तुम्ही कधी मुळ्याची पाने खाल्ली आहेत का? तुम्हाला माहीत आहे का हिवाळ्यात तुमच्या आहारात मुळ्याच्या पानांचा समावेश आवर्जून केला पाहिजे. पण का? यामागे नक्की काय कारण आहे. मुळ्याच्या पानांचे फायदे काय आहेत याबाबत तज्ज्ञांकडून सविस्तर जाणून घ्या….

एका इन्स्टाग्राम पोस्टमध्ये आयुर्वेदिक एनोरेक्टल सर्जन डॉ. वरुण शर्मा यांनी सांगितले, “तूप, जिरे व मीठ घालून बनवलेली मुळ्याच्या पानांची भाजी म्हणून खाऊ शकता. कारण- ते हलके, पचण्यास सोपे अन्न आहे. शरीरातील वात, पित्त व कफ संतुलित करण्यास मदत करते. मुळ्याच्या पानांमध्ये अ, ब व क ही जीवनसत्त्वे, कॅल्शियम, मॅग्नेशियम व फॉस्फरस हे आरोग्यदायी पौष्टिक घटक असतात आणि ते लघवीच्या समस्या दूर करण्यासाठी चांगले असतात. ही भाजी मूळव्याधासारख्या आजारांमध्येदेखील उपयुक्त आहे.”

हैदराबादच्या एल. बी. नगर येथील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहार तज्ज्ञ डॉ. बिराली श्वेता यांनी याबाबत सहमती दर्शवली आणि दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले, “मुळ्याची पाने हे पौष्टिकतेचे एक शक्तिशाली केंद्र आहे, ज्याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जाते; परंतु ते तुमच्या हिवाळ्यातील आहारात स्थान देण्यास पात्र आहे.”

” अ, क व के या जीवनसत्त्वांनी समृद्ध असलेली मुळ्याची पाने रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासह दृष्टी सुधारतात आणि निरोगी त्वचा राखण्यास मदत करतात; जी बाब विशेषतः हिवाळ्यात महत्त्वाची आहे. त्यामध्ये अँटीऑक्सिडंट्सदेखील जास्त असतात आणि त्यामुळे शरीराला हंगामी संसर्गांशी लढण्यास मदत होते,” असे डॉ. बिराली म्हणाल्या आहेत.

“कॅल्शियम, लोह व मॅग्नेशियम यांनी समृद्ध मुळ्याची पाने हाडे मजबूत करतात आणि एकूणच आरोग्य सुधारतात. त्यातील उच्च फायबर घटक पचनास समर्थन देऊन, बद्धकोष्ठता प्रतिबंधित करते आणि यकृत विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते. त्याव्यतिरिक्त मुळ्याच्या पानांमध्ये अशी संयुगे असतात, जी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी तो एक चांगला पर्याय ठरतो,” असे डॉ. बिराली म्हणाले.

मुळ्याच्या पानांचे सेवन कसे करावे? (How to have it?)

“पण, मुळ्याची पाने पराठे किंवा सूपमध्ये मिसळून किंवा भाजी म्हणून खाल्ल्याने उबदारपणा आणि पोषण मिळते; ज्यामुळे थंड हवामानात तुम्हाला ऊर्जा मिळते,” असे डॉ. बिराली म्हणाले.

“दूषित पदार्थांपासून दूर राहण्यासाठी आणि संपूर्ण हंगामात मुळ्याच्या पानांचे आरोग्यदायी फायदे अनुभवण्यासाठी ते पूर्णपणे स्वच्छ केले गेले आहेत ना याची खात्री करा,” असेही डॉ. बिराली म्हणाले.

“जर विचार न करता मुळ्याच्या पानांचे सेवन केले, तर पोटदुखी, पोटफुगी, गॅस आणि अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठीसारख्या अॅलर्जीक प्रतिक्रियांसारख्या जठररोगविषयक समस्या उद्भवू शकतात” असा इशारावजा माहिती झायनोवा शाल्बी हॉस्पिटल मुंबईच्या आहारतज्ज्ञ जिनल पटेल यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला दिली.

“मुळ्यामुळे मळमळ, उलट्या व अतिसारदेखील होऊ शकतो; ज्यासाठी त्वरित वैद्यकीय मदत घ्यावी लागते. मुळ्याच्या पानांचा आहारात समावेश करताना अत्यंत सावधगिरी बाळगा आणि तज्ज्ञांनी शिफारस केलेल्या प्रमाणातच मुळ्याच्या पानांचे खा. अतिरेक करणे हे निषेधार्ह आहे,” असे पटेल म्हणाले.

Story img Loader