वाढत्या वयानुसार स्त्री आणि पुरुषांनी प्रथिनांच्या सेवनाचे प्रमाण कमी केले पाहिजे, असे बऱ्याचदा सांगितले जाते; पण हे एक मिथक आहे. खरे तर पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे कायम राखणे किंवा वृद्धांनी प्रथिनांच्या सेवनाचे प्रमाण वाढवणे हे स्त्री असो की पुरुष दोघांच्याही सर्वांगीण आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मुंबईच्या कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयातील क्लिनिकल आहार तज्ज्ञ फिओना संपत यांनी (Fiona Sampat clinical dietitian) वयोवृद्धांनी त्यांच्या आहारात पुरेशा प्रथिनांचा समावेश करण्याची पाच कारणे सांगितली आहेत.

आहारातील पुरेशा प्रमाणात प्रथिनांच्या सेवनाचे फायदे जाणून घ्या

हाडांचे आरोग्य : पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्यामुळे हाडांचे आरोग्य राखण्यास मदत होते आणि हाडांमधील खनिजाची घनता सुधारते. त्यामुळे ऑस्टिओपोरोसीस आणि फ्रॅक्चरचा धोका टळतो; जो सामान्यतः वयोवृद्ध लोकांमध्ये दिसून येतो.

स्नायूंचे वजन (Muscle Mass) : जसजसे लोकांचे वय वाढते, तसतसे स्नायूंचे वजन (Muscle Mass) ते गमावू लागतात. ही स्थिती सारकोपेनिया (Sarcopenia) म्हणून ओळखली जाते. स्नायूंचे वजन आणि सामर्थ्य टिकवून ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन करणे महत्त्वाचे आहे; जे दैनंदिन हालचालींना गतिशीलता आणि एकूण कार्यक्षमता राखण्यासाठी आवश्यक आहे.

हेही वाचा – तुमच्या शरीराच्या आकारानुसार योग्य जीन्स कशी निवडावी? जाणून घ्या टिप्स

चयापचयाचा दर (Metabolic Rate) : पुरेशा प्रमाणात प्रथिनांचे सेवन केल्याने चयापचयाचा दर वाढतो; जो सामान्यत: लोकांच्या वाढत्या वयासह कमी होत असतो. चयापचयाचा दर वाढल्यास स्नायूंचे वजन राखून, शरीराचे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते.

जखमा लवकर बरी करण्यास मदत : जसजसे लोकांचे वय वाढत जाते तसतशी चांगली रोगप्रतिकारशक्ती राखणे आणि शरीराची जखम लवकरात लवकर बरी होण्यासाठी मदत होते; जेणेकरून गंभीर आजार होऊ नये. या सर्व प्रक्रियेतील सर्वांत महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे प्रथिने.

भुकेवर नियंत्रण : भुकेवर नियंत्रण ठेवण्यास प्रथिने मदत करतात आणि बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटते. भुकेमध्ये सातत्याने बदल होणाऱ्या वृद्धांसाठी हे फायदेशीर आहे. त्यामुळे जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन टाळण्यास मदत होते.

हेही वाचा – DIY For Old Sarees: जुन्या साड्या फेकून देताय? थांबा, या सोप्या ट्रिक्सच्या मदतीने करू शकता पुन्हा वापर

त्याचबरोबर इतर महत्त्वाचे घटकही लक्षात घेतले पाहिजेत. जसे की, बिघडलेल्या मूत्रपिंडाचे कार्य आणि संपूर्ण आरोग्याची स्थिती तपासून, आपली शारीरिक क्षमता समजून घेणे आवश्यक आहे. आहारात कोणतेही कठोर बदल करण्यापूर्वी एखाद्याने आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. पण, निरोगी व्यक्तीने वाढत्या वयानुसार प्रथिनांचे सेवन कमी करण्याची आवश्यकता नाही. वृद्धांनी हाडांचे आरोग्य राखण्यासह स्नायूंचे रक्षण करण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात प्रथिने घेणे आवश्यक आहे.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why older adults should eat more protein power of protein snk
Show comments