Superfoods For Healthy Lifestyle : हिवाळ्यात जेव्हा तापमान कमी होत जाते, तेव्हा आपल्या शरीराला थंडीशी लढण्यासाठी, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी, तसेच उर्जा टिकवून ठेवण्यासाठी पोषक घटक हवे असतात. गरम सूप आणि चहा हे हिवाळ्यात सेवन करता येईल, असे महत्त्वाचे पदार्थ आहेत. तसेच, पालेभाज्यासुद्धा हिवाळ्यात पौष्टिक घटकांचा मुख्य स्रोत आहेत. हिवाळ्यात हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आपण हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी कशा फायदेशीर आहेत, हे जाणून घेणार आहोत. दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्ली येथील अपोलो हॉस्पिटलचे न्युट्रिशनिस्ट नारंग यांच्या हवाल्याने याबाबतची सविस्तर माहिती दिली आहे.

आरोग्यदायी हिरव्या पालेभाज्या

पालक – पालकामध्ये लोह, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन सी व फोलेट भरपूर प्रमाणामध्ये असते. पालक ॲनिमियाचा सामना करण्यासाठीही मदत करते; तसेच रोगप्रतिकार शक्तीसुद्धा वाढवते. पालकमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिनसारखे अँटिऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहेत. त्याशिवाय त्यामधील मॅग्नेशियम ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळते. पालक हा फायबरचा एक चांगला स्रोत आहे; जो पचनक्रिया सुधारतो. सूप, करी किंवा सॅलडमध्ये पालकचा वापर केला जातो. मसाले आणि इतर घटकांचा समावेश पालकाची चव आणखी वाढते.

Rubina Dilaik Fitness Secret
Rubina Dilaik : अभिनेत्री रुबिना दिलैक पिते ताजा टोमॅटोचा ज्यूस; तज्ज्ञांनी सांगितले याचे फायदे
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Jaggery on empty stomach
थंडीच्या दिवसात सकाळी उठल्यावर सर्वात आधी कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे?
Dragon fruit benefits for skin and hair
त्वचा आणि केसांसाठी ड्रॅगन फ्रूट फायदेशीर; जाणून घ्या खाण्याची योग्य पद्धत आणि वेळ
Demand to remove onion export duty from Piyush Goyal who is coming to Nashik news
नाशिकमध्ये येणाऱ्या पीयूष गोयल यांना कांदा निर्यात शुल्क हटविण्यासाठी साकडे
Benefits of lemon water Is Warm Lemon Water On An Empty Stomach Good for You? Expert Says This know more
Lemon water:सकाळी उठून लिंबू पाणी पिण्याची ७ कारणं, आरोग्यासाठी अप्रतिम फायदे वाचून व्हाल थक्क
Distribution of fake inheritance certificates by court clerk navi Mumbai news
न्यायालयातल्या लिपिकाकडून बनावट वारस दाखल्यांचे वाटप;  पनवेल येथील न्यायालयातील प्रकार, लिपिक अटकेत
Mumbai municipal corporation land auction
पालिकेचे भूखंड विकासकांना नकोसे, प्रतिसाद न मिळाल्यामुळे पुनर्निविदा काढण्याची पालिकेवर नामुष्की, मलबार हिलचा भूखंड वगळणार

हेही वाचा : Walking Pneumonia Vs Common Cold : वॉकिंग न्यूमोनिया आणि सामान्य सर्दीमधला फरक काय? वाचा, लक्षणे, उपाय आणि तज्ज्ञांचा सल्ला

केल- केल ही एक पालेभाजी असून, ती आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असते. त्यामध्ये व्हिटॅमिन ए, सी व के भरपूर प्रमाणात असतात. या भाजीमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते आणि ते आजारांपासून दूर ठेवते.

मोहरीच्या पानांची भाजी – आशियाई आणि भारतीय खाद्यसंस्कृतीमध्ये लोकप्रिय असलेली भाजी म्हणजे मोहरीच्या पानांची भाजी. या भाजीमध्ये सी, के व बीटा-कॅरोटीन ही व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. मोहरीच्या हिरव्या भाज्यांमध्ये सल्फरयुक्त संयुगे असतात; जी नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतात आणि शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत करतात.

मेथीची पाने (मेथी) : मेथीमध्ये लोह, फायबर व प्रोटीन्स यांचे प्रमाण भरपूर असते; ज्यामुळे थकवा दूर राहून, ऊर्जा टिकण्यासाठी साह्य मिळते. मेथीच्या सेवनाने रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यासाठी पराठा, डाळ, भाज्यांमध्ये मेथीचा समावेश करावा.

काश्मिरी साग (Collard Greens) : ही भाजी सर्वांत जास्त काश्मीरमध्ये दिसून येते. त्यामध्ये व्हिटॅमिन के, कॅल्शियम आणि सहज विरघळणारे फायबर खूप जास्त प्रमाणात असतात. ही भाजी कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते आणि हृदयाचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. या भाजीमध्ये ग्लुकोसिनोलेट्सदेखील असतात, जे कर्करोगाशी लढण्यास मदत करतात. हिवाळ्यात ही भाजी खाणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते.

हेही वाचा : Amla Health Benefits : रोज आवळ्याचा रस पिणे त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर ठरू शकतो का? सोनम बाजवाने सांगितलं रहस्य; पण तज्ज्ञांची मते काय?

राजगिरा पाने : राजगिरा म्हणजे लाल पालक, ज्याला आपण लाल माठाची भाजी, असेसुद्धा म्हणतो. त्यामध्ये लोह, कॅल्शियम व पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते; जे स्नायू आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी फायदेशीर आहे. राजगिरा हा फायबरयुक्त असून, त्यामध्ये अँटिऑक्सिडंट्सचासुद्धा समावेश आहे; जे पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करतात. त्याशिवाय राजगिऱ्याची भाजी ऑक्सिडेटिव्ह तणावसुद्धा कमी करते.

तुम्हाला आवडतात त्या हिरव्या पालेभाज्यांचे सेवन करा. या भाज्या ओल्या कापडात किंवा किंवा पेपर टॉवेलमध्ये गुंडाळून फ्रिजमध्ये ठेवा आणि वापरण्यापूर्वी या भाज्या त्यावरील धूळ किंवा कीटकनाशके दूर करण्यासाठी नीट स्वच्छ करून घ्या.

Story img Loader