हेमंत ऋतूमध्ये अग्नी बलवान असतो, म्हणजे भूक व पचनशक्ती प्रखर असते. साहजिकच त्या बलवान अग्नीला आहार सुद्धा तसाच बलवान द्यावा लागतो, अर्थात पौष्टिक, स्निग्ध (तेल-तूप असा स्नेहयुक्त), पचायला जड व ज्याच्या-त्याच्या भुकेनुसार पर्याप्त मात्रेमध्ये. मात्र असा आहार न घेता एखाद्या व्यक्तीने जर स्नेहविरहित, कोरड्या गुणांचा व सहज पचेल असा हलका आहार तोसुद्धा कमी प्रमाणात सेवन केला किंवा अन्नसेवन त्यागून लंघन केले (उपवास केला) तर अग्नी सर्वप्रथम उपलब्ध आहे त्या आहाराचे ज्वलन करुन उर्जानिर्मिती करतो. परंतु ती उर्जा पुरेशी नसल्यास देह-धातूंचे (body tissues)चे भक्षण करु लागतो अर्थात शरीराला हवी असलेली उर्जा निर्माण करण्यासाठी शरीर-पेशींचाच उपयोग केला जातो. त्यामध्ये सर्वप्रथम रस धातूचा क्षय (झीज) होते, जे शरीरामध्ये वात वाढण्यास कारणीभूत होते. हेमंतामध्ये वातप्रकोप संभवण्याचे हे महत्त्वाचे कारण.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा