कॉम्प्युटर्स इन बायोलॉजी अॅण्ड मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या अलीकडील संशोधनातून असे दिसून आले आहे, “पुरुष आणि स्त्रिया यांच्या चयापचयात फरक आहे आणि त्यामुळे त्यांना फायदाही भिन्न नाश्त्याच्या पदार्थांमधून मिळतो.”
अभ्यासात असे दिसून आले आहे, “पुरुषांचे शरीर उच्च-कार्बोहायड्रेट नाश्त्यामधून उर्जेवर प्रक्रिया करण्यासाठी अधिक सुसज्ज आहे आणि स्त्रिया निरोगी फॅट्सयुक्त न्याहारींना अधिक प्रभावीपणे प्रतिसाद देतात. संशोधनाचा निष्कर्ष जैविक फरकांना अनुसरून, जेवण हे ऊर्जेचा वापर आणि वजन व्यवस्थापन योग्य प्रकारे कसे करू शकते हे स्पष्ट करते.
पुरुष आणि स्त्रियांमध्ये चयापचय फरक समजून घ्या
पुरुष आणि स्त्रियांमधील चयापचय फरकाबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, बंगळुरू येथील क्लाउडनाईन ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट सुश्मिता एन. यांच्या मते, पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील चयापचयातील फरक हार्मोनल, आनुवंशिक आणि शारीरिक घटकांद्वारे बदलतात. शरीरात कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्सवर प्रक्रिया कशी होते यावरून त्याचा परिणाम होतो. पुरुष आणि स्त्रिया यांच्यातील चयापचयातील फरकाचे सविस्तर स्पष्टीकरण खालीलप्रमाणे
कार्बोहायड्रेट चयापचय (Carbohydrate Metabolism)
इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity)
स्त्रिया : रजोनिवृत्ती झाल्यानंतर स्त्रियांमध्ये इस्ट्रोजेनच्या प्रभावामुळे इन्सुलिनची संवेदनशीलता जास्त असते, ज्यामुळे त्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्यात अधिक कार्यक्षम बनतात.
पुरुष: पुरुषांमध्ये इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता जास्त असते आणि त्यामुळे त्यांना टाईप-२ चा मधुमेह होण्याचा धोका वाढतो.
ग्लुकोजचा वापर(Glucose Utilization)
स्त्रिया तत्काळ उर्जेसाठी, विशेषत: व्यायामादरम्यान ग्लुकोज अधिक प्रभावीपणे वापरतात.
दुसरीकडे पुरुष शारीरिक व्यायामादरम्यान ऊर्जेसाठी फॅट्सवर अधिक अवलंबून असतात.
कार्बोहायड्रेट साठवण (Carbohydrate Storage)
पुरुषांच्या उच्च स्नायूंच्या वस्तुमानामुळे त्यांच्या स्नायू आणि यकृतामध्ये ग्लायकोजेनचा मोठा साठा असतो.
स्त्रिया बऱ्याच काळापासून मध्यम तीव्रतेचा व्यायाम दिवसातून सहा किंवा अधिक तास करीत असतील, तर महिलांचे शरीर ग्लायकोजेन संरक्षित करण्यात अधिक कार्यक्षम राहते आणि ऊर्जेसाठी फॅट्सवर त्या अधिक अवलंबून असतात.
फॅट्स चयापचय (Fat Metabolism)
फॅट्स स्टोरेज (Fat Storage)
महिला: एस्ट्रोजेन नितंब (hips) आणि मांड्यांसारख्या त्वचेखालील भागात फॅट्स साठवण्यास प्रोत्साहन देते, जे पुनरुत्पादक आरोग्यासाठी (reproductive health) आवश्यक आहे.
पुरुष: अवयवांभोवती फॅट्स साठवण्याची प्रवृत्ती (visceral fat), ज्यामुळे आरोग्यास जास्त धोका निर्माण होतो.
