Health Special: “पावसाळ्यात सुद्धा हिवाळ्यासारखीच थंडी असते, मग जशी व जितकी भूक हेमंत-शिशिर ऋतुमध्ये लागते तशी ती प्रावृट्‌-वर्षा ऋतुमध्ये का लागत नाही?” असा प्रश्न पडणे स्वाभाविकच आहे. तर यामागील आयुर्वेदाचा विचार समजून घ्यायला हवा…

हिवाळ्यातील प्रबळ अग्नी

हिवाळा व पावसाळा यांमध्ये वातावरणात गारवा असूनही पावसाळ्यात भूक का वाढत नाही, याचे स्पष्टीकरण महर्षी सुश्रुतांनी दिले आहे. हिवाळ्यात भूक वाढते ती घाम बाहेर फेकणारी त्वचेवरील सूक्ष्म रंध्रे (छिद्रे) बंद झाल्यामुळे, जी हिवाळ्यातल्या थंडाव्यामुळे संकोचतात. त्यामुळे या छिद्रांमधून घामावाटे शरीराबाहेर पडणारा अग्नी (उष्णता) हिवाळ्यात बाहेर न पडता शरीरातच आतल्या आत कोंडून अग्नी प्रबळ होतो आणि भूक व पचनशक्ती वाढते.

Health, Diet, Monsoon,
Health Special: वर्षाऋतूमधील आहार
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
Health, Health Special, problem,
Health Special: पावसाळ्यात अपचनाचा त्रास अधिक का होतो?
Improve Gut Health
आतड्यांमधील जमलेली घाण झपाट्याने काढून टाकतील ‘हे’ ५ पदार्थ? सेवनाची ‘ही’ पद्धत जाणून घ्या
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
Why you should steer clear of sprouted potatoes
कोंब आलेले बटाटे खाताय? थांबा, असे करण्यापूर्वी बटाट्यांचा आरोग्यावर काय परिणाम होतो ते जाणून घ्या
foods to avoid in monsoon
पावसाळ्यात दूर राहा ‘या’ ७ पदार्थांपासून; आहारतज्ज्ञ म्हणतात, अन्यथा मिळेल अनेक आजारांना आमंत्रण!
Amala Paul blessed with baby boy
Video: दुसऱ्या लग्नानंतर सात महिन्यांनी आई झाली अभिनेत्री, बाळाचं नावही ठेवलंय खूपच खास, पतीने शेअर केला व्हिडीओ

हेही वाचा…Health Special: पावसाळ्यात अपचनाचा त्रास अधिक का होतो?

भूक वाढते पण अन्नपचनात अडचणी

पावसाळ्यात मात्र तशी स्थिती नसते. ज्या थंडाव्यामुळे अग्नी प्रज्वलित होऊन भूक व पचनशक्ती वाढते, तो थंडावाच मुळात या उभय ऋतूंमध्ये भिन्न-भिन्न असतो. हिवाळ्यातला थंडावा हा कोरडा असतो, तर पावसाळ्यातला ओला गारवासुद्धा त्वचेवरील सूक्ष्म रंध्रांचा संकोच करतो, त्यामुळे पावसाळ्यात सुद्धा काही प्रमाणात भूक वाढलेली दिसते, परंतु ती हिवाळ्याप्रमाणे स्वस्थ भूक नसते. असे का? तर पावसाळ्यातल्या त्या गारव्याला ओलाव्याची जोड असते. हवेतला ओलावा त्वचेची रंध्रे कोरड्या हवेप्रमाणे पूर्णतः संकोचू देत नाही, त्यामुळे भूक वाढल्यासारखी वाटते; मात्र व्यवस्थित लागत नाही आणि अन्नाचे पचनही नीट होत नाही.

ओलाव्याला गारव्याची जोड

महर्षी सुश्रुतांच्या श्लोकावर भाष्य करताना सुश्रुतसंहितेचे भाष्यकार आचार्य डल्हण म्हणतात की, पावसाळ्याआधीच्या उन्हाळ्यातल्या कोरड्या हवेमुळे शरीरामध्ये वात वाढलेला असतो. कारण कोरडेपणा हा वाताचा प्रमुख गुण आहे. उन्हाळ्यात शरीरामध्ये जमत गेलेला तो वात पावसाळ्यात ओलाव्याला गारव्याची जोड मिळाल्याने प्रकुपित होतो, ज्याला ‘शीतवात’ असा शब्द त्यासाठी सुश्रुतांनी वापरला आहे. हा शीतवात म्हणजेच गारव्याची जोड मिळाल्याने बळावलेला वात शरीरातल्या अग्नीला प्रबळ न करता उलट अवरोधित करतो म्हणजे अग्नीला प्रज्वलित होण्यापासून अडवतो, ज्यामुळे भूक व पचनशक्ती मंदावते.

हेही वाचा…पावसाळ्यात तुम्हालाही यूटीआयचा त्रास जाणवतोय? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि योग्य उपचार पद्धती

ओलाव्यामुळे अग्निमांद्य

याशिवाय, पावसाळ्यातल्या गारवा असला तरी अधुनमधून सूर्यदर्शन होत असते, ज्यामुळे घाम येत राहतो अर्थात घाम काढणारी रंध्रे बंद होत नाहीत आणि अग्नी (उष्णता) शरीरात कोंडला न जाता उलट बाहेर फ़ेकला जातो व अग्निमांद्य होते. याशिवाय पावसाळ्यात शरीरामध्ये वाढलेला ओलावा (क्लिन्नता) अग्नीला प्राकृतरित्या प्रज्वलित तर होऊ देत नाही, उलट आपले पचनाचे कार्य व्यवस्थित करु न शकणारा असा विदाही बनवतो, ज्यामुळे अन्नाचे अपचन होऊन पित्ताचा त्रास वाढतो.

पावसाळ्यात शरीर कमजोर होते

या संदर्भात आयुर्वेद-शास्त्रकारांनी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे, तो म्हणजे हेमंत ऋतूमध्ये बलवान शरीरांमध्येच अग्नी प्रबळ होतो. हेमंत ऋतूमध्येच वातावरण व देहस्थिती अशी असते की, मानवाचे शरीर बलवान होते आणि या उलट पावसाळ्यामध्ये जरी वातावरणात गारवा असला तरी शरीर बलवान नसून उलट कमजोर झालेले असते. त्यामुळे वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद होतो, तर हेमंत ऋतूमध्ये निसर्गतः बल उत्तम असते, भूक वाढल्याने अन्नाचे व्यवस्थित पचन होते व शरीराचे बल अधिक वाढते आणि बल वाढले की, अग्नी अधिकाधिक प्रबळ होत जातो. (संदर्भ-अष्टाङ्गहृदय १.३.४२, अरुणदत्तकृत्‌सर्वांगसुंदरा व्याख्या)

हेही वाचा…Health Special: फणसाच्या बियांमध्ये दडलंय काय?

वाढलेला वात आणि पित्तसंचय

वर्षा ऋतूमध्ये आदान काळाचा प्रभाव असल्याने माणसाचे शरीर दुर्बल होते आणि या अवस्थेमध्ये अग्नी सुद्धा दुर्बल होतो, असेही अष्टाङ्गहृदय ग्रंथाचे भाष्यकार आचार्य हेमाद्री सांगतात. दुसरीकडे प्रावृट‌ ऋतूमध्ये तीनही दोषांचा प्रकोप होतो, तोसुद्धा अग्नीचे कार्य प्राकृत होऊ देत नाही. त्रिदोष प्रकोपामुळे अग्निमांद्य आणि अग्निमांद्यामुळे त्रिदोष प्रकोप असे हे दुष्टचक्र असते, ज्याच्या परिणामी भूक व पचनशक्ती मंदावते. एकंदर पाहता वर्षा ऋतूमध्ये पावसाळ्यातले ओलसर वातावरण, त्याला मिळालेली गारव्याची जोड, त्यामुळे शरीरामध्ये वाढलेला ओलावायुक्त थंड गुणांचा वात (थंडाव्यामुळे वाढलेला वात), दुसरीकडे पित्ताचा संचय,निर्बल शरीर, बल हिरावून घेणारा आदान काळ आणि सतत जलवर्षावामुळे शरीराची निष्क्रियता या सर्व कारणांच्या एकत्रित परिणामांमुळे अग्नी मंद होऊन भूक व पचनशक्ती कमजोर करतो.