भारतात आवडीने खाल्ल्या जाणाऱ्या अनेक फळांपैकी एक फळ म्हणजे जांभूळ. या फळाला Indian blackberry किंवा Syzygium cumini म्हणूनही ओळखले जाते. हे फळ पारंपरिकपणे त्याच्या संभाव्य आरोग्य फायद्यांसाठी वापरले जाते; विशेषतः मधुमेह नियंत्रित करण्यासाठी. त्याचे सकारात्मक परिणाम सुचवणारे काही पुरावे असले तरी हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की, मधुमेह नियंत्रणासाठी त्याची प्रभावीता आणि सुरक्षितता सिद्ध करण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे, असे डॉ. प्रियंका रोहतगी यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला दिलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे.
मधुमेहासाठी जाणून घ्या जांभळाचे फायदे
मधुमेहासाठी जांभळाचे फायदे काय ते समजून घेणे सोपे आहे. जांभळामध्ये अँथोसायनिन्स, इलाजिक ॲसिड व फ्लेव्होनॉइड्ससह विविध बायोएक्टिव्ह संयुगे (compounds) असतात; ज्यात अँटिऑक्सिडंट आणि दाहकविरोधी (Anti-inflammatory) गुणधर्म असतात. ही संयुगे इन्सुलिन सेन्सिटीव्हिटी सुधारण्यास, रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास व इन्सुलिन उत्पादनासाठी जबाबदार असलेल्या स्वादुपिंडाच्या बीटा पेशींचे (pancreatic beta cells) संरक्षण करण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त जांभळाचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) देखील कमी असतो, याचा अर्थ रक्तातील साखरेच्या पातळीवर तुलनेने किरकोळ प्रभाव पडतो. हे फळ फायबरने समृद्ध आहे; ज्यामुळे दीर्घ काळ तृप्तता मिळते आणि रक्तप्रवाहात ग्लुकोज सोडण्यास विलंब होतो.
हेही वाचा – दिवसा घेतलेली डुलकी तुमच्या मेंदूसाठी चांगली आहे का? काय सांगते संशोधन, जाणून घ्या…
जांभळाचे सेवन कसे करावे?
पण, नैसर्गिक साखर हीसुद्धा शर्करा आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात सेवन केल्यास रक्तातील ग्लुकोजच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. तुम्ही खात असलेल्या जांभळाचे प्रमाण हे तुमच्या रोजच्या शिफारस केलेल्या कार्बोहायड्रेटच्या सेवनावर अवलंबून आह. जांभळे अतिरिक्त कार्बोहायड्रेट म्हणून खाण्याऐवजी इतर काही खाद्यपदार्थांऐवजी (कार्बोहायड्रेटऐवजी) खाल्ली पाहिजेत. तसेच स्नॅक्स म्हणून जेवणादरम्यान फळे घेणे चांगले आहे. संतुलित आहारासाठी संयम आवश्यक आहे. जांभूळ खाण्याबाबत वैयक्तिक प्रतिसाद भिन्न असू शकतो. म्हणून मधुमेह असलेल्या लोकांना त्यांच्या वैयक्तिक सहनशीलता आणि प्रतिसादाचे मूल्यांकन करण्यासाठी जांभूळ सेवनानंतर त्यांच्या रक्तातील ग्लुकोजच्या पातळीचे निरीक्षण करणे योग्य ठरेल.
जांभळाची पाने, बिया व साल यांचे अर्क मधुमेहावर उपचारासाठी यशस्वी?
मधुमेह नियंत्रणासाठी जांभळे खाणे, त्याचा रस किंवा अर्क वेगवेगळ्या स्वरूपात घेणे अशा विविध पैलूंचा समावेश होतो.
PubMed मध्ये प्रकाशित झालेल्या जांभळाच्या फायद्यांवरील अभ्यासाच्या रिव्ह्युमध्ये असे म्हटले आहे की, जांभूळ मधुमेहाची लक्षणे कमी करते. जसे की, जास्त लघवी करणे. जांभळाची पाने, बिया व साल यांचे अर्क मधुमेहावर उपचार करण्यासाठी खूप यशस्वी आहेत. इंटरमीडिएट हायपरग्लाइसेमिया म्हणजेच प्रीडायबेटिस हा एक चयापचयाशी संबंधित आजार आहे; ज्यामध्ये रक्तातील ग्लुकोजची पातळी सामान्यपेक्षा किंचित वाढते. परंतु, मधुमेह होण्याइतपत ती वाढत नाही. हे विविध प्रकारच्या सूक्ष्म आणि मॅक्रो-व्हॅस्क्युलर (Micro- and Macro-Vascular) समस्यांशी संबंधित आहे. जांभळाच्या वाळलेल्या बिया आणि बियांचे चूर्ण मधुमेहाचे नियंत्रण करण्यासाठी भारतात वारंवार वापरले जाते. वर्षानुवर्षे रक्तातील साखरेची निरोगी पातळी राखण्यासाठी, तसेच हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आणि गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांवर उपचार करण्यासाठी जांभळाच्या बियांच्या पावडरचा नैसर्गिक उपाय म्हणून वापर केला जात आहे.
