असतो. अन्नाच्या मोठ्या तुकड्यांचे, तसेच त्यातील पोषण तत्त्वांचे विघटन करणे इत्यादी क्रियादेखील पार पडल्या जातात. विविध पाचक द्रव्ये रासायनिक द्रव्यांद्वारे कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, अमिनो आम्ल यांच्या विघटनासाठी कार्यरत असतात. या पचनाच्या प्रक्रियेमध्ये अन्नाचे एकत्रितपणे जठरातील इतर द्रव्यांसोबत मिश्रण करून वेगवेगळी पाचकद्रव्ये तयार होत असतात; ज्यात पेप्सिन हे महत्त्वाचे पाचक द्रव्य आहे.

हेही वाचा… Health Specials : पावसाळ्यात त्वचारोगांपासून मुलांचे कसे कराल संरक्षण ?

पेप्सिन नावाचे एन्झाइम खाल्लेल्या अन्नाचे योग्यरीतीने पचन करण्यास मदत करते. पचनसंस्थेमध्ये पेप्सिन केवळ पोटातच सक्रिय असते. पेप्सिन आणि इतर घटकद्रव्यांच्या मदतीने पाचकरस अन्नाचा प्रवास सुखकर करतात. याच द्रव्यांच्या प्रमाणानुसार अन्नद्रव्याचा पीएचदेखील आकार घेत असतो. कमी पीएच पेप्सिनला अतिसक्रिय करू शकते आणि संतुलित पीएच पेप्सिनचे प्रमाण संतुलित राखू शकते. पेप्सिन किमान ८ पर्यंत पीएच असल्यास संतुलन राखू शकते आणि पेप्सिन कमी असेल तरी प्रथिनांचे पचन उत्तमरीत्या होऊ शकते. हायड्रोक्लोरिक आम्ल आणि हिस्टामाइन हे दोन घटक पेप्सिनचे प्रमाण अस्थिर झाल्यास पचनक्रियेचा समतोल बिघडवू शकतात. जेव्हा पीएच १ ते २ पर्यंत कमी होतो तेव्हा गॅस्ट्रीन, हिस्टामाइन व असिटेल कोलिन बाहेर पडतात आणि परिणाम म्हणजे हे गॅस्ट्रिक रस अन्ननलिकेपर्यंत परत येऊ शकतात. काही लोकांमध्ये ते स्वरयंत्रातदेखील प्रवेश करू शकतात; ज्यामुळे आंबट चवीचा त्रासदायक खोकलाही लागू शकतो.

हेही वाचा… Health Special: पावसाळ्यात पाणी किती, कोणते व कसे प्यावे?

पचनसंस्था कमकुवत असणे, असे आपण अनेक वेळा ऐकतो. मुळात शरीरातील पेप्सिनचे प्रमाण योग्य प्रकारे राखणे आवश्यक आहे. आणि त्याचसाठी पीएच कमी न होऊ देणे महत्त्वाचे आहे. आहारनियमन करताना कॉफी, शीतपेये, दारू, तंबाखू यांचे सेवन कमी करणे आवश्यक आहे. कोणताही पदार्थ खाताना किंवा कोणत्याही प्रकारचे खाणे खाताना अतिरिक्त चव व प्रमाण आणि अर्थात क्रम या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तुम्ही उठल्या उठल्या चहा, कॉफी पिणार असाल, पाण्याचे प्रमाण अत्यल्प असेल, भाज्या-फळांचे प्रमाण कमी असेल, खाण्याच्या वेळा अनियमित असतील, तर ॲसिडिटी ठामपणे मुक्काम करू शकेल.

हेही वाचा… Health Special: सायबरबुलिंग म्हणजे काय?

तसेच फक्त गोळ्या घेऊन तेलकट पदार्थ खाल्ल्यास तुम्ही आपोआप पचनसंस्थेला कमकुवत करत असता. त्यामुळे पचनसंस्थेच्या स्वास्थ्यासाठी तुमचे खाणे, पिणे, झोपणे, व्यायाम करणे एकत्रितपणे काम करत असते हे लक्षात घेणे आवश्यक आहे. तुमच्याकडून अजाणतेपणी उलटसुलट प्यायलेली शीतद्रव्ये, अपुरे पचन, खूप भूक लागलेली असताना तेलकट स्नॅक्स खाल्ले जाणे , अत्यल्प पाणी या कारणांमुळे पोट गुब्बारल्यासारखे होते. त्याला जेनेटिक नाही, तर तुमच्या आताच्याच सवयी कारणीभूत असतात. तेव्हा तुम्ही अपचन अंगावर न काढता, ते सुधारण्याकडे कल असू द्या!

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is pepsin so important in digestion hldc dvr
Show comments