मला आता आधीपेक्षा जास्त आत्मविश्वासपूर्ण वाटतं, पडण्याची भीती वाटत नाही. अनोळखी जागा आणि गर्दीत सुद्धा चालण्याचा आत्मविश्वास वाटतो! गुडघेदुखीचा त्रास असणारे ६० वर्षांचे काका मला सांगत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
काका आनंदात होते. गुडघ्याच्या वेदना कमी झाल्याचा आनंद तर होताच पण चालण्याफिरण्यात आलेला आत्मविश्वास आणि आयुष्याची सुधारलेली गुणवत्ता याचा आनंद जास्त होता. हा परिणाम त्यांच्या वयाला अनुसरून योग्य पद्धतीने दिलेल्या अजिलिटी ट्रेनिंगचा होता हे मला कळत होतं. हे व्यायाम काकांना रुटीन व्यायामापेक्षा जास्त इंटरेस्टिंग वाटत होते, त्यामुळे ते नियमितपणे हे व्यायाम करत होते.
हेही वाचा : Obesity Curve:भारत लठ्ठपणाच्या विळख्यात! ‘द लॅन्सेट’चा धडकी भरवणारा अहवाल काय सांगतो?
‘ॲजिलिटी’ चा शब्दशः अर्थ आहे ‘चपळता’. सोप्या भाषेत सांगायचं तर वेगवेगळ्या परिस्थितीत शरीराची त्वरित आणि सुलभ हालचाल करण्याची क्षमता. ही क्षमता स्नायूंची शक्ती, शरीराच्या हालचालींमधली सुसूत्रता, तोल सांभाळण्याची क्षमता या सगळ्या गोष्टींवर अवलंबून असते. हे वाचल्यावर साहजिकच हा खेळाडूंच्या प्रशिक्षणातला भाग असावा असा अंदाज बांधता येतो. हा अंदाज बरोबर आहे, कोणत्याही मैदानी खेळांमध्ये यशस्वी होण्यासाठी खेळाडूंनी चपळ असणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी त्यांच्या प्रशिक्षणात (आणि दुखापती नंतरच्या उपचारात देखील) ‘ॲजिलिटी ट्रेनिंग’ हा प्रकार आवर्जून समाविष्ट केल्या जातो. पण हे ॲजिलिटी ट्रेनिंग खेळांडूपुरते मर्यादित नाहीये. मग या ॲजिलिटी ट्रेनिंगची गरज कुणा कुणाला आहे? प्रत्येकाला !
हेही वाचा : मद्यपान कमी करणे किंवा पूर्णपणे बंद करणे हेच आहे सर्वोत्तम आरोग्याचे रहस्य? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…
आपल्या सगळ्यांनाच याची गरज आहे. आपल्या सगळ्यांमध्ये जन्मतः चपळता असते. वाढणारं वय, बैठी जीवनशैली, वाढलेलं वजन, व्यायामाचा अभाव, आजार, स्नायूंची दुखणी, दुखापती, किंवा काही वेळा यातलं कुठलंच कारण नसतानाही नैसर्गिकरीत्या असलेली चपळता हळूहळू कमी कमी होते. मग नेहमीपेक्षा वेगळी चप्पल किंवा पादत्राणे घातली की चालताना त्रास होणं किंवा चालता न येणं, घाईत चालताना पटकन दिशा बदलायला त्रास होणं, गर्दीत भीती वाटणं, जिना किंवा पायर्या आधाराशिवाय चढता न येणं, उंच टू व्हीलर वर चढून बसायला भीती वाटणं, मॉलमधे सरकत्या जिन्यावर उभं राहायला भीती वाटणं रनिंग किंवा जॉगिंग करताना पटकन दिशा बदलता न येणं अशा तक्रारी जाणवतात, दुर्दैवाने हे बदल दिसत असूनही त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नाही. यामुळे आयुष्याची गुणवत्ता निश्चित कमी होते.
हेही वाचा : Phineas Gage: फिनिआज गेजचा विचित्र अपघात का ठरला ऐतिहासिक! १८४८ साली नेमकं काय घडलं होतं?
चपळता वाढवणारे व्यायाम केल्यामुळे
१ दुखापतींची शक्यता कमी होते
२ शरीराचा तोल सांभाळण्यास मदत होते
३ शरीराच्या हालचाली सुसूत्रित होतात
४ शरीर आणि मन यांचं नातं दृढ व्हायला मदत होते
हे उपयोग नेमके कसे होतात, चपळता वाढवणारे व्यायाम कोणते आणि ते करताना काय काळजी घ्यावी हे बघूया पुढच्या लेखात…