पल्लवी सावंत पटवर्धन

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नव्या वर्षात पहिल्याच दिवशी मला संदीपचा मेसेज आला. मी यावर्षी पूर्ण शाकाहारी व्हायचं ठरवलंय आणि शाकाहार म्हणजे मला २०२४ पासून फक्त वनस्पतीजन्य आहार करून पाहायचंय. किमान पहिले सहा महिने. आणि मला हे जमायलाच हवं. मला खात्री आहे तू मदत करशील फक्त मला सांग आपण अचानक नॉनव्हेज बंद केलं तर चालेल का ?”
“अचानकपेक्षा हळूहळू कमी कर म्हणजे शरीराला सवय होईल”, इति मी. अचानक असं का बरं करावंसं वाटतंय तुला ? माझं कुतूहल जागृत झालं.
“ म्हणजे मी खूप ऐकतोय सध्या. लोकांना हलकं वाटतंय आणि गटवर चांगले परिणाम होतायत. वजन पण छान राहतंय म्हणून”
“पण आपण हळूहळू मांसाहार कमी करायचा. पहिले ३ महिने एक प्रयत्न करून पाहूया आणि त्यानुसार ब्लड टेस्ट पण करून घेऊ”
माझ्यातल्या आहारतज्ञाला नियमित ऑफिसमध्ये ट्रेन मधून प्रवास करणाऱ्या संदीपच्या आहारशैलीबद्दल आणि धकाधकीबद्दल २०२४ चं शाकाहारी आयुष्य खुणावताना दिसू लागलं.

आठवड्यातून ३ दिवस मासे हवेतच आसा आग्रह असणारा संदीप थेट पालकाचे रॅप्स खाताना दिसू लागला. माझ्या विचाराच्या तंद्रीत असताना त्याने मला शाकाहारी आहार त्यामुळे होणारे फायदे याबद्दल वाचलेले लेख पाठवले. शाकाहारामुळे बदललंय अमुक अमुकचं जगणं .” नव्या वर्षाच्या संकल्पामध्ये शाकाहार पहिल्या क्रमांकावर “ वनस्पतीजन्य आहारामुळे हृदयावर होणारे परिणाम , वजनावर होणारे परिणाम याबद्दल पुराव्यासह लिहिलेले उत्तमोत्तम लेख बहुल संदीपचा शाकाहाराकडे वाढलेला कल आणि संकल्पनेचा उगम मला सापडू लागला.

संदीपच्या ओळखीतील एका पन्नाशी उलटलेल्या ग्रुपने संपूर्ण शाकाहार हाच खरा आहार अशी मोहीम सुरु केल्याचं देखील समजलं. शाकाहाराबद्दल संदीपचा हा बदललेला विचार आणि त्याच्या सारख्या अनेक कॉर्पोरेट कार्यकर्त्यांच्या वारंवार मांसाहारहून शाकाहाराकडे वळण्याच्या विचाराने मला शाकाहार बद्दल आणखी विचार करण्यास प्रवृत्त केलं.

आणखी वाचा-Health Special : २०२४ चांगलं जावं यासाठी करुया या २४ गोष्टी 

पिढयानुपिढया आणि वर्षानुवर्षे आहाराची सुरुवात वनस्पतीजन्य पदार्थांपासून सुरु झाली किंवा प्राणीजन्य पदार्थांपासून झाली असं आपण वाचतो. महत्वाचा मुद्दा हा आहे की प्रत्येक मनुष्याच्या आहाराची सुरुवात आईच्या दुधापासून होते. आईच्या दुधामध्ये असणारी प्रथिने , संप्रेरके रोगप्रतिकारशक्ती वाढवणारे पोषणघटक याने सुरुवातीपासून आपल्या शरीराची जडणघडण व्हायला सुरुवात होते.

हळूहळू आपल्या आहारात फळे , धान्ये, तृणधान्ये यांचा समावेश होतो. आपलं आतडं , पचनेंद्रिये पूर्णपणे तयारीनिशी पदार्थ पचवू लागतात आणि आपण नेहमीच्या आहारातील पदार्थ वय वर्ष ३ नंतर पूर्णपणे सुरु करतो.

शाकाहारी पदार्थांचे पचन सहज होते- हे खरंय का ? तर नक्कीच मात्र जसजसे वय वाढते तसतशी शरीराची झीज आणि पचनेंद्रियांवर होणार परिणाम देखील बदलतो. ज्यांना नियमित ताजे अन्न खाण्याची सवय असते त्यांची पचनसंस्था उत्तम असते. कारण पचनसंस्थेला शिस्त असते. कोणताही पदार्थ खाताना तुम्ही तो कसा खाताय हेदेखील महत्वाचे ठरते.

आणखी वाचा-Health Special : आवळ्याचं काय करावं?

वनस्पतीजन्य पदार्थांमध्ये तंतूमय पदार्थ मुबलक प्रमाणात असतात त्यामुळे नेहमीच्या सल्ल्यांनुसार विनाकारण “भरपूर” खाणे खाल्ल्याने देखील पंचेंद्रियांवर ताण येऊ शकतो.

त्यामुळे खाताना नियम सवय म्हणून अंगीकारायला हवेत. शक्यतो पदार्थ शिजवून किंवा साधारण प्रक्रिया करून खा. उदाहरणार्थ फळे ताजी असताना खाणे उत्तम. भाज्या हलक्या शिजवून खाणे उत्तम किंवा भाज्यांचा अर्क करून पिणे उत्तम.

दूध आणि दुधाचे पदार्थ शाकाहारी आहारात समाविष्ट करत असाल तर शक्यतो त्यात केले जाणारे मिश्रण हे जास्तीत जास्त २ प्रकारचे इतकेच मर्यादित असावे.

उदा. दूध आणि धान्ये ( खीर)
दूध आणि तृणधान्ये ( खीर / जेवणातील उकड)
दही आणि कडधान्यांची पीठे( घावन , इडली यासारखे पदार्थ)
दही- पीठ आणि भाज्या
दही आणि फळे
ताक आणि पीठे

याचे महत्वाचे कारण हे की आपण कोणतेही पदार्थ एकत्र करताना त्यातील पोषणमूल्यांचा ऱ्हास होत नाही याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. एकाच वेळी सगळे पोषणघटक मिळावेत म्हणून फळे, दूध, धान्ये एकत्र करून खाल्ल्याने पचन संस्थेवर ताण येतो आणि अनावश्यक अॅसिडिटी अपचन यासारखे विकार वाढतात. पचन हलके व्हावे म्हणून शाकाहाराकडे वळताना कोणताही शाकाहारी पदार्थ ठराविक प्रमाणात खाणे आणि ठराविक वेगाने (हळूहळू ) खाणे अत्यंत महत्वाचे ठरते .

पुढच्या लेखात शाकाहाराबद्दल आणखी माहिती जाणून घेऊ ….

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why is the trend of vegetarianism growing hldc mrj
Show comments