Should You Soak Rice Before Cooking: भात खावासा वाटतोय पण आता दुपारी खाल्ला तर प्रचंड झोप येणार आणि रात्री खाल्ला तर वजन वाढणार, करायचं तरी काय? असा प्रश्न तुम्हालापण पडतो का? तर आज या प्रश्नाचे उत्तर आपण एका सोप्या किचन टीपच्या माध्यमातून सोडवणार आहोत. स्वयंपाक करताना म्हणजे विशेषतः भात करताना तुम्ही तांदूळ किती वेळा धुता? सामान्यतः तीन वेळा चांगल्या पाण्याने तांदूळ नीट धुण्याची पद्धत अनेकजण फॉलो करतात. ही स्टेप झाल्यावर भात करायला घेण्याआधी एक आणखी स्टेप जोडायची आहे आणि ती म्हणजे तांदूळ थोड्यावेळ पाण्यात भिजवणे. भात करताना तांदूळ शिजवण्याआधी किती वेळ पाण्यात भिजवून ठेवावा व त्यामुळे मधुमेहापासून ते वजन कमी करण्यापर्यंत विविध हेतूंसाठी कशी मदत होऊ शकते हे आता आपण जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तांदूळ भिजवल्याने जीआय होतो कमी पण मुळात GI म्हणजे काय?

डॉ जी सुषमा, क्लिनिकल आहारतज्ज्ञ, केअर हॉस्पिटल्स, बंजारा हिल्स, हैदराबाद यांनी इंडियन एक्सस्प्रेसला सांगितले की, “अन्नातील कार्ब्स रक्तातील साखरेची पातळी किती वेगाने वाढवतात हे मोजण्याचे एक परिमाण म्हणजे जीआय. कमी GI असलेले अन्न अधिक हळूहळू पचले जाते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी हळूहळू वाढते आणि अधिक शाश्वत ऊर्जा मिळते. तांदळाच्या अशा जाती ज्यामध्ये अधिक स्टार्च असतो भिजवल्यावर एन्झाईमॅटिक ब्रेकडाउनमुळे त्याचा जीआय कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे सेवन केल्यानंतर रक्तातील साखर अचानक वाढण्याचा धोका कमी होतो.”

एंजाइमॅटिक ब्रेकडाउन म्हणजे काय?

जेव्हा तांदूळ भिजवले जाते, तेव्हा एन्झाइमॅटिक ब्रेकडाउन होते. ही अशी एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये तांदळाच्या दाण्यांमध्ये नैसर्गिकरीत्या उपलब्ध असलेले काही एन्झाईम्स हे तांदळातील कार्बोहायड्रेट्सचे साध्या साखरेत रूपांतर करतात. ही एन्झाईमॅटिक क्रिया तांदूळाचे पूर्वपचन करण्यास मदत करते, ज्यामुळे शरीराला तांदळातील पोषक सत्व शोषून मग पचवण्यास मदत होते.

तांदूळ भिजवण्याचे आरोग्यदायी फायदे काय आहेत?

डॉ. सुषमा सांगतात की, फायटिक ऍसिड आणि टॅनिन सारखे घटक अँटी न्यूट्रिएंट्स म्हणून काम करतात म्हणजे काय तर यामुळे शरीरात पोषक तत्वांचे शोषण होण्यास अडथळा येऊ शकतो. पाण्यात भिजवल्याने होणारी एन्झाइमॅटिक ब्रेकडाउन प्रक्रिया या दोन्ही घटकांची पातळी कमी करते परिणामी पोषक सत्वांचे शोषण वाढू लागते.

तांदूळ भिजवण्याचे दुष्परिणाम आहेत का?

डॉ. सुषमा यांनी स्पष्ट केले की, काळ वेळेचा संयम राखल्यास या पद्धतीचे दुष्परिणाम नाहीत. तांदूळ चार तासांपेक्षा जास्त भिजवू नये कारण असे केल्यास पाण्यात विरघळणारीजीवनसत्त्वे आणि खनिजे सुद्धा निघून जाऊ शकतात. आहारतज्ज्ञ असेही सुचवतात की भिजवलेले तांदूळ शिजवण्याआधी नीट धुवावेत कारण त्यामुळे बाहेर पडलेला अतिरिक्त स्टार्च निघून जातो, परिणामी तांदूळ अधिक चांगल्या पद्धतीने शिजून छान मोकळा भात होतो.

हे ही वाचा<< चहात ‘या’ फुलाच्या पाकळ्या घातल्याने डायबिटीस कमी करण्याचा मार्ग होईल सोपा? तज्ज्ञांनी सांगितलं किती हवं प्रमाण?

लक्षात घ्या, तुम्ही एखाद्या विशिष्ट वैद्यकीय स्थितीत असल्यास किंवा आहारविषयक काही नियम पाळत असल्यास आहारात बदल करण्यापूर्वी आपल्या स्थितीशी परिचित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्या.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why should you soak rice before cooking does it help reduce blood sugar levels how long soaking rice in water helps weight loss svs