सध्याच्या काळात फिटनेसला विशेष महत्त्व दिलं जातं. हृदयविकार, डायबेटिससारखे विकार होऊ नयेत, हे विकार झाले असतील तर ते नियंत्रणात राहावेत, लठ्ठपणा कमी व्हावा या उद्देशानं व्यायाम आणि योग्य आहारावर भर दिला जातो. वजन नियंत्रणासाठी आणि फिटनेससाठी जिममध्ये वर्कआउट करणं, धावणं, सायकलिंग, पोहणं आदी गोष्टी केल्या जातात. मात्र तुम्हालाही फिट व्हायचंय, पण व्यायामाचा कंटाळा येतो का? किंवा सुट्टीच्या दिवशी व्यायाम नकोसा वाटतो का? तर मग ही बातमी तुमच्यासाठी. आज आम्ही तुम्हाला असे व्यायाम सांगणार आहोत, जे सुट्टीच्या दिवशी सकाळी झोपेतून उठल्यावर बेडवरच करू शकता. त्यामुळे आता सुट्टीच्या दिवशीही तुमच्या व्यायामाला ब्रेक होणार नाही. आरोग्यतज्ज्ञ डॉ. मिकी मेहता यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
सुट्टीच्या दिवशी तुम्ही कितीही वाजता उठलात तरी किमान १०-१५ मिनिटे शरीर स्ट्रेच केल्याशिवाय बिछान्यावरून उठू नका. यामध्ये अगदी साधे व्यायाम करा. उदा. मान वर खाली करणे. हात वर खाली करणे, शरीराला वळवणे, पाय वर आणि खाली हलवणे. शरीर पूर्णपणे उलट दिशेने ताणणे यांचा समावेश होतो; हे पाठदुखी कमी करतात.
- सुट्टीच्या दिवशी प्रेक्षणीय स्थळे पाहण्यासाठी किंवा खरेदी करतानाही तुमचा चालण्याचा व्यायाम होतो. हा व्यायाम तुम्ही ठरवून करत नाही, त्यामुळे याचा फायदा असा की तुमचा तणाव, नैराश्य कमी होते आणि तुमचा मूड फ्रेश होतो.
- सुट्टीच्या दिवशी जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं शक्य नसल्यास आपण घरच्या घरी सूर्यनमस्कारांचा सराव करू शकता. यामुळे शरीराला अनेक लाभ मिळतात. सूर्यनमस्कार ही आसनांची एक मालिका आहे, ज्याद्वारे शरीरातील प्रत्येक भागाला व्यायाम मिळतो. हाताचे मनगट, कोपर, खांदे, पाठीचा कणा, गुडघे, पायाचे घोटे अशा सर्व सांध्यांना सूर्यनमस्कारामुळे फायदा मिळतो. शरीराची चपळता, स्फूर्ती वाढते. शरीर संवर्धनासाठी सूर्यनमस्कार उपयुक्त आहेत.
- या व्यायामामध्ये तुम्हाला खाली वाकून बोटांना स्पर्श करायचा आहे. प्रत्येक बाजूला किमान १०-१५ वेळा पुनरावृत्ती करा. हे स्ट्रेचिंग इतकं मस्त आणि आरामदायी आहे की जर तुम्ही ते एकदा केलं, तर तुम्हाला ते रोज करावसं वाटेल.
- या स्ट्रेचिंगसाठी घरातील रिकामी भिंत निवडा. आता आपला एक पाय वर करून भिंतीवर पूर्णपणे टेकवा. ही स्थिती शक्य तितकी धरून ठेवा, नंतर हळूहळू पाय आपल्या सामान्य स्थितीत परत आणा. आवश्यकतेनुसार विश्रांती घेऊन इच्छित असल्यास आपण हे २-४ वेळा पुन्हा करू शकता.
- सुट्टीच्या दिवशी थोडं नाच गाणं केलं तरी शरीराची हालचाल होते. नृत्य तुमचा मूड फ्रेश करू शकतो, रक्ताभिसरण वाढवू शकतो, फुफ्फुसाची क्षमता आणि ऑक्सिजन वाढवू शकतो. तसेच हृदयाची स्थिती सुधारते.
- प्रत्येक सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून किमान दोन किंवा तीनदा बॉडी मसाज करून घ्या. हे तुम्हाला तंदुरुस्त राहण्यास मदत करेल.
- आणि शेवटी, निसर्गाशी सुसंगत राहा. रात्री झोपताना खिडक्या उघड्या असाव्यात. बाहेर कडाक्याची थंडी असली तरीही घरामध्ये ताजी हवा येऊ द्यावी. सुट्टी ही फ्रेश होण्यासाठी असते, त्याचा पुरेपूर आनंद घ्या.
- नियमित व्यायामाने अनेक रोग टाळता येतात आणि शरीर निरोगी ठेवण्यास मदत होते. व्यायामाने शारीरिकच नव्हे, तर मानसिक आरोग्यही उत्तम राहते. नियमित व्यायामामध्ये ताणण्याचे व्यायाम, एरोबिक्स व श्वासाचे व्यायाम यांचा समावेश असावा. व्यायाम केल्याने माणसाला नवीन ऊर्जा प्राप्त होते. व्यायाम हा कोणत्याही वयातील व्यक्ती करू शकतो.
व्यायामाचे फायदे
- वजन नियंत्रित राहण्यास मदत
- शारीरिक क्षमतेमध्ये वाढ
- नैराश्याचे प्रमाण कमी होणे
- उत्साह वाढणे
- शरीर पिळदार होणे
- रोगप्रतिकार क्षमता वाढते
- स्नायू मजबूत होतात.
- वजन नियंत्रणात उपयुक्त
हेही वाचा >> चांगले कोलेस्ट्रॉल वाढवण्यासाठी तरुणाईने करावा आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
पचनक्रिया वेगवान होण्यासाठी व्यायाम अनेक प्रकारे उपयुक्त ठरतो. हे पोटाचा पीएच संतुलित करते आणि अन्न पचविण्याचा वेग वाढवते. हे चयापचय दर वाढवते आणि आतड्यांसंबंधी हालचाल वेगवान करते आणि अशा प्रकारे पचन वेगवान करण्यास उपयुक्त आहे.