मोबाईल हा अनेकांच्या जीवनाचा एक अतिशय महत्वाचा भाग बनला आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मोबाईलशिवाय आपल्याला करमत नाही. बरेच लोक टॉयलेटला जातानाही मोबाईलसोबत घेऊन जातात. पण ही सवयी अनेकांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषत: पुरुषांनी टॉयेलटमध्ये जाताना मोबाईल घेऊ जाऊ नये. कारण नुकतच एका संशोधनातून पुरुषांसाठी टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे घातक ठरू शकते असा खुलासा करण्यात आला आहे. त्यामुळे पुरुषांनी मोबाईल टॉयलेटमध्ये घेऊन जाण्याआधी हा अहवाल काय सांगतो हे वाचलं पाहिजे.

इंडियाना युनिव्हर्सिटीच्या हेल्थ डिपार्टमेंटच्या यूरोलॉजिस्ट डॉ. हेलन बर्नी यांनी पुरुषांना इशारा देत म्हटले की, टॉयलेटमध्ये मोबाईल फोन वापरणे हानिकारक ठरू शकते. कारण बॅक्टोरिया असलेले लघवीचे शिंतोडे अनेक दिवस टॉयलेटच्या फर्शीवर तसेच राहतात. हे लघवीचे थेंब तीन फुटांपर्यंत पोहोचू शकतात,असेही अनेक संशोधनातून समोर आले आहे. फ्लशिंगच्या वेळी लघवी सहा फुटांपर्यंत जाऊ शकते. अशा स्थितीत लघवीचे थेंब तुमच्या मोबाईलपर्यंत पोहचण्याचीही शक्यता असते. मल आणि लघवीमध्ये अनेक बॅक्टेरिया आणि व्हायरस असतात. यामुळे जेव्हा तुम्ही टॉयलेट फ्लश करता तेव्हा बॅक्टोरिया पसरतात. फिजिक्स ऑफ फ्लुइड्सच्या संशोधनात असे आढळून आले की, लघवी जेव्हा फ्लश करतो तेव्हा ५.५ सेकंदात ५७ टक्के बॅक्टेरियाचे कण दूर पसरतात आणि बरेच दिवस ते तसेच टिकून राहतात, अशावेळी पुरुष लघवी करताना जेव्हा मोबाईल वापरतात तेव्हा मोबाईलमध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस पोहोचण्याची शक्यता जास्त असते,जे नंतर तुमच्या शरीरात प्रवेश करतात आणि तुम्हाला आजारी पाडतात. एवढेच नाही तर इतर अनेक जीवघेणे आजार यामुळे वाढू शकतात.

How to block your phone from tracking your location
तुमचं लोकेशन आता कोणीही ट्रॅक करणार नाही? ‘असा’ ब्लॉक करा तुमचा फोन
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Using phone in toilet cause health issues you should stop using your phone in toilet 5 neuro backed reasons shared by experts
तुम्हीदेखील शौचालयात फोन वापरता? मग ही सवय आताच बदला; अन्यथा आरोग्यावर होतील हानिकारक परिणाम, तज्ज्ञ सांगतात…
Disgusting Video viral
व्हायरल होण्यासाठी तरुणाने ओलांडली मर्यादा! टॉयलेट सीटजवळ बसून केलं किळसवाणं कृत्य; पाहा VIDEO
Shocking video of kid babbling in sleep due to mobile addiction how to get rid of mobile parents must watch viral video
पालकांनो आपल्या मुलांना मोबाइलपासून दूरच ठेवा! लहान मुलाचा ‘हा’ VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का
Baba abuses young girl on the name of treatment touches badly in front of her parents shocking video viral
“आई वडिलांना पोटच्या मुलीचा त्रास कळत नाही?” उपचाराच्या नावाखाली भोंदूबाबाचा तरुणीला अश्लील स्पर्श! VIDEO पाहून तुमचाही राग होईल अनावर
pune survey conducted of city dilapidated unused dilapidated public toilets
पिंपरी : वापरात नसलेली सार्वजनिक शौचालये पाडणार
Father holds child with one hand while driving a bike with other shocking video viral on social media
“बापाची मजबुरी की मूर्खपणा?”, एका हातात झोपलेलं लेकरू तर दुसऱ्या हातात बाईक; VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का

६५ टक्के लोकांना टॉयलेटमध्ये मोबाईल वापरण्याची सवय

डेली मेलच्या अहवालानुसार, NordVPN ने २०२१ चे सर्वेक्षण केले. ज्यात असे आढळू आले की. ९८०० प्रौढांपैकी ६५ टक्के लोक टॉयलेटमध्ये मोबाईल वापरतात. अनेकांचा समज असतो की, मोबाईल दुसऱ्या हाताने पकडल्याने जंतूंचा प्रसार कमी होतो आणि ते मोबाईलपासूनही दूर राहतात. पण हे चुकीचे आहे. डॉ. बर्नी यांनी सांगितले की, जरी तुम्हाला असे वाटत असेल की, तुम्ही स्वच्छ आहात आणि तुम्ही फक्त स्वतःला स्पर्श करत आहात, किंवा तुम्ही लघवी झाल्यानंतर फ्लश देखील करत नसाल तरीही, बरेच बॅकस्प्लॅश होतात.

सार्वजिनक शौचालय हे बॅक्टेरियांचे हॉटस्पॉट

डॉक्टरांच्या मते, सार्वजनिक शौचालये बहुतेक वेळा पूर्णपणे गलिच्छ असतात, जे बॅक्टेरियांचे हॉटस्पॉट असतात. अशा परिस्थितीत तुम्ही शौचालयातील कोणत्याही गोष्टींना स्पर्श करता तेव्हा धोकादायक जंतू आणि बॅक्टेरिया तुमच्या हातापर्यंत पोहोचतात. यात तुम्ही दाराला स्पर्श केला, बाथरुम फ्लश वापरला, भिंतीला हात लावला तरी तुम्ही अनेक बॅक्टेरियांच्या संपर्कात येता. शौचालय हे ठिकाण ई कोलाई, स्ट्रेप्टोकोकस, हेपेटाइटिस ए आणि ई सारख्या बॅक्टेरियांसाठी योग्य प्रजनन स्थळ आहे. त्यामुळे अतिसार, ताप, शिगेला असे जीवघेणे आजार होऊ शकतात.

डॉ. बर्नी यांनी असेही सांगितले की, अशा परिस्थितीत केवळ पुरुषांसाठीच नव्हे तर कुणीही टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे योग्य नाही, पण पुरुषांनी टॉयलेटमध्ये मोबाईल वापरणे अधिक धोक्याचे आहे.

Story img Loader