Benefits of matka water : उन्हाळा आला की घरोघरी मातीची मडकी दिसतात. अनेक जण फ्रिजचे पाणी पितात, पण काही लोकांना माठातील थंडगार पाणी प्यायला आवडते. उन्हाळ्यात प्रत्येकाच्या घरी मातीचे मडके दिसते. असं म्हणतात की, माठातील थंडगार पाणी चवीला खूप चांगले असते. खरंच हे पाणी लवकर तहान भागवते का? शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास तसेच पचनक्रिया सुरळीत ठेवण्यात मदत करते का? न्यूट्रिशनिस्ट रश्मी मिश्रानी याबाबत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Rashmi Mishra (@indian_veg_diet)

Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
nashik temperature declined to 13 degree Celsius
नाशिकमध्ये पारा तेरा अंशांवर, जाणून घ्या, उत्तर महाराष्ट्रात थंडी का वाढली
Vidhan Sabha election, Pune blood shortage, Pune,
विधानसभा निवडणुकीमुळे पुण्यावर रक्तटंचाईचे सावट! रक्तपेढ्यांमध्ये पाच दिवसांचाच रक्ताचा साठा शिल्लक
Advice from health experts due to the increase in diseases as the cold weather increases Pune print news
थंडीचा कडाका वाढताच आजारांमध्ये वाढ! बदलत्या हवामानाचा परिणाम; आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला जाणून घ्या…
Carrot is beneficial for body how to make gajar ki kanji recipe in marathi
हिवाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! पिढ्यानपिढ्या बनवली जाणारी खास रेसिपी
mpcb issues notice to hinjewadi it park over functioning of common sewage treatment plan
हिंजवडी आयटी पार्कला जलप्रदूषणासाठी नोटीस; सामाईक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पावर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ठपका

माठातील पाणी थंड कसे होते?

द इंडियन एक्स्प्रेसनी काही तज्ज्ञांच्या हवाल्याने या संदर्भात माहिती सांगितली आहे. मातीच्या मडक्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामध्ये नैसर्गिकरित्या पाणी थंड होते. बंगळुरूच्या इलेक्ट्रॉनिक सिटी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ सल्लागार रिनू दुबे सांगतात, “मातीच्या मडक्यांना सूक्ष्म अशी छिद्रे असतात. त्यामुळे मडक्याच्या पृष्ठभागावरील पाण्याचे बाष्पीभवन होते आणि पाणी नैसर्गिकरित्या आतून थंड होते.”

हेही वाचा : रोज नाश्त्यामध्ये आंबा खाणे फायद्याचे की तोट्याचे? डॉक्टरांनी दिलेला ‘हा’ सल्ला वाचाच

माठातील पाणी प्यायल्यामुळे पचनक्रिया सुधारते का?

माठातील पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुधारते असे दुबे म्हणतात. “खूप जास्त थंड पाणी रक्तवाहिन्या घट्ट करतात आणि त्यामुळे पचनक्रिया मंदावते, पण माठातील पाणी कमी प्रमाणात थंड असल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते”, असे दुबे सांगतात.

त्या पुढे म्हणतात, “मडक्यातील पाणी थोडे अल्कलाइन असते, म्हणजेच त्या पाण्याची पीएच पातळी सातपेक्षा जास्त असते, त्यामुळे ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ वाटणे इत्यादी समस्या माठातील पाणी प्यायल्याने कमी होतात.”

प्लास्टिक आणि मेटलच्या भांड्यापेक्षा मातीचे मडके पर्यावरणपूरक असतात. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटचे वरिष्ठ निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. श्रीकांत एचएस सांगतात, “माठातील पाण्यामुळे प्लास्टिकच्या कचऱ्याचे प्रमाण कमी होते आणि प्लास्टिकच्या बाटल्यांचे उत्पादन आणि पुनर्वापरसुद्धा टाळता येतो.”

हेही वाचा : तापमानाचा वाढला पारा, लाडक्या पाळीव प्राण्यांचे आरोग्य सांभाळा! उष्णतेच्या लाटेमुळे कुत्रा-मांजरही त्रासले, अशी घ्या त्यांची काळजी?

माठातील पाणी शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते का?

“माठातील पाणी पिण्याचे अनेक फायदे असले तरी हे पाणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यास आणि रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करू शकतात, असे वर्षानुवर्षांपासून मानले जाते. पण, हा दावा सिद्ध करणारे मर्यादित वैज्ञानिक पुरावे आहेत. माठातील पाण्याची चव ही हायड्रेशनला अधिक प्रोत्साहन देते, जे अप्रत्यक्षपणे हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी आरोग्य जपण्यास मदत करते”, असे दुबे पुढे सांगतात.

डॉ. श्रीकांत सांगतात, “माठातील पाण्यामध्ये नैसर्गिकरित्या फिल्टर केलेले अँटिऑक्सिडंट गुण असतात. हे अँटिऑक्सिडंट गुण ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास आणि आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात.”

डॉक्टरांच्या मते, माठातील पाण्यावर अवलंबून न राहता जीवनशैलीतील बदल करून कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित करणे महत्त्वाचे आहे. “संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे,” असे दुबे सांगतात