बऱ्याच काळापासून हृदयाच्या आरोग्यासाठी हानिकारक पदार्थांवर तज्ज्ञ लक्ष केंद्रित करत आहेत. पण, आता नुकत्याच समोर आलेल्या एका अभ्यासातून, ”ह्रदयासाठी हानिकारक अन्नपदार्थांच्या जास्त सेवनापेक्षा, संरक्षणात्मक पदार्थांच्या कमी सेवनामुळे हृदयविकार अधिक वाढतात.”
युरोपियन हार्ट जर्नलच्या जुलै २०२३ च्या अंकात प्रकाशित झालेल्या आंतरराष्ट्रीय अभ्यासात हा निष्कर्ष समोर आला आहे. जवळपास ८० देशांमध्ये हा अभ्यास करण्यात आला होता. या अभ्यासात असे आढळून आले आहे की, ”ह्रदयासाठी विशिष्ट प्रकारचे संरक्षक अन्न जसे की फळे, भाज्या, संपूर्ण धान्य (whole grains,), शेंगदाणे, पूर्ण फॅट्स असलेले डेअरी प्रॉडक्ट आणि मासे यांच्या कमी सेवनामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकची प्रकरणे वाढल्याचे दिसून आले आहे.”
१५ ते २० वर्षांपूर्वी २५ देशांमध्ये प्रॉस्पेक्टिव्ह अर्बन रुरल एपिडेमियोलॉजी (PURE) या अभ्यासांतर्गत ३० ते ६९ वर्षे वयोगटातील महिला आणि पुरुषांची नियुक्ती केली होती. हा निरीक्षणात्मक अभ्यास २००० च्या दशकाच्या सुरुवातीला भारतात सुरू झाला आणि आशिया, युरोप, उत्तर व दक्षिण अमेरिका आणि आफ्रिकेसारख्या देशांतील लोकही यात सहभागी झाले. या अभ्यासात आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या आणि जास्त उत्पन्न असलेल्या देशांमधून दोन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते.
अभ्यासात असे आढळून आले की, ”कार्बोहायड्रेटचे जास्त सेवन आणि फळे, भाज्या आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स (मोनोअनसॅच्युरेटेड आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स) यांचे कमी सेवन हे हृदयविकाराचा धोका निर्माण होण्यामागचे कारण होते. त्यामुळे संशोधकांनी हृदयविकारांपासून संरक्षण करणारा एक निरोगी आहार निर्देशांक (Healthy Dietary Index) विकसित केला. दक्षिण आणि आग्नेय आशिया, लॅटिन अमेरिका, मध्य युरोप, आशिया आणि आफ्रिका यांसारख्या कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये मध्यमवयीन महिला आणि पुरुषांच्या लोकसंख्येसाठी हा निर्देशांक योग्य असल्याचे स्पष्ट झाले. बहुदा पूर्वी विकसित निरोगी आहार पद्धती जसे की, मेडीटेररीअन डाएट (Mediterranean diet), DASH (डायटरी अप्रोच टू स्टॉप हायपरटेशन, युएस) आणि इट- लॅन्सेट प्लॅनेटरी डाएट (EAT-Lancet planetary diet), युरोप आणि उत्तर अमेरिकेत विकसित केला गेला होता. हे आहाराचे पर्याय कमी-उत्पन्न असलेल्या देशांसाठी सहज उपलब्ध असलेल्या अन्नावर आधारित नाहीत आणि खूप महाग आहेत. भारत आणि इतर कमी-उत्पन्न असलेल्या देशांतील सामान्य लोकांसाठी हे आहार पर्याय योग्य नाहीत. त्यामुळे PURE अभ्यासाच्या संशोधकांनी रोजच्या आहारात खालील पदार्थांचे सेवन करण्याची शिफारस केली आहे.
PURE आरोग्यदायी आहार
भाज्या : दररोज सुमारे दोन ते तीन सर्व्हिंग्स किंवा दोन मध्यम आकाराच्या पालेभाज्या आणि इतर भाज्या, अर्धवट उकडलेल्या, वाफवलेल्या किंवा तळलेल्या आणि जास्त न शिजवलेल्या.
कच्ची फळे : सुमारे २०० ग्रॅम/दिवस, एक केळी, सफरचंद, पेरू किंवा नाशपाती (एवोकाडा) च्या बरोबरीने.
शेंगा (बीन्स) : अर्धी वाटी मसूर किंवा डाळ – रोज.
नट्स: ट्री नट किंवा शेंगदाणे, १५-२० ग्रॅम/दिवस.
दुग्धजन्य पदार्थ : दूध किंवा दही, २५०-३०० ग्रॅम, ४०-५० ग्रॅम घरगुती चीज, लोणी/तूप.
