लाल रंगाचे बीट आपण नेहमी खातो. त्याच्या चवीसह त्यामध्ये असलेली जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटिऑक्सिडंट्ससाठीदेखील तो ओळखला जातो. बीटाचे सेवन करणे आरोग्यासाठी उत्तम असते. पण, अलीकडील संशोधनात असे दिसून आले आहे की, “तो पारंपरिक मधुमेह नियंत्रणासाठी पूरक आहार घटक ठरू शकतो.”

इन्सुलिन संवेदनशीलतेवर बीट खाल्याने काय परिणाम होतो याबाबत, अपोलो हॉस्पिटलच्या मुख्य पोषणतज्ज्ञ, डॉ. प्रियांका रोहतगी यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली आहे.

Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Can drinking water with food cause gas or indigestion
जेवताना पाणी प्यावे का? जेवताना पाणी प्यायल्याने अपचनाचा त्रास होतो का? डॉक्टरांकडून घ्या जाणून…
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
sugar workers salary
कोल्हापूर: पंचवार्षिक पगारवाढ लांबल्याने ऐन दिवाळीत साखर कामगारांची तोंडे कडू
Belly fats how to burn belly fat using 5 20 30 method know from expert
Belly Fats: पोटाची चरबी वाढतेय? तज्ज्ञांनी सांगितलेली ‘ही’ पद्धत एकदा वापरून पाहा
How exactly does insulin work hldc
Health Special: इन्सुलिनचं कार्य नेमकं कसं चालतं?
what happens to blood sugar levels when you walk after a meal
जेवल्यानंतर चालल्यास खरोखर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होते का? तज्ज्ञांनी केला खुलासा….

इन्सुलिन संवेदनशीलतेवर बीट खाल्याने काय परिणाम होतो?

बीटमध्ये नायट्रेट्स असतात, जे नायट्रिक ऑक्साईडमध्ये रूपांतरित होते व ते रक्तवाहिन्यांमध्ये पसरते आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते; जे मधुमेह असलेल्यांसाठी एक महत्त्वाचे ठरते. याव्यतिरिक्त, बीटाचा कमी ग्लायसेमिक निर्देशांक (low glycaemic index) रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी योग्य पर्याय ठरतो. आहारात फायबरचा समावेश केल्याने ग्लायसेमिकचे उत्तम नियंत्रण करता येते आणि पचनक्रिया सुधारण्यामुळे आरोग्यासाठी फायदा होतो, जे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी आवश्यक आहे. बीट हा मँगनीजचे चांगला स्त्रोत आहेत, जे इंसुलिनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते आणि रक्तातील साखरेची पातळी स्थिर ठेवण्यास मदत करतात.

हेही वाचा – मधुमेही व्यक्तींसाठी भात कसा शिजवावा? कोणत्या प्रकारचा तांदूळ वापरावा? तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घ्या…

अभ्यासातून असे सुचवले जाते की, “बीटमध्ये असलेली बायोॲक्टिव्ह संयुगे (bioactive compounds), जसे की बीटलेन्स (betalains) आणि फेनोलिक (phenolic) संयुगे, ज्यात दाहकविरोधी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात. हे गुणधर्म ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि जळजळ कमी करण्यात मदत करू शकतात, ही समस्या मधुमेही व्यक्तींमध्ये अनेकदा अधिक जाणवते. शिवाय, प्राथमिक संशोधनामध्ये, इन्सुलिन संवेदनशीलता सुधारण्यासाठी बीटच्या सेवनाचे संभाव्य फायदे दिसून आले आहेत, तरीही या निष्कर्षांची खात्री करण्यासाठी अधिक सविस्तर अभ्यास करण्याची आवश्यकता आहे.

बीटचे सेवन केल्याने मधुमेह असलेल्या लोकांमध्ये निर्माण होणारी गुंतागुंतीची आरोग्यस्थिती कमी होऊ शकते. जसे की, अल्फा-लिपोइक ॲसिडमुळे मज्जातंतू आणि डोळ्यांना होणारे नुकसान कमी होऊ शकते. बीट खाण्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्याचा अतिरिक्त फायदा मिळतो. बीटमध्ये असलेले बीटासायनिन ट्यूमरची वाढ मंदावते.

हेही वाचा – मासिक पाळीमध्ये वेदनाशामक औषधांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतात तज्ज्ञ

किती प्रमाणात बीट सेवन करावे?

संयम ही गुरुकिल्ली आहे, विशेषतः मधुमेह असलेल्या लोकांसाठी शिजवलेल्या बीट किंवा कच्च्या स्वरूपात साधारणतः एक ते दीड कप समतुल्य प्रमाणात सेवण करणे योग्य असते. एक कप शिजवलेल्या बीटमध्ये सुमारे १५ ग्रॅम कार्बोहायड्रेटचे प्रमाण सेवन करणे आवश्यक आहे आणि रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू नये म्हणून संपूर्ण आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.

बीटचे दैनंदिन सेवन इतर पौष्टिक पदार्थांसह संतुलित आणि वैयक्तिक आहाराच्या आवश्यकतांनुसार असले पाहिजे. बीटचे सेवन प्रत्येकासाठी योग्य असू शकत नाही, विशेषत: विशिष्ट आरोग्य स्थिती किंवा परिस्थितींमध्ये.

किडनी स्टोन्स : बीटमध्ये ऑक्सलेटचे प्रमाण जास्त असते, हे संयुगे अतिसंवेदनशील व्यक्तींमध्ये किडनी स्टोन निर्माण करण्यास कारणीभूत ठरू शकते.

रक्तदाबाची औषधे : बीटमधील नायट्रेट घटकांमुळे रक्तदाब कमी होऊ शकतो, उच्च रक्तदाबासाठी औषधे घेत असलेल्या व्यक्तींनी सावधगिरी बाळगली पाहिजे.

अ‍ॅलर्जी : काही लोकांना बीटमधील विशिष्ट प्रथिनांमुळे अ‍ॅलर्जी असू शकते. लक्षणांमध्ये खाज सुटणे, सूज येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यांचा समावेश असू शकतो.

औषधे : बीट काही औषधांच्या संपर्कात आल्यानंतर, विशेषतः रक्त पातळ करणाऱ्या औषधांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांच्या उच्च व्हिटॅमिन के घटकांमुळे अँटीकोआगुलंट्सच्या (anticoagulants) क्रियेत व्यत्यय येऊ शकतो, ज्यामुळे रक्त गोठण्याच्या यंत्रणेवर परिणाम होतो.