हेमंत ऋतूमध्ये अग्नी बलवान असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती प्रखर असते. साहजिकच त्या बलवान अग्नीला आहार सुद्धा तसाच बलवान द्यावा लागतो, अर्थात पौष्टिक, स्निग्ध (तेल-तूप असा स्नेहयुक्त), पचायला जड व ज्याच्या-त्याच्या भुकेनुसार पर्याप्त मात्रेमध्ये. मात्र असा आहार न घेता एखाद्या व्यक्तीने जर स्नेहविरहित, कोरड्या गुणांचा व सहज पचेल असा हलका आहार तोसुद्धा कमी प्रमाणात सेवन केला किंवा अन्नसेवन त्यागून लंघन केले (उपवास केला) तर अग्नी सर्वप्रथम उपलब्ध आहे त्या आहाराचे ज्वलन करुन उर्जानिर्मिती करतो. परंतु ती उर्जा पुरेशी नसल्यास देह-धातूंचे (body tissues)चे भक्षण करु लागतो अर्थात शरीराला हवी असलेली उर्जा निर्माण करण्यासाठी शरीर-पेशींचाच उपयोग केला जातो. त्यामध्ये सर्वप्रथम रस धातूचा क्षय (झीज) होते, जे शरीरामध्ये वात वाढण्यास कारणीभूत होते. हेमंतामध्ये वातप्रकोप संभवण्याचे हे महत्त्वाचे कारण.

याशिवाय वात (वायू) हा मुळात शीत गुणांचा असल्याने हेमंत ऋतूमध्ये वाढलेले शीतत्व (थंडावा) वायुचा शीत गुण वाढवून वातप्रकोपास कारणीभूत होऊ शकते, ज्याचे विधान चरकसंहितेचे भाष्यकार चक्रपाणी सुद्धा करतात. हिवाळ्यात हवेत वाढणारे रुक्षत्व (कोरडेपणा) सुद्धा शरीरामध्ये वाताचा रूक्ष गुण वाढवून वात वाढवते. या सर्व कारणांपायी हिवाळ्यात वात वाढून वातविकार होण्याची शक्यता बळावते.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Mumbai temperature increase
मुंबईचे तापमान वाढण्याची शक्यता
India Meteorological Department has warned a rain alert for 15 districts of Maharashtra state
‘या’ १५ जिल्ह्यांना १५ नोव्हेंबरला सतर्कतेचा इशारा !
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Ginger benefits in winter This winter superfood will help keep the body warm and healthy
आला हिवाळा…तब्येत सांभाळा! थंडीत आलं खाणं चांगलं, पण किती प्रमाणात खावं? जाणून घ्या

हेही वाचा : पोटात गॅस वाढवतात ‘हे’ ४ पदार्थ; पण ‘हा’ उपाय केल्यास मिळू शकतो झटक्यात आराम

तुमच्या वातविकाराचे मूळ हिवाळ्याशी जुळलेले असू शकते? ( संदर्भ-चरकसंहिता १.६.७)

हेमंत व शिशिर ऋतूमध्ये अग्नी प्रखर असताना अर्थात भूक व पचनशक्ती उत्तम असताना त्या अग्नीनुसार अन्नसेवन व्हावे अशी अपेक्षा असते.त्यातही गोड,स्निग्ध व पौष्टिक आहार घेणे आवश्यक असते. मात्र तसा आहार सेवन केला गेला नाही, उलट रुक्ष (कोरड्या) गुणांचा व हलका आहार आणि तोसुद्धा कमी प्रमाणात सेवन केला गेला तर विशेषतः रस धातूचा क्षय होतो आणि त्यापुढे रक्त, मांस, मेद अशा इतर देह-धातूंची (शरीर-घटकांची) योग्य पोषणाअभावी झीज (क्षय) होऊन वातप्रकोप होऊ शकतो, जो वातविकारांना आमंत्रण देऊ शकतो.

योग्य व पुरेशा अन्नाची उपलब्धी नसणे हे तर महत्त्वाचे कारण यामागे आहेच, जी भारतासारख्या विकसनशील देशाची व अनेक अविकसित देशाची गंभीर समस्या आहे. अशा पुरेसे अन्न न मिळणार्‍या मंडळींना काम व परिश्रम मात्र करावे लागतात. अशावेळी शरीराला पुरेसे पोषण नाही, मात्र कामाचा-परिश्रमाचा शरीरावर ताण अशी स्थिती होते. दुसरीकडे खेळाडू, व्यायामपटू व परिश्रम करणारे असे लोक, जे अन्न उपलब्ध असूनही शरीराला पुरेसे पोषण देणारा आहार (विशेषतः प्रथिनयुक्त आहार) घेत नाहीत किंवा घेऊ शकत नाहीत. तिसरा वर्ग म्हणजे झिरो फिगर व डाएटिंगच्या नादाला लागलेली आजकालची तरुण मंडळी (आणि प्रौढसुद्धा),जे या हिवाळ्यात सुद्धा अन्नसेवनावर नियंत्रण आणण्याची चूक करतात आणि त्याचवेळी वेगवेगळ्या प्रकारचे व्यायाम-खेळ करत असतात.

हेही वाचा : रोज रात्री १२ ला किंवा नंतर झोपत असाल तर तुमचं शरीर कसं बदलतं पाहा; वजन व कोलेस्ट्रॉलवर होणारा परिणाम व उपाय 

कष्टकरी वर्गाकडून होणारे परिश्रम व मेहनतीची कामे, व्यायामपटूंकडून होणारे व्यायाम, खेळाडूंचे वेगवेगळे खेळ यांमध्ये किंवा एकाच जागी बसून करावयाच्या वेगवेगळ्या कामांमध्येसुद्धा विशिष्ट अंगाशी संबंधित हाडे, सांधे, मांसपेशी (muscles),स्नायू (ligaments),कंडरा (tendons) यांवर त्या-त्या व्यायामाचा,खेळाचा किंवा कामाचा इतका ताण पडतो की त्यांना इजा होऊन त्यांची झीज होते. ही इजा व झीज भरुन काढण्यासाठी तितकाच पौष्टिक आहार घ्यायला हवा.जो घेतला गेला नाही तर त्या इजा व झीज भरुन येत नाहीत आणि ते-ते अंग कमजोर होत जाते. तरीही परिश्रम,खेळ,व्यायाम किंवा काम सुरुच राहिल्यास त्या-त्या अंगाची दुखणी सुरु होतात, ज्यांना आपण वेगवेगळ्या आजारांची लेबल्स लावतो. या सर्व वेदनायुक्त रोगांना आयुर्वेदाने ’वातविकार’ म्हटले आहे.

तासनतास उभे राहिल्याने होणारी गुडघेदुखी, वाकून कामं करावी लागल्याने होणारी कंबरदुखी, हात वा खांदे उंचावणे, जड वस्तू उचलणे, खेचणे, ढकलणे वगैरे कामांमुळे होणारी खांदेदुखी, दीर्घकाळ मान वाकवून कामे केल्याने होणारी मानदुखी,पोक काढून बसल्याने होणारी पाठदुखी,अखंड लिहिणे-संगणकावर वा मोबाईलवर सतत टाईप करणे यांमुळे संभवणारी बोटंदुखी- मनगटदुखी वगैरे वातविकारांमागे त्या-त्या अंगांवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण हे तर मुख्य कारण आहेच, मात्र त्याचबरोबर त्या-त्या अंगांना ते काम करण्यासाठी पर्याप्त पोषण न मिळणे हे सुद्धा महत्त्वाचं कारण असते,जे विशेषकरुन हिवाळ्यामध्ये घडून येते.

हेही वाचा : एक महिना सिगारेट पूर्ण बंद केल्याने शरीरासह मनाला मिळणारे फायदे वाचाच; डॉक्टरांनी सांगितल्या अडचणी व उपाय 

तासनतास उभे राहिल्याने होणारी गुडघेदुखी, वाकून कामं करावी लागल्याने होणारी कंबरदुखी, हात वा खांदे उंचावणे, जड वस्तू उचलणे, खेचणे, ढकलणे वगैरे कामांमुळे होणारी खांदेदुखी, दीर्घकाळ मान वाकवून कामे केल्याने होणारी मानदुखी, पोक काढून बसल्याने होणारी पाठदुखी, अखंड लिहिणे-संगणकावर वा मोबाईलवर सतत टाईप करणे यांमुळे संभवणारी बोटंदुखी- मनगटदुखी वगैरे वातविकारांमागे त्या-त्या अंगांवर पडणारा अतिरिक्त कामाचा ताण हे तर मुख्य कारण आहेच, मात्र त्याचबरोबर त्या-त्या अंगांना ते काम करण्यासाठी पर्याप्त पोषण न मिळणे हे सुद्धा महत्त्वाचं कारण असते, जे विशेषकरुन हिवाळ्यामध्ये घडून येते. हिवाळ्यात पौष्टिक (त्यातही प्रथिनयुक्त आणि तूपवगैरे स्नेहयुक्त) आहाराची गरज इथे अधोरेखित होते, ज्याला आयुर्वेदाने नितांत महत्त्व दिलेले आहे.