Why vitamin D is necessary: व्हिटॅमिन डीची कमतरता शरीरासाठी चांगली नाही हे सर्वांनाच माहिती आहे. परंतु, त्याचा गर्भधारणेशी थेट संबंध आहे का? गरोदरपणा ही स्थिती प्रत्येक महिलेच्या आय़ुष्यातील अत्यंत महत्त्वाची स्टेज असून या काळात अनेक गोष्टींना सामोरे जावे लागते. तसंच अनेक गोष्टींची तपासणीही करावी लागते. बाळाची वाढ योग्य पद्धतीने होत आहे की नाही? आईला सर्व व्हिटामिन्स शरीरामध्ये मिळत आहेत की नाही हे सर्वच पाहावे लागते. दरम्यान, पोषणतज्ज्ञ पूजा (अजवानी) जैस्वालिन यांनी व्हिटॅमिन डीची भूमिका अधोरेखित केली. पोषणतज्ज्ञ सांगतात की, “व्हिटॅमिन डी गर्भधारणेसाठी महत्त्वाचे असले तरीही त्याचे योग्य प्रमाण असणं गरजेचं आहे”
खराडी येथील मदरहूड हॉस्पिटलच्या सल्लागार, प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. मानसी शर्मा यांनी द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. मानसी शर्मा सांगतात की, “व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा संबंध हार्मोनल असंतुलनाशी जोडलेला आहे, ज्यामुळे प्रजनन आणि गर्भधारणेच्या परिणामांवर परिणाम होऊ शकतो.”
कॅल्शियम आणि फॉस्फरसचे शोषण आणि चयापचय यासाठी व्हिटॅमिन डी आवश्यक असल्यामुळे निरोगी गर्भधारणेसाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डीची पातळी महत्त्वपूर्ण आहे. कॅल्शियम शोषण, रोगप्रतिकारक शक्तीचे आरोग्य आणि पेशींच्या वाढीसह विविध शारीरिक कार्यांसाठी व्हिटॅमिन डी महत्त्वपूर्ण आहे. गर्भवती महिलांसाठी माता आणि गर्भाच्या आरोग्यासाठी पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डीचे प्रमाण विशेषतः महत्त्वाचे आहे. “अनेक अभ्यासांमध्ये कमी सीरम व्हिटॅमिन डी पातळी आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग, ऑटोइम्यून रोग, न्यूरोलॉजिकल रोग, इन्सुलिन प्रतिरोधकता आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधी रोगांचा वाढता धोका यांच्यातील संबंध सूचित करतात,” असे डॉ. शर्मा म्हणाल्या.
मदरहूड हॉस्पिटल्स, खारघर, नवी मुंबई येथील सल्लागार पोषण आणि आहारतज्ज्ञ डीटी आरती सिंग यांनी सहमती दर्शवली आणि नमूद केले की, गर्भधारणेदरम्यान पौष्टिक कमतरता, विशेषतः व्हिटॅमिन डीची कमतरता सामान्य आहे