संपूर्ण धान्य : भारतीय सपाट ब्रेड, जास्त फायबर असलेला ब्रेड, १/२ कप शिजवलेले तांदूळ, जव (बार्ली), कुट्टू (बॅकव्हीट) इत्यादी.
मासे : १०० ग्रॅम शिजवलेले फॅटी फिश – आठवड्यातून तीन वेळा.
तेल : मोनोअनसॅच्युरेटेड किंवा पॉलीअनसॅच्युरेटेड तेल थोड्या प्रमाणात (२०-३० ग्रॅम/दिवस).
हेही वाचा – इन्सुलिन रेझिस्टन्स कमी करण्यासाठी कोणते पदार्थ खाणे ठरू शकते फायदेशीर? जाणून घ्या पोषण तज्ज्ञांकडून ….
पूर्वी विकसित निरोगी आहारामध्ये जवळपास समान आहाराची शिफारस केली जात असली तरी, PURE च्या अभ्यासात शिफारस केलेल्या आरोग्यदायी आहारामध्ये हृदयविकार टाळण्यासाठी दुग्धजन्य पदार्थ आणि दुग्धजन्य फॅट्सचे जास्त सेवन करणे ही गोष्ट वेगळी (unique) आहे. पोषणतज्ज्ञ आणि चिकित्सकांनी एखाद्या व्यक्ती अथवा रुग्णाबरोबर, अन्न तयार करण्याच्या पद्धतीवरही चर्चा केली पाहिजे आणि शॅलो फ्राय करणे आणि स्वयंपाकासाठी तेलाचा वारंवार वापर करणे टाळण्याचा सल्ला दिला पाहिजे.
PURE आरोग्यदायी आहाराचे इंडेक्सचे पाच श्रेणींमध्ये वर्गीकरण करण्यात आले. यात असे आढळून आले की, सर्वात कमी निर्देशांक असलेल्या आहाराच्या तुलनेत, आरोग्यदायी आहाराचे नियमित सेवन केल्यामुळे हार्ट अटॅक आणि स्ट्रोकचे प्रमाण २० ते ४० टक्के कमी झाल्याचे समोर आले आहे. ६० पेक्षा जास्त मध्यम आणि कमी-उत्पन्न असलेल्या देशांमधील PURE आरोग्यदायी आहाराचेदेखील मूल्यमापन आणि प्रमाणीकरण करण्यात आले (डेटा संशोधकांकडे उपलब्ध होता). ज्यानुसार, उच्च निर्देशांक असलेला PURE आहार हे संरक्षणात्मक असल्याची खात्री करण्यात आली. सर्वात आरोग्यदायी आहार घेणे हे प्रमाणीकरण गटामध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोकच्या घटना ३० ते ५० टक्क्यांनी कमी होण्याशी संबंधित असल्याचे दिसून आले.
एकूणच, अभ्यास संशोधकांनी प्रस्तावित केलेला PURE आरोग्यदायी आहार, भारतातील अनेकांनी असे सुचवले आहे की, ”पोषक तत्वांवर लक्ष केंद्रित करणार्या प्रतिबंधात्मक आहाराच्या ( restrictive dietary ) सल्ल्यापासून दूर जाण्याची गरज आहे. डॉक्टर, पोषणतज्ज्ञ आणि इतर आरोग्य कर्मचार्यांनी हृदयासाठी संरक्षणात्मक पदार्थांच्या सेवनास प्रोत्साहन दिले पाहिजे. अन्न पद्धतींकडे संतुलित दृष्टिकोन ठेवण्याचा (संरक्षणात्मक पदार्थांचे जास्त सेवन, संतुलित कॅलरी सेवन, अपरिष्कृत कार्बोहायड्रेट्स (unrefined carbohydrates) आणि ट्रान्स फॅट्सचे जास्त सेवन टाळणे) सल्ला दिला जातो. असे आहार आनंददायी आहेत आणि भारतातील हृदयविकार टाळण्यासाठी आणि नियंत्रणासाठी हा चांगला पर्याय असावा.
PURE अभ्यासामध्ये शिफारस केलेल्या आरोग्यदायी खाद्यपदार्थांची उपलब्धता वाढवण्यासाठी आणि त्यांच्या खर्चाची तर्कशुद्धपणे मांडणी करण्यासाठी धोरणात्मक हस्तक्षेपांची तातडीने अंमलबजावणी करण्याची गरज आहे. अनेक उपलब्ध सार्वजनिक आरोग्य धोरणांचा वापर करून अस्वास्थ्यकर अपरिष्कृत कार्बोहायड्रेट्स (unhealthy unrefined carbohydrates), ट्रान्स फॅट्स (trans fats), जास्त मीठ आणि अशाच प्रकारच्या पदार्थांचे सेवन कमी केले पाहिजे.