तुम्ही अनेकदा हे ऐकले असेल की मद्यपान न केल्यामुळे तुमच्या आतड्याचे आरोग्य सुधारते. परंतु, तुम्हाला माहीत आहे का की, मद्यपान कमी करणे किंवा मद्यपान न करणे हेच तुमच्या आरोग्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जादूसारखे काम करणारे, सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य आहे. पोषण प्रशिक्षक ब्रॅड जेन्सन (Brad Jensen) यांच्या मतानुसार, “मद्य म्हणजे पोषण मूल्य नसलेल्या कॅलरीजची योग्य व्याख्या आहे.”

“यात प्रथिने नाही, फॅट्स नाही आणि तांत्रिकदृष्ट्या कर्बोदकेही नाही. याचे कारण असे की, मद्यपान हे आतापर्यंतचे शून्य पौष्टिक मूल्य असलेले तांत्रिकदृष्ट्या चौथे मॅक्रोन्यूट्रिएंट (macronutrient) आहे. जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेत असाल आणि फॅट्स कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल, तर मद्यपान कमी केल्यास शरीराचा सकारात्मक प्रतिसाद मिळेल. मद्यपान केल्यानंतर दुसऱ्या दिवशी निर्जलीकरणामुळे आणि हँगओव्हरमुळे शरीरावर विपरित परिणाम होतो हे लक्षात ठेवा”, असे जेन्सनने इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हटले आहे.

Keep Your Hands And Feet Warm In Marathi
Keep Your Hands And Feet Warm : हिवाळ्यात हात-पाय खूप थंड पडतात? शरीर उबदार ठेवण्यासाठी ‘हे’ सोपे उपाय करून पाहा
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
Himanshi Khurana's Weight Loss Secret
दररोज पराठा खाणाऱ्या हिमांशी खुरानाने केले ११ किलो वजन कमी? जाणून घ्या, तज्ज्ञ याविषयी काय सांगतात?
benefits of eating saunf before bed
रात्रभर झोप लागत नाही? झोपण्यापूर्वी ‘हे’ खा; शांत झोप लागेल अन् तणावही होईल दूर
Do you let children drink tea
तुम्ही लहान मुलांना चहा प्यायला देता का? मग हा VIDEO एकदा पाहाच
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

जेन्सन यांच्या मते, “जरी तुम्ही सध्या जास्त मद्यपान करत असाल आणि आता दर आठवड्याला एक ते दोन ग्लास मद्य पिण्याचे ठरवले, तरीही ते तुमच्यासाठी आश्चर्यकारक लक्ष्य असेल. “आरोग्यासाठी चांगले असे कोणतेही मद्य नाही. शिवाय अनेकांना मद्य प्यायल्यानंतर घेतलेले निर्णय आवडत नाहीत. पण, जर तुम्ही मद्यपान करण्याचे ठरवले तर फक्त हे समजून घ्या की, “आरोग्याची काळजी घेण्याचा आणि फॅट्स कमी करण्याचा सर्वात मोठे रहस्य कदाचित तुमच्या डोळ्यांसमोर असू शकते.”

याबाबत सहमती दर्शवत, द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना, मुंबईच्या परेल येथील ग्लोबल हॉस्पिटल्सच्या ॲडल्ट हेपॅटोलॉजी आणि लिव्हर ट्रान्सप्लांटचे क्लिनिकल लीड एचओडी, डॉ. अमित मांडो यांनी सांगितले की, मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हे फिटनेस गेम चेंजर आहे.”

“मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हे फक्त एक फिटनेस हॅक नाही, ही एक परिवर्तनशील जीवनशैलीची (Transformative Lifestyle) निवड आहे, जी उत्तम आरोग्य आणि आरोग्याच्या तुमच्या प्रवासावर खोलवर परिणाम करू शकते. मद्यपान पूर्णपणे बंद केल्यास तुम्ही केवळ तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी करत नाही, तर तुम्ही तुमची झोप गुणवत्ता, शरीरातील पाण्याची पातळी आणि पौष्टिक मूल्यांचे सेवनदेखील वाढवत आहात,” असे पालघरमधील अधिकारी लाइफलाइन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे, सल्लागार फिजिशियन, डॉ. दीपक पाताडे यांनी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले.

मद्याच्या कॅलरी घनतेकडे अनेकदा लक्ष दिले जात नाही, ज्यामुळे वजन वाढण्यास आणि आरोग्याच्या विकासामध्ये अडथळा निर्माण होतो. डॉ. पाताडे म्हणाले की, “शारीरिक फायद्यांव्यतिरिक्त मद्यपान कमी केल्याने मानसिक स्पष्टता आणि लक्ष केंद्रित केले जाऊ शकते, हे प्रभावी प्रशिक्षण सत्रांसाठी आवश्यक आहे.”

हेही वाचा – झोपेतून उठताच कॉफी पिता का? आताच सोडा ही सवय! तज्ज्ञांनी सांगितले कारण… 

मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे मद्यपान बंद करणे तुमच्या आरोग्याला कशी मदत करते, ते येथे पाहा.

डॉ. अमित मांडो सांगतात:
आतड्याचे आरोग्य सुधारते : मद्याचे चयापचय होताना यकृतावर ताण येतो, ज्यामुळे सूज येणे किंवा दाह निर्माण होतो आणि नुकसान होऊ शकते. मद्य पूर्णपणे बंद करून तुम्ही तुमच्या यकृताला बरे होण्याची आणि चांगल्या पद्धतीने कार्य करण्याची संधी देता.

कॅलरी नियंत्रण : अल्कोहोलयुक्त पेये अनेकदा आवश्यक पोषक तत्त्वे न पुरवता अतिरिक्त कॅलरी शरीरामध्ये सोडतात. “मद्यपान न केल्यास तुम्ही केवळ कॅलरीजचे प्रमाण कमी करत नाही, तर एकूणच आरोग्यासाठी भरपूर पोषक तत्व असलेल्या पदार्थांसाठी शरीरामध्ये जागा बनवता.”

शरीरातील पाण्याची पातळी : मद्यपानामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते, ज्याला निर्जलीकरण म्हणतात. पुरेश्या प्रमाणात शरीरातील पाण्याची पातळी राखणे आरोग्यासाठी आवश्यक आहे. “मद्यपान कमी केल्याने शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवण्यास मदत होते, तुमच्या कसरत कार्यक्षमतेला आणि पुनर्प्राप्तीस समर्थन मिळते”, असे डॉ. मांडो म्हणाले.

झोपेची गुणवत्ता सुधारते : मद्य प्यायल्यास शांत झोपेमध्ये अडथळा निर्माण होतो. “मद्यपान पूर्णपणे बंद केल्यास तुम्ही तुमच्या झोपेची गुणवत्ता वाढवता, स्नायूंना बरे होण्यासाठी आणि एकूणच आरोग्याला चालना देता.”

हेही वाचा – तुमची झोप पूर्ण होत नाही का? तुमच्या ‘या’ पाच सवयींमुळे बिघडते तुमचे चयापचय

आणखी काय लक्षात ठेवावे?

दुखापतीचा धोका कमी : उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या डॉ. एकता सिंघवाल, एम.एस.सी. आहारतज्ज्ञ, यांच्या मते, “मद्यपानामुळे समन्वय, संतुलन आणि निर्णयक्षमता बिघडू शकते. शारीरिक हालचाली किंवा व्यायामादरम्यान दुखापत होण्याचा धोका वाढतो.”

Story img Loader