New Study claims Risk Of Cancer: सर्वसाधारणपणे असा समज असतो की, जे जास्त गरीब असतात त्यांच्यामध्ये आजाराचे प्रमाण जास्त असते आणि श्रीमंत लोकांमध्ये आजारी होण्याचं प्रमाण कमी असतं. पण काही कॅन्सरचे प्रकार श्रीमंत लोकांमध्येच जास्त आढळून येत असल्याची माहिती एका संशोधनातून समोर आली आहे.

यावेळी करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ३५ ते ८० या वयोगटातील २,८०,००० लोकांचा आरोग्य डेटा गोळा करण्यात आला आहे. त्यांच्या आर्थिक स्तरावरून त्यांना वेगवेगळ्या गटात ठेवण्यात आले होते. वय आणि लिंगानुसार लोकांमध्ये आजारात फरक असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे, असं डॉक्टर हेगेनबीक म्हणाल्या.

satish wagh murder case mohini wagh and 5 others remanded to police custody till 30 december
खून करण्यामागे कारण आर्थिक की अनैतिक संबंध? सतीश वाघ खून प्रकरणात पत्नीला पोलीस कोठडी
ladki bahin yojana money recovery
अपात्र ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा
Income Tax , salary , Finance Minister,
पगारदारांच्या ‘इन्कम टॅक्स’मध्ये कपात? क्रयशक्तीत वाढीसाठी अर्थमंत्र्यांकडून उपाय शक्य
Manikrao Kokate , Manikrao Kokate Chhagan Bhujbal,
छगन भुजबळ यांची समजूत काढण्याचा प्रश्नच नाही, माणिक कोकाटे यांची भावना
Amazon's founder Jeff Bezos Makes Rs 67 Crore Every Hour Richer Than Ambani Adani Mittal
Success Story : दर तासाला ६७ कोटी रुपये कमावतो हा माणूस! अंबानी, अदानी, मित्तल यांच्यापेक्षा आहे श्रीमंत; किती आहे त्याची एकूण संपत्ती?
Maharashtra hospitals loksatta news
दोन कोटींनी वाढली बाह्यरुग्ण विभागातील रुग्णांची संख्या
Will neutering leopards stop human leopard conflict
बिबट्यांच्या नसबंदीने मानव-बिबटे संघर्ष थांबणार का? हा उपाय व्यवहार्य आहे का?
Bengaluru techie atul subhash suicide
गैरवापराचं भ्रामक कथ्य

गरीबांच्या तुलनेत श्रीमंतांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक

फिनलंडमधील हेलसिंकी विद्यापीठाने नुकतेच या संदर्भात संशोधन केले आहे. लोकांची आर्थिक स्थिती आणि त्यांना होणारे आजार यांमधील सहसंबंध तपासण्यासाठी हा अभ्यास करण्यात आला होता. त्यामध्ये असं समोर आलंय की, जे लोक श्रीमंत असतात, त्यांना कॅन्सर होण्याची शक्यता जास्त असते. श्रीमंतांमध्ये ब्रेस्ट, प्रोस्टेट आणि इतर प्रकारच्या कॅन्सरचा धोका जास्त असतो, असं अभ्यासातून समोर आलंय. गरीब लोकांपेक्षा श्रीमंत लोकांना अनुवांशिकदृष्ट्या कर्करोगाचा धोका जास्त असल्याची माहिती संशोधनातून समोर आली आहे.

श्रीमंत लोकांना कॅन्सर होण्याचा धोका अधिक का?

सीके बिर्ला हॉस्पिटल, दिल्लीतील सर्जिकल ऑन्कोलॉजीचे संचालक डॉ. मनदीप सिंग मल्होत्रा ​​यांनी दी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना स्पष्ट केले की, हा वाढलेला धोका श्रीमंत लोकांमध्ये जीवनशैलीच्या घटकांशी जोडला जाऊ शकतो. जसे की प्रक्रिया केलेल्या पदार्थांचे जास्त सेवन, अल्कोहोलचे वाढलेले सेवन आणि बैठी जीवनशैली यांमुळे हा धोका जास्त वाढतो. याव्यतिरिक्त अनेक अनुवांशिक घटकांमुळेही व्यक्तींना कर्करोग होण्याची शक्यता असते.

हेही वाचा >> PCOS आहे? करा ‘हे’ व्यायाम अन् पीसीओएस नियंत्रणात ठेवा, भविष्यातील धोके टाळा

या अभ्यासात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, जे कमी श्रीमंत आहेत त्यांना नैराश्य, मद्यपान व फुप्फुसाच्या कर्करोगाबरोबरच मधुमेह व संधिवात यांसारख्या आजारांची अधिक शक्यता असते. डॉ. मल्होत्रा ​​यांनी स्पष्ट केले की, या आर्थिक ताणामुळे तणाव आणि नैराश्य येऊ शकते; ज्यामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्याव्यतिरिक्त रोजगार आणि आर्थिक सुरक्षिततेचा अभाव निराशेची भावना वाढवू शकतो; ज्यामुळे नैराश्य आणि संबंधित परिस्थितींचा धोका वाढतो.

Story img Loader