गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) हा एक दुर्मीळ परंतु गंभीर ऑटोइम्युन आजार (autoimmune disorder ) आहे, जो परिधीय चेतासंस्थेवर (peripheral nervous System) परिणाम करतो, ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात, हात-पाय बधीर होतात, मुंग्या येतात आणि अगदी अर्धांगवायूदेखील होतो.

फरीदाबाद येथील यथार्थ सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमधील संचालक आणि न्यूरोलॉजी विभागप्रमुख डॉ. समीर गुप्ता द इंडियन एक्स्प्रेसला माहिती सांगतात की, “जेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती अनपेक्षितपणे चेतापेशींवर हल्ला करते ज्यामुळे मेंदू आणि स्नायूंमधील संवादामध्ये अडथळा निर्माण होतो तेव्हा जीबीएस होतो.” चेतापेशी या मेंदूकडून संकेत पाठवतात आणि प्राप्त करतात. जीबीएसमुळे चेतापेशी त्यांचे कार्य पूर्ण करू शकत नाही.

गुइलेन बॅरे सिंड्रोम म्हणजेच जीबीएस होण्याचे नेमके कारण अज्ञात आहे, परंतु बहुतेकदा ते विषाणूजन्य किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गानंतर उद्भवते, ज्यामुळे असामान्य रोगप्रतिकारक प्रतिक्रिया निर्माण होते. डॉ. गुप्ता स्पष्ट करतात की, “रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाशी लढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) तयार करते, परंतु काही प्रकरणांमध्ये हे प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) अनपेक्षितपणे चेतापेशींवर हल्ला करतात.

ऑटोइम्यून अटॅक(Autoimmune Attack): रोगप्रतिकारक शक्ती मायेलिन शीथ (myelin sheath) लक्ष्य करते. मायेलिन आवरण (myelin sheath) हा चेतासंस्थेभोवती असलेला संरक्षणात्मक थर आहे. काही प्रकरणांमध्ये हा हल्ला संकेत प्रसारित करण्यासाठी जबाबदार असलेल्या अक्षतंतूं (अ‍ॅक्सॉन)वरदेखील परिणाम करतो. अक्षतंतू म्हणून चेतापेशींचा लांब धाग्यासारखा भाग जो पेशींपासून संकेत वाहून नेतो; विविध न्यूरॉन्स, स्नायू आणि ग्रंथींमध्ये माहिती प्रसारित करणे हे त्याचे कार्य आहे.

डिमायलिनेशन आणि चेतासंस्थेचे नुकसान (Demyelination & Nerve Damage): डिमायलिनेशन ही एक प्रक्रिया आहे, जी मज्जातंतूभोवती असलेल्या मायलिन आवरणाला नुकसान पोहोचवते, ज्यामुळे मज्जातंतूंचे संकेत मंदावतात किंवा थांबतात.

स्नायूंची हालचाल करण्याची किंवा नियंत्रित करण्याची क्षमता कमी होणे ( Loss of ability to move or control muscles) : परिधीय नसा ऐच्छिक हालचाली नियंत्रित करतात, म्हणून या नसांना झालेल्या नुकसानामुळे स्नायू कमकुवत होतात. प्रोग्रेसिव्ह पॅरलिसिस (progressive paralysis) होण्याची शक्यता असते, ज्याची सुरुवात पायांपासून होते आणि नंतर शरीरामध्ये वरच्या दिशने पसरते.

गंभीर प्रकरण- श्वसनाचा सहभाग ((Severe Cases – Respiratory Involvement):जर डायाफ्राम (diaphragm) नियंत्रित करणारी फ्रेनिक नर्व्ह (phrenic nerve)चे नुकसान झाले, तर रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो आणि त्यांना व्हेंटिलेटर सपोर्टची आवश्यकता असू शकते.

जीबीएसमध्ये अर्धांगवायू होतो, कारण नसा योग्यरित्या संकेत पाठवू शकत नाहीत. नसा त्यांचे संरक्षणात्मक आवरण (मायलिन) गमावतात, ज्यामुळे त्या स्नायूंना संकेत पाठवू शकत नाहीत; परिणामी फ्लॅसिड पॅरालिसिस होतो. (या स्थितीमध्ये स्नायूंच्या कडकपणाशिवाय कमकुवतपणा येतो).

डॉ. गुप्ता यावर भर देतात की, “पाठीच्या कण्यातील दुखापतींप्रमाणे जीबीएसमुळे कायमचे मज्जातंतू नष्ट होत नाहीत, त्यामुळे योग्य उपचारांनी बरे होणे शक्य होते.”

GBS बरा होतो का? त्यावर उपचार करता येतात का? (Is GBS curable? Can it be treated?)

चांगली बातमी अशी आहे की, बहुतेक प्रकरणांमध्ये GBS बरा करता येतो, जरी बरे होण्यास आठवडे ते महिने लागू शकतात. डॉ. गुप्ता प्रमुख उपचार पर्यायांची रूपरेषा सांगतात:

प्लाझ्माफेरेसिस (प्लाझ्मा एक्सचेंज)Plasmapheresis (Plasma Exchange): रक्तातून हानिकारक अँटीबॉडीज काढून टाकणारी प्रक्रिया मज्जातंतूंवरील रोगप्रतिकारक हल्ला कमी करते.

इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन Intravenous Immunoglobulin (IVIG): रोगप्रतिकारक शक्तीच्या हल्ल्याला निष्प्रभ करण्यासाठी निरोगी अँटीबॉडीज प्रदान करते.

सपोर्टिव्ह केअर (Supportive Care): शारीरिक उपचार, व्हेंटिलेटर सपोर्ट (आवश्यक असल्यास) आणि पुनर्प्राप्तीस मदत करण्यासाठी वेदना व्यवस्थापन समाविष्ट आहे.

बहुतेक रुग्णांना लक्षणीय सुधारणा अनुभवायला मिळते, परंतु काहींना कायमचा कमकुवतपणा किंवा मज्जातंतूंचे नुकसान होऊ शकते. चांगल्या परिणामांसाठी लवकर निदान आणि उपचार महत्त्वाचे आहेत.

टीप : हा लेख सार्वजनिक डोमेन आणि तज्ज्ञांकडून मिळालेल्या माहितीवर आधारित आहे. दिनचर्येत कोणताही बदल करण्यापूर्वी प्रथम तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Story img Loader