How Pee Color Signs Diseases: मानवाचे शरीर हे निरोगी असेल तरंच ते दैनंदिन कामं उत्तम पद्धतीने आणि उत्साहाने करू शकते . तुम्ही आजारी पडायच्या आधी किंवा तुमच्या शरीरात जेंव्हा अंतर्गत बदल होत असतात तेंव्हा तुमचं शरीर तुम्हाला विविध संकेतही देतं असते. म्हणजेच प्रत्येक आजाराची विशिष्ट अशी लक्षणे आपण पाहतो. आपल्या शरीरात उद्भवणारे रोग किंवा समस्या लक्षणांवरून ओळखल्या जातात. तुमच्या त्वचेच्या आणि डोळ्यांच्या रंगावरून अनेक आजार ओळखले जात असतात . त्याचप्रमाणे तुमच्या लघवीचा रंगही तुमच्या आरोग्याशी संबंधित अनेक माहिती देऊ शकतो.
हेल्थ शॉट्सने डॉ. सुमित शर्मा, डायरेक्टर आणि एचओडी, यूरोलॉजी, रोबोटिक्स आणि रेनल ट्रान्सप्लांट, सनार इंटरनॅशनल हॉस्पिटल्स यांच्याशी संपर्क साधून मूत्राच्या रंगांमागील विविध अर्थांची माहिती दिली आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, लघवी केवळ आपल्या शरीरातून विषारी पदार्थच बाहेर काढून टाकण्याचे काम करत नाही. तर उलट ते शरीरातील द्रव पदार्थ संतुलित करण्याचं कामही करतं. युरिन टेस्टद्वारे मधुमेह, किडनी आणि मेटाबॉलिज्म संबंधित आजार याचा देखील शोध लावला जाऊ शकतो. एखादी व्यक्ती एका दिवसात किती वेळा लघवी करते यावरुन देखील आरोग्य स्थिती ओळखता. लघवीचा रंग फिकट पिवळा असावा असे तज्ज्ञांचे मत आहे.
लघवीचे रंग आणि आजाराचे संकेत –
1. गडद पिवळी लघवी – याचा अर्थ तुम्ही खूप कमी पाणी पित आहात. शरीरात पाण्याची कमी आहे
2. पांढरी फेसाळ लघवी – म्हणजे तुम्हाला किडनी स्टोनचा प्रॉब्लेम असू शकतो.
3. पाण्यासारखी लघवी – तुमच्या लघवीचा रंग हलका पिवळा किंवा पाण्यासारखा असेल तर चिंता करण्याची गरज नाही.
4. गुलाबी रंगाची लघवी – लाल रंगाची लघवी ही बहुतांश वेळा संसर्गामुळे असू शकते. तसेच हे मूत्रमार्गाच्या कर्करोगाचे एक गंभीर लक्षण असू शकते ज्याकडे अजिबात दुर्लक्ष केले जाऊ शकत नाही.
5. जांभळा आणि हिरवा रंग – मिथिलीन ब्लू नावाचा रंग अनेक कँडीज आणि काही औषधांमध्ये वापरला जातो. ज्यामुळे तुमच्या लघवीचा रंग हिरवा दिसू शकतो. परंतु या रंगाचे मूत्र मूत्रपिंड आणि मूत्राशयाशी संबंधित रोग देखील सूचित करते. स्यूडोमोनास एरुगिनोसा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे, तुमच्या लघवीचा रंगही निळा, हिरवा किंवा जांभळा दिसू शकतो.
हे ही वाचा<< वजन कमी करण्यासाठी रोज किती ग्रॅम हिरवी मिरची खावी? तज्ज्ञांनी सांगितले व फायदे व योग्य पद्धत
लघवीला वास येत असेल तर-
साधारण आपल्याला जर गोळ्या औषध सुरु असतील तर आपल्या लघवीला वास येतो. लघवीचा वास हा उग्रच असतो. मात्र तो अधिक तीव्र येत असेल तर तुम्ही एखाद्या आजाराने ग्रासलं असल्याचं ते लक्षण आहे. त्यामुळे लघवीला जाताना कायम लक्ष देणे गरजेचे आहे. उन्हाळा सुरु झाला कि आपल्याला लघवी संर्भात विविध समस्या जाणवू लागतात आग आग होणे, ठणके मारणे अशा अनेक समस्या उदभवतात त्यावेळी डॉक्टर आपल्याला भरपूर पाणी पिण्यास सांगतात. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेऊन आणि लघवीचा रंग वर दिलेल्या माहितीप्रमाणे तपासून गरज भासल्यास त्वरित डॉक्टरांची भेट घेणे गरजेचे आहे.