प्रीडायबेटीस नियंत्रित करण्यासाठी वापरले जाऊ शकते
जांभूळ हे प्रीडायबेटीस नियंत्रित करण्यासाठी संतुलित आहाराचा एक भाग म्हणूनही मानले जाऊ शकते. ही अशी स्थिती आहे की, जी सामान्य रक्तातील साखरेच्या पातळीपेक्षा जास्त असते; परंतु मधुमेह म्हणून वर्गीकृत करण्याइतकी जास्त नसते. टाईप-२मधुमेहाची सुरुवात रोखण्यासाठी किंवा टाळण्यासाठी प्रीडायबेटीस नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे.
जांभळाचा योग्य फायदा मिळवण्यासाठी सर्वांत सोपा उपाय म्हणजे फळ म्हणून कच्चे खाणे. जांभळाचा रस हा आणखी एक लोकप्रिय प्रकार आहे. फळांचा लगदा पाण्यात मिसळून आणि मिश्रण गाळून रस तयार करता येतो. काही लोक चव वाढवण्यासाठी त्यात थोडडासा मध किंवा लिंबाचा रस घालतात. आदर्श बाब म्हणजे रक्तातील साखरेचे संभाव्य नियमन करण्यासाठी जेवणापूर्वी ते घेतले पाहिजे.
हेही वाचा – दिवसाची सुरुवात Detox Drink घेऊन करावी का? काय सांगतात तज्ज्ञ, जाणून घ्या
वाळलेले काळे मनुके आणि जांभळाची पावडरही उपयुक्त असते.
वाळलेले जांभूळ ज्याला वाळलेले काळे मनुके किंवा जांभळाच्या बियांची पावडरदेखील म्हणतात. जांभळाच्या बिया सुकवून किंवा बारीक करून ते तयार केले. त्यांचे थेट सेवन केले जाऊ शकते किंवा विविध पदार्थांमध्ये ती पावडर वापरू शकतो. जसे की स्मूदी, दही किंवा ओट मील. ताजी फळे उपलब्ध नसताना जांभळाचे सेवन करण्याचा, जांभळाची पावडर हा आणखी एक सोईस्कर पर्याय आहे. ही पावडर फळाचा लगदा वाळवून आणि बारीक करून तयार केली जाते. जांभळाच्या पावडरचे पाणी, दूध किंवा इतर पेयांसह सेवन करू शकतो किंवा सॅलड्स, मिष्टान्न किंवा नाश्त्यामधूनही खाऊ शकतो. काही ब्रँड्स जांभळाचा रस तयार करतात; जो ताज्या किंवा वाळलेल्या जांभळांतून रस काढून आणि नंतर कॉन्सन्ट्रेट स्वरूपात कमी करून तयार केला जातो. दिलेल्या सूचनांनुसार जांभळांचे कॉन्सन्ट्रेट पाण्याने पातळ करू शकता आणि ते पेय म्हणून तुम्ही घेऊ शकता.
जांभळांचा अर्क आणि सप्लिमेंट, गोळ्या किंवा पावडरच्या स्वरूपात उपलब्ध आहेत. ही उत्पादने सामान्यतः जांभळाच्या बिया, अर्क किंवा साल यापासून तयार केली जातात. त्यांचे सेवन करताना उत्पादकांनी शिफारस केलेल्या डोससंबंधित सूचनांचे पालन करा किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
वय, एकूण आरोग्य आणि सध्याची कोणतीही वैद्यकीय परिस्थिती यांसारख्या वैयक्तिक घटकांवर अवलंबून प्रत्येकासाठी जांभळाच्या सेवनाचे योग्य प्रमाण बदलू शकते. विशेषत: मधुमेह नियंत्रणामध्ये जांभळांच्या सेवनासाठी मर्यादित वैज्ञानिक पुरावे व प्रमाणित शिफारशी असल्याने संयमाने सेवन करावे आणि वैयक्तिक सल्ल्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.
डिस्क्लेमर : लेखातील माहिती, सल्ला प्रत्येकाला जसाच्या तसा लागू होत नसल्याने, तो थेट आचरणात न आणता वैद्यकीय सल्ला घ्यावा.