Psychological Effects Of Listening To Sad Song : मानसिक आरोग्याशी संबंधित आजारांचा सामना करणाऱ्या रुग्णांसाठी हल्ली म्युझिक थेरपीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो, ही थेरपी काही रुग्णांसाठी फायदेशीरही ठरत आहे. आपल्यापैकी अनेकांना दु:खात किंवा तणावग्रस्त असताना इमोशनल गाणी ऐकायला आवडतात. प्रेमात धोका, नोकरीत अडचणी अशा अनेक कठीण काळात अनेक जण गाण्यांचा आधार घेतात. यावेळी आवडीची काही गाणी ऐकल्यानंतर मन थोडेसे हलके झाल्यासारखे वाटते. दरम्यान ‘जर्नल ऑफ एस्थेटिक एज्युकेशन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन अभ्यासात, इमोशनल गाण्यांच्या महत्त्वावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे; ज्यात असे म्हटलेय की, लोक इमोशनल गाणी ऐकतात. कारण- ती पटकन त्यांच्या भावनांशी जुळणारी असतात. गाणी आपल्या भावना अधिक चांगल्या प्रकारे व्यक्त करण्याचे एक माध्यम आहे. कारण- गाण्यांमधील बोल आपल्या भावना किंवा परिस्थिती स्पष्ट करणाऱ्या असतात.

या विषयावर ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना संज्ञानात्मक शास्त्रज्ञ व एक व्यावसायिक ऑपेरा गायिका डॉ. तारा वेंकटेशन ज्या अभ्यासाचा भाग आहेत. त्या म्हणाल्या की, इमोशनल गाणी आपल्या मनातील जटिल भावनांना अभिव्यक्ती करण्याचे माध्यम आहे.

Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “आमच्याकडे मान-अपमान मनात होतो अन् त्याचं संगीत…”, देवेंद्र फडणवीसांची टोलेबाजी!
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “मी शब्दांत शूर, पण सुरात असूर”, मुख्यमंत्र्यांच्या विधानाने हशा; म्हणाले, “लोकांचा गैरसमज होतो की…”
Navri Mile Hitlarla
Video: “मेरी दिल की…”, एजे-लीलाचा रोमँटिक अंदाज; प्रोमो पाहताच नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया, म्हणाले, “आमच्या भावनांशी…”
chinchwad music program of bela shende
भक्तिगीते, युगुलगीते, लावणी, चित्रपटगीतांनी रंगली सुरांची मैफिल
Asen Me Nasen Me Review
असेन मी नसेन मी!
Pankaj Bhoyar Minister post, Pankaj Bhoyar,
डॉ. भोयर यांना मंत्रिपद; इतरांची नाराजी, पण कुणबी-तेली वादाचा समन्वय
Paaru
“मी सगळ्यांना बरबाद…”, दारूच्या नशेत अनुष्का पारूला सत्य सांगणार; मालिकेत पुढे काय होणार? पाहा प्रोमो

इमोशनल गाणी आपल्या मनावर कसा परिणाम करतात?

आपल्या आयुष्यात असे सर्व क्षण येतात, जे आपण गाण्यांमधून ऐकलेले असतात. आपण आनंदी राहण्यासाठी म्हणून गाणी ऐकतो; पण इमोशनल गाण्यांमुळे आपण पुन्हा दु:खी होतो. ज्यात “Sad Songs to Cry Yourself to Sleep” आणि “Bummer Summer” सारख्या नावांच्या सर्व Spotify प्लेलिस्टचा विचार करा. आपण किती दुःखी आहोत हे समजून घेण्यासाठी आपण अनेकदा गाण्यांचा आधार घेतो. याबाबत संशोधन असे सूचित करते की, जेव्हा आपल्याला खूप एकाकी, थकल्यासारखे किंवा हरल्यासारखे वाटत असते तेव्हा आपण अनेकदा इमोशनल गाणी सर्च करीत असतो.

इमोशनल गाणी आपल्याला तीव्र भावनांवर नियंत्रण करण्यात कशी मदत करतात?

इमोशनल गाणी प्रत्येक वेळी तुम्हाला दुःखी असल्याची जाणीव करून देतात, असे नाही. जी बर्‍याचदा जटिल आणि मिश्रित भावना जागृत करण्यास मदत करतात. उदाहरणार्थ, एका अभ्यासात असे आढळून आले की, इमोशनल गाणी ऐकणाऱ्या लोकांचे अनुभव भावनांच्या तीन विस्तृत श्रेणींमध्ये येतात. एक म्हणजे दुःख, दुसरी म्हणजे उदासीनता आणि तिसरी सुखद आनंद. दु:खात निराशा यांसारख्या निव्वळ नकारात्मक भावनांचा समावेश होतो. तर, उदासीनतेत नॉस्टॅल्जिया आणि सांत्वनासारख्या मिश्र भावनांचा समावेश होतो. अभ्यासातून असेही दिसून आले आहे की, इमोशनल गाणी आरामदायी, आनंददायी व खोलवर प्रभावित करणारी असू शकतात.

इमोशनल गाण्यांमुळे नेहमी खोलवर आणि आनंददायी अनुभव कशामुळे येतो?

