Why Paresh Rawal Drink Their Own Urine : नवनवीन चित्रपट, मालिका यांचे निमित्त साधून अनेक सेलिब्रिटींची प्रॉडकास्टद्वारे मुलाखत घेतली जाते. या मुलाखतीदरम्यान अभिनेते आणि अभिनेत्री त्यांच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाबद्दल धक्कदायक व काही चांगले अनुभव आपल्या सगळ्यांच्या समोर मांडताना दिसतात. तर अनेक हिंदी सिनेमांमधून खळखळवून हसवणारे बॉलीवूडचे दिग्गज अभिनेते परेश रावल लल्लन टॉपमधील सौरभ द्विवेदी यांच्या मुलाखतीदरम्यान, गुडघेदुखीपासून बरं होण्यासाठी १५ दिवस स्वतःची लघवी प्यायल्याचे म्हटले आहे, त्यामुळे लघवी थेरपी, युरोफॅगिया किंवा युरोथेरपीचा पर्याय उपलब्ध झाला आहे.

पण, माणसाची लघवी एखाद्याचे आरोग्य सुधारते असा कोणताही वैज्ञानिक पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही, त्यामुळे या गोष्टीचा तपास घेण्यासाठी द इंडियन एक्स्प्रेसने बंगळुरू येथील केंगेरी येथील ग्लेनेगल्स बीजीएस हॉस्पिटलचे एचओडी आणि वरिष्ठ नेफ्रोलॉजिस्ट आणि मुख्य प्रत्यारोपण चिकित्सक डॉक्टर अनिल कुमार बीटी यांच्याशी चर्चा केली.

डॉक्टर अनिल कुमार म्हणाले की, मूत्रमार्गात चांगले बॅक्टेरिया असू शकतात. यावर आधारित मूत्र चिकित्सा, युरोफॅगिया किंवा युरोथेरपी ही एक पारंपरिक पद्धत आहे. ही पारंपरिक पद्धत जवळजवळ विष्ठेतील चांगल्या बॅक्टेरियासारखी आहे, ज्याची उपयुक्तता विष्ठा प्रत्यारोपणात सिद्ध झाली आहे. विष्ठा प्रत्यारोपण म्हणजे फिकल मायक्रोबायोटा ट्रान्सप्लान्टला (एफएमटी) विष्ठाप्रत्यारोपण असंही म्हटलं जातं. त्याचा वापर अनेक देशांमध्ये क्लिनिकल ट्रायल म्हणून पोटाच्या आजारासाठी केला जातो.

आतड्यांतील बॅक्टेरियाचे निरोगी संतुलन पुनर्संचयित करण्यासाठी केले जाते, जे अँटीबायोटिक वापर, काही रोग किंवा अगदी आहार यांसारख्या विविध घटकांमुळे बिघडू शकते. पण, लघवीच्या बॅक्टेरियामध्ये ही प्रभावीता आहे असे अजून तरी कोणत्याही संशोधनात आढळलेली नाही.

लघवी निर्जंतुकीकरण करण्याबद्दलची मिथक १९५० च्या दशकात झालेल्या मूत्रमार्गाच्या संसर्गाच्या (यूटीआय) अभ्यासापासून सुरू झाली आहे. या अभ्यासादरम्यान, यूटीआयची कोणतीही लक्षणे न दिसणाऱ्या लघवीच्या नमुन्यांवर “निगेटिव्ह” असे लेबल लावण्यात आले होते. बरेच लोक हे विसरतात की, लघवीत वाईट बॅक्टेरिया आणि कचरादेखील असतो, जो काही कारणास्तव रक्तप्रवाहातून फिल्टर केला जातो.

रिसर्च काय सांगतो (What Research Says)

अमेरिकन कॅन्सर सोसायटीच्या मते, उपलब्ध वैज्ञानिक पुरावे कर्करोगाच्या रुग्णांसाठी कोणत्याही स्वरूपात दिली जाणारी लघवी उपयुक्त आहे, या दाव्याचे समर्थन करत नाहीत. अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की, लघवीत प्रत्यक्षात असे बॅक्टेरिया असतात, जे सेवन केल्यास हानिकारक ठरू शकतात.

स्वतःची लघवी प्यायल्याने शरीरावर कसा परिणाम होतो (How Can drinking Urine Impact The Body)

सगळ्यात पहिल्यांदा तर शरीराला गरज नसल्यामुळे लघवी बाहेर काढून टाकली जाते, हे आपण समजून घेतले पाहिजे; त्यामुळे लघवी प्यायल्याने तुमच्या शरीरात सांद्रित कचरा पुन्हा येतो, ज्यामुळे मूत्रपिंडांना ते पुन्हा फिल्टर करावे लागते, ज्यामुळे मूत्रपिंडांवर अनावश्यक दबाव येतो. लघवीमध्ये ९५ टक्के पाणी, पाच टक्के विषारी पदार्थ, युरिया आणि क्रिएटिनिन असते; त्यामुळे आता तुम्हीच विचार करा, हे तुमचे मूत्रपिंड क्रिएटिनिन फिल्टर करत आहे. पण, तुम्ही ते बाहेर काढलेले क्रिएटिनिन तुमच्या शरीरात परत टाकता आहात, त्यामुळे स्वतःची लघवी पिणे जास्त हानिकारक असू शकते, असे डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.

तसेच डॉक्टरांनी असा दावा केला आहे की, लघवीचे पाच मिलीलिटरपर्यंत सेवन करणे सुरक्षित आहे. पण, नियमितपणे कमी प्रमाणातदेखील लघवी प्यायल्याने तुमच्या शरीरात विषारी पदार्थ वाढतात. लघवी कचरा असते आणि त्यात बरेच वाईट बॅक्टेरियादेखील असतात, ज्यामुळे तुमच्या शरीरात सर्व प्रकारच्या संसर्गाचा धोका वाढतो, त्यामुळे स्वतःची लघवी पिण्याचे कोणतेही आरोग्य फायदे सिद्ध झाले नाहीत आणि इलेक्ट्रोलाइट्सबरोबर त्याचे सेवन केले जाऊ शकत नाही.

याव्यतिरिक्त, स्वतःची लघवी पिणे तुमच्या आधीच्या आरोग्य समस्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या औषधांबरोबर मिक्स होऊ शकते; यामुळे उप-उत्पादने तयार होतात जी शरीरात पुन्हा प्रवेश करतात, ज्यामुळे औषधाच्या वापराची धार मंदावते. तसेच लघवी शरीराबाहेर पडल्यानंतर ती निर्जंतूक नाही तर दूषित असते, असे डॉक्टर कुमार म्हणाले आहेत.