फॅट्सचा वापर (Fat Utilization)
स्त्रिया : फॅट ऑक्सिडेशन उत्तम रीतीने होत असते; विशेषत: कमी तीव्रतेचा व्यायाम आणि पुनर्प्राप्ती कालावधी (recovery periods) या बाबतीत.
पुरुष : फॅट्स वापरण्यात कमी कार्यक्षम असतात. ते कर्बोदकांवर जास्त अवलंबून असतात.
व्यायामानंतर फॅट्सचा वापर (Post-Exercise Fat Burning)
महिलांचे शरीर व्यायामानंतर फॅट्सचा वापर करते. अगदी कमी तीव्रतेचा व्यायाम केला तरी तो त्यांना चयापचयासाठी फायदेशीर ठरतो.
चयापचयवर हार्मोनल प्रभाव (Hormonal Influence on Metabolism)
महिला : इस्ट्रोजेन फॅट्सच्या चयापचयाला समर्थन देते, इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते व व्हिसरल फॅट्सचा संचय कमी करते.
मासिक पाळी, गर्भधारणा व रजोनिवृत्ती यादरम्यान हार्मोनल चक्र ऊर्जेच्या गरजा आणि फॅट्स साठवण्यावर परिणाम करते.
पुरुष : टेस्टोस्टेरॉन स्नायूंच्या वाढीस चालना देते, बेसल मेटाबॉलिक रेट (BMR) वाढवते आणि विश्रांतीमध्ये कॅलरीजचा वापर करते.
तथापि, ते पुरुषांना व्हिसेरल फॅट्स जमा होण्यास आणि इन्सुलिन प्रतिरोधकतेस प्रवृत्त करते.
हेही वाचा – Curry controversy : स्वयंपाक केल्यानंतर कपडे बदलले पाहिजेत का? कारण जाणून घ्या…
स्त्रियांचा आणि पुरुषांचा आहार चांगल्या आरोग्यासाठी कसा बनवता येईल? (How can their diets be tailored for optimal health?)
सुष्मिता यांनी पुढील गोष्टी सुचवल्या.
वजन कमी करण्यासाठी (For Weight Loss)
पुरुष : उच्च प्रथिने, कमी कार्बोहायड्रेट्सयुक्त आहार या बाबी त्यांच्या उच्च बीएमआरला पूरक आहेत आणि त्या बाबी वजन कमी करण्यामध्ये त्यांना स्नायूंच्या वस्तुमानाचा फायदा घेण्यास मदत करतात.
महिला : हार्मोनल वायरिंगमुळे झटपट वजन कमी करणे आव्हानात्मक होते. दीर्घकालीन यशासाठी पोषक घटकांनी युक्त संतुलित आहार आणि सातत्यपूर्ण व्यायाम आवश्यक असतो.
हेही वाचा – रेल्वेतील चादर-बेडशीट महिन्यातून एकदा धुणे पुरेसे आहे का? तज्ज्ञांचे काय आहे मत?
ऊर्जा व्यवस्थापनासाठी (For Energy Management)
पुरुष : उच्च कार्बोहायड्रेट्सयुक्त नाश्ता त्यांच्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यास आणि शारीरिक हालचालींसाठी ऊर्जा देण्यास मदत करतात.
महिला : नट आणि अॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी आढळते, जी शाश्वत ऊर्जा आणि कार्यक्षम फॅट्सच्या चयापचयला समर्थन देते.
आरोग्यासाठी धोका (For Health Risks)
प्री-मेनोपॉझल स्त्रिया नैसर्गिकरीत्या हृदयविकार आणि मधुमेहापासून संरक्षित असतात; परंतु रजोनिवृत्तीनंतर वाढलेल्या जोखमीचा त्या सामना करतात.
पुरुषांना व्हिसेरल फॅट्सशी संबंधित आजार होण्याची अधिक शक्यता असते; परंतु जीवनशैलीत हस्तक्षेप करून वजन लवकर कमी केल्याने त्यांना फायदा होतो.