Why Spices Are Not Allowed On Flights : विमानाने लाखो लोक प्रवास करतात. पण, विमानाने प्रवास करताना काही वस्तू घेऊन जाण्यास परवानगी दिली जात नाही. विमानामध्ये कोणत्या गोष्टींना परवानगी आहे किंवा नाही हे एअरलाइन्सच्या नियमांवर अवलंबून असते. त्यामुळे विमान प्रावासात कोणत्या वस्तू घेऊन जायच्या आणि कोणत्या नाही या शंकांवर आम्ही उत्तरे देण्याचा प्रयत्न करीत आहोत.

यापूर्वी “विमान प्रवासात नारळ घेऊन जाण्यावर का आहे बंदी? वाचा नियम, तोटे अन् तज्ज्ञांचे मत” या बातमीतून आपण विमान प्रवासात नारळ नेण्यास का बंदी आहे हे जाणून घेतले होते. तर आता अलीकडेच अभिनेत्री नीना गुप्ता यांनी सांगितले की, विमान प्रवासात मसाले घेऊन जाण्याससुद्धा बंदी आहे (Why Spices Are Not Allowed On Flights) .

Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mission on Oilseeds in Crisis due to gm soybeans
जीएम सोयाबीन विना तेलबिया मिशन संकटात
Ritika Sajdeh salutes Aaron Finch for defending husband Rohit Sharma after Sunil Gavaskar comment
Ritika Sajdeh : सुनील गावस्करांच्या वक्तव्यावर रोहितच्या बायकोची जबरदस्त प्रतिक्रिया, सोशल मीडियावर चाहत्यांचे वेधलं लक्ष
Onion garlic became expensive while the prices of cotton soybeans decreased
ग्राहक, शेतकरी चिंतेत; कांदा, लसूण महागले तर कापूस, सोयाबीनचे दर पडल्याने नाराजी
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
Sanjay raut Maharashtra unsafe
Sanjay Raut: “मोदी जेव्हा येतात, तेव्हा महाराष्ट्र असुरक्षित”, संजय राऊत यांची टीका
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे

अभिनेत्री नीना गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर सांगितले, “मी विमानतळावर होते. मी सहसा माझे जेवण स्वतःच बनवते. त्यामुळे माझ्याजवळ असणाऱ्या हॅण्डबॅगमध्ये घरी बनवलेली धणे पावडर असते. पण, विमानतळावर सुरक्षा रक्षकांनी ती जप्त केली. मी त्यांच्याकडे ती परतसुद्धा मागितली. तेव्हा कळले की, विमान प्रवासात मसाले घेऊन जाण्यास बंदी आहे (Why Spices Are Not Allowed On Flights) . म्हणून हॅण्डबॅगमध्ये मसाले घेऊन जाऊ नका हे मला तुम्हाला सांगावेसे वाटले.

हेही वाचा…Fight Winter Cold, Cough : घसा खवखवतोय, सर्दीसुद्धा झाली आहे? मग सकाळच्या कॉफीऐवजी ‘या’ पेयाने करा तुमच्या दिवसाची सुरुवात

एव्हिएशन ट्रेनिंग इंडिया, एव्हिएशन तज्ज्ञ राजगोपाल यांच्या मते, नागरी उड्डाण सुरक्षा ब्यूरो (BCAS)ने हॅण्डबॅगमधून मसाल्याच्या पावडर घेऊन जाण्यावर बंदी घातली आहे. तेव्हा याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी दी इंडियन एक्स्प्रेसने नवी दिल्लीतील राजौरी गार्डन येथील कॉस्मेटिक स्किन क्लिनिकच्या कॉस्मेटोलॉजिस्ट व सौंदर्य चिकित्सक (aesthetic physician) डॉक्टर करुणा मल्होत्रा यांच्याशी चर्चा केली.

उग्र वासामुळे इतर प्रवाशांमध्ये ॲलर्जी निर्माण होऊ शकते (Why Spices Are Not Allowed On Flights)

डॉक्टर करुणा मल्होत्रा यांनीसुद्धा या संदर्भात सहमती दर्शवली. त्यांनी सांगितले की, विमान प्रवासात धणे पावडर किंवा कोणत्याची मसाल्याची पावडर घेऊन जाण्यास अनेक कारणांमुळे बंदी घालण्यात आली आहे. मसाल्याची पावडर सुरक्षेबाबतची चिंता वाढवू शकते. कारण- असे पदार्थ स्फोटक पदार्थांसारखे असू शकतात. सुरक्षा कर्मचाऱ्यांना बारीक तपासणीशिवाय इतर पावडरपासून मसाले वेगळे करणे आव्हानात्मक वाटू शकते आणि त्यामुळे स्क्रीनिंग प्रक्रिया मंद होते. त्यामुळे बारीक केलेले पदार्थ सुरक्षा सूचना ट्रिगर करू शकतात. म्हणून अनेक विमान कंपन्यांचे अधिकारी त्यांना कॅरी-ऑन बॅगमध्ये मसाले घेऊन जाण्याची परवानगी देत नाहीत. त्याव्यतिरिक्त मसाल्यांना तीव्र सुगंध असल्यामुळे बंद केबिनसदृश वातावरणात प्रवाशांना अस्वस्थता जाणवू शकते. केबिनमधील अंतर्गत दाबामुळे ते इतर प्रवाशांच्या अंगावरही पडू शकतात आणि त्यामुळे सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो.

डॉक्टर करुणा मल्होत्रा पुढे म्हणाल्या की, “मसाल्याच्या उग्र वासामुळे इतर प्रवाशांमध्ये ॲलर्जी किंवा संवेदनशीलता निर्माण होऊ शकते. तसेच तुमच्या शेजारी बसणाऱ्या प्रवाशाला कदाचित मसाले आवडत नसतील (Why Spices Are Not Allowed On Flights) , तर त्या कारणास्तव सामान्यतः हॅण्डबॅगमधून मसाले घेऊन जाण्यावर बंदी घातली जाते आणि प्रवाशांना सहसा ते तपासलेल्या सामानात पॅक करण्याचा सल्ला दिला जातो, जेथे ते सहप्रवाशांची गैरसोय होऊ न देता कसून तपासणी करू शकतात”.

“तसेच मसाला हे शस्त्र म्हणून किंवा इतर प्रवाशांना धमकावण्यासाठीही वापरले जाऊ शकते”, असा दावा एव्हिएशन तज्ज्ञ राजगोपाल यांनी केला.