याआधी आपण शस्त्रक्रियेआधीच्या व्यायामाचं महत्व ‘प्रीहॅबिलीटेशन’ या लेखात बघितलं आहे. आज आपण शस्त्रक्रियेनंतर आयुष्य पूर्ववत होण्याची प्रक्रिया म्हणजेच ‘रिहॅबिलिटेशन’ याबद्दल जाणून घेऊया. शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करावे लागतात हे आजकाल बहुतेकांना माहिती असतं, बहुतांश वेळा शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर रुग्णांना फिजिओथेरपीसाठी रेफर करतात. मग हा लेख कशासाठी? शस्त्रक्रियेनंतर व्यायाम करायचे हे सगळ्यांना माहिती असलं, तरी ही प्रक्रिया शास्त्रीयदृष्ट्या होणं, तज्ज्ञ फिजिओथेरपिस्टच्या मार्गदर्शनाखाली होणं, ठराविक कालावधीमध्ये होणं आवश्यक आहे या बाबींकडे साफ दुर्लक्ष केलं जातं.

कुठे चुकतंय?

शस्त्रक्रियेनंतर फक्त रुग्ण अॅडमिट असेपर्यंत (म्हणजे सुरूवातीचे ३-४ दिवस) फिजिओथेरपिस्ट कडून शास्त्रीय पद्धतीने व्यायाम केले जातात, त्यानंतर व्यायाम करण्याची आवश्यकता, गरज रुग्णांना त्यांना समजेल अशा पद्धतीने समजावून सांगितलं जात नाही. रुग्णांना घरी करायला व्यायाम शिकवले जातात, ते रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक घरी तितक्या सफाईदारपणे आणि अचूकपणे करू शकत नाहीत, साहजिकच त्याचे जे परिणाम दिसायला हवेत तसे दिसत नाहीत. रूग्णाला पूर्ववत जगण्यात अडचणी येतात.

nashik police
नाशिक: सिडकोत पोलीस संचलन
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
Absence of doctors other staff at Aarey hospital beds Tribal patients suffering for treatment Mumbai print news
आरे रुग्णालय रुग्णशय्येवर डॉक्टर, अन्य कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती; आदिवासी रुग्णांची उपचारांसाठी पायपीट
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
EPF Pension Scheme Eligibility
EPF Pension Schemeसाठी तुम्ही आहात का पात्र? जाणून घ्या काय आहे पात्रता, आर्थिक सुरक्षा आणि करबचत फायदे

हेही वाचा : टोमॅटो खाल्ल्याने रक्तदाब येईल तुमच्या नियंत्रणात! तज्ज्ञ सांगतात, सेवनाच्या बाबतीत ‘ही’ चूक करून फायदे गमावू नका

व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट नसलेल्या व्यक्तीकडून किंवा मान्यताप्राप्त नसलेल्या फिजिओथेरपिस्ट कडून उपचार घेतले जातात, जे चुकीचे होण्याची दाट शक्यता असते. यामुळे रुग्णाचं नुकसान होतेच शिवाय सर्जरीसाठी डॉक्टरांनी घेतलेले कष्ट व्यर्थ ठरतात. जेवढं महत्व शस्त्रक्रियेला दिलं जातं, तितक महत्व रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेला दिलं जात नाही.

रुग्णालयातून सुट्टी झाल्यावर, शस्त्रक्रिया झालेल्या भागाची योग्य निगा काशी राखायची, तो भाग कशा पद्धतीने ठेवायचा, रोज किती हालचाल करायची, किती वेळ करायची, पायाची शस्त्रक्रिया असेल तर टप्प्याटप्प्याने वजन कसं घ्यायचं ह्या बाबी शस्त्रक्रियेइतक्याच महत्वाच्या आहेत. किंबहुना या गोष्टींवर शस्त्रक्रियेचं यश अवलंबून आहे. पण याकडे तितक्या गांभीर्याने पाहिलं जात नाही याचा थेट परिणाम रुग्णाच्या आयुष्याच्या गुणवत्तेवर होतो. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने फक्त चालणं-फिरणं पुरेसं आहे असा गैरसमज रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये असतो, तो दूर करण्याचे प्रयत्न होत नाहीत.

हेही वाचा : Health Special : मकरसंक्रात म्हणजे खऱ्या अर्थाने तेजोनिधीचा ‘ग्लॅमरस’ सण

काय करायला हवं?

रुग्णांना पुढील गोष्टी व्यवस्थित समजावून सांगायला हव्यात

-प्रत्येक शस्त्रक्रिया वेगळी आहे, तिची पद्धत, रुग्णाचं वय, वापरण्यात येणारे इंप्लांट्स, झालेली इजा या प्रत्येक गोष्टीचा विचार आयुष्य पूर्ववत करताना आणि व्यायाम ठरवताना करावा लागतो यासाठी साहजिकच फिजिओथेरपिस्टची गरज असते.
-फक्त सुरूवातीला तीन चार दिवस व्यायाम पुरेसा नसतो, दीर्घकाळ आणि योग्य पद्धतीने टप्प्या टप्प्याने व्यायाम केला तर शस्त्रक्रियेचे फायदे जास्त प्रमाणात मिळतात, यासाठी शस्त्रक्रियेनुसार आणि व्यक्तीगणिक ठराविक कालावधीपर्यंत व्यायाम करावे लागतात.
-घरचे किंवा नातेवाईक, किंवा व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट नसलेल्या व्यक्ती किंवा मान्यताप्राप्त नसलेले फिजिओथेरपिस्ट यांच्याकडून व्यायाम करून घेणं हे अतिशय धोकादायक ठरू शकतं.

हेही वाचा : Health Special: हिवाळ्यात उष्ण आहार का करावा?

-जेवढं महत्व शस्त्रक्रियेला दिलं जातं, तितकंच महत्व रिहॅबिलिटेशनच्या प्रक्रियेला देणं गरजेचं आहे.
-शस्त्रक्रियेनंतर रुग्णाने फक्त चालणं-फिरणं पुरेसं नाही. स्नायूंची झीज भरून काढणं, त्यांची शक्ती वाढवणं, शस्त्रक्रिया झालेल्या आणि न झालेल्या सांध्याची हालचाल नॉर्मल होणं, आत्मविश्वासपूर्वक हालचाली करणं, तोल सांभाळता येणं, हृदयाची आणि फुप्फुसांची क्षमता वाढवणारे व्यायाम करणं या गोष्टींचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि या गोष्टी झाल्या तरच रुग्णाच्या आयुष्याची गुणवत्ता वाढणार आहे.