अलीकडेच ‘जर्नल ऑफ एस्थेटिक्स एज्युकेशन’मध्ये स्वीकारल्या गेलेल्या अभ्यासात, येल विद्यापीठातील डॉ. मारियो ॲटी-पिकर आणि प्रोफेसर जोशुआ नोबे यांनी या प्रश्नाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी गृहीत धरले की, लोक अशाच इमोशनल गाण्यांना महत्त्व देतात; ज्यात त्यांच्या भावना व्यक्त करणारे बोल आहेत. त्यामुळे ती गाणी लगेच त्यांच्या भावनांशी समरस होतात. कल्पना करा की, तुमचा मित्र तुम्हाला एका भयानक ब्रेकअपबद्दल सांगत आहे; ज्यामुळे तो किती उद्ध्वस्त आणि एकटा पडलाय हे सांगतोय. सुरुवातीला तुम्हाला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटेल. थोडे वाईट किंवा दुःखी वाटेल. अशाच प्रकारे तुम्ही दोघे एकमेकांशी खूप वेळ बोलत राहिल्यास तुम्हाला खरोखर काहीतरी गहन व अर्थपूर्ण आहे, असे वाटू लागेल. तुम्हाला कदाचित त्या व्यक्तीशी खोल नातेसंबंध आहेत, असेही वाटेल. त्यामुळे असे गृहीत धरा की, इमोशनल गाणी ऐकल्याने त्यासंबंधीच्या समान भावना निर्माण होतात, ज्या तुम्हाला गाण्याच्या माध्यमातून अनुभवता येतात.

यावेळी अभ्यासादरम्यान सहभागी झालेल्या लोकांना प्रेरणादायी, प्रेम, दुःख, तिरस्कार इत्यादींसारख्या ७२ भिन्न भावना व्यक्त करणारी गाणी ऐकवण्यात आली. यावेळी सहभागी व्यक्ती यातील किती भावनांशी ‘कनेक्ट’ झाल्या याचे रेटिंग करण्यात आले. त्यात असे आढळून आले की, गाण्यात लोकांच्या दैनंदिन घटनांशी जोडल्या जाणाऱ्या भावनादेखील आहेत. या भावना म्हणजे दुःख, प्रेम, आनंद, एकाकीपणा.

विशेष म्हणजे काही लोक असेही म्हणाले की, निराशाजनक आणि दुःखी भावना व्यक्त करणारी गाणी ऐकण्यास आवडत नाही. पण, तरीही आपण आपल्या भावनांना आवर घालण्यासाठी ती गाणी ऐकतो. आपण इमोशनल गाण्यांचा आनंद घेतो की नाही याची पर्वा न करता, आपण इमोशनल गाण्यांना महत्त्व देतो. कारण- ती आपल्याला आपल्या भावनांशी जोडण्यास मदत करतात.

अभ्यासातून असे दिसून आले की, आपण इमोशनल गाण्यांची कदर करतो. कारण- ती गाणी आपल्याशी जोडली गेली आहेत, असे वाटते. ती गाणी खरोखर मनातील दु:ख प्रकट करणारी वाटतात. आपण जेव्हा इमोशनल गाणी ऐकतो तेव्हा आपण कोणाशी जोडले जातो याचा विचार करीत नाही. आपण कलाकाराशी जोडले जात आहोत का? किंवा आपण आपल्या स्वतःच्या अनुभव आणि भावनांशी जोडले जात आहोत? याचा विचार व्यक्ती करीत नाही.

काही संशोधकांनी असे सुचवले आहे की, इमोशनल गाणी ऐकल्याने भावनिक सहवासाची भावना निर्माण होते, जिथे आपण गायक किंवा संगीतकाराने व्यक्त केलेल्या दुःखाच्या भावनांशी प्रतिध्वनित होतो. एका अर्थाने, इमोशनल गाणी ऐकणे हा आभासी संपर्काचा एक प्रकार असू शकतो; ज्यामुळे लोकांना एकटेपणा कमी करण्यास मदत होते. इतर अभ्यासकांनी असे सुचवले आहे की, इमोशनल गाणी आपल्याला स्वतःशी आणि आपल्या स्वतःच्या भावनिक अनुभवांशी जोडण्यास सक्षम करतात; ज्यामुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते.

तुम्ही भले कोणाशीही जोडले जात असाल तरी संशोधन असे सूचित करते की, इमोशनल गाणी ऐकण्यामुळे उद्भवलेल्या कनेक्शनच्या भावनांचा मानसिक आरोग्य आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

इमोशनल गाणी ऐकल्याने सांत्वन मिळते का?

लोक सहसा इमोशनल गाणी ऐकत असल्याचे सांगतात. कारण- त्यांना ते उपयुक्त किंवा उपचारात्मक वाटते. अनेक इमोशनल गाणी सांत्वनदायी असू शकतात. कारण- ती एकटेपणाची भावना कमी करतात, अधिक समजून घेणारी वाटतात आणि कलाकारांसोबत भावनिक संवादाची भावना निर्माण करतात. त्यामुळे लोकांना नकारात्मक भावना, अनुभव यांवर प्रक्रिया करण्यात आणि सांत्वना मिळवण्यात मदत होऊ शकते. वास्तविक जीवनातील समस्यांपासून लक्ष विचलित करण्याचा मार्ग म्हणून लोक भावनाप्रधान गाणी ऐकतात. अशी गाणी तुम्हाला अनेक प्रकारची दु:खं काही प्रमाणात का होईना विसरण्यास मदत करतात.

एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भावनाशील गाण्यांचा प्रभाव व्यक्तिपरत्वे आणि संदर्भानुसार बदलू शकतो. काही वेळा तुमचे इमोशनल गाण्यांमुळे सांत्वन होऊ शकते; परंतु इतर वेळी ते खूप भारीदेखील पडू शकते. काही लोकांना भावनाप्रधान गाणी ऐकण्यात इतरांपेक्षा जास्त आनंद मिळतो. त्यामुळे इमोशनल गाणी आपल्या मूडवर विविध प्रकारे परिणाम करू शकतात.

Story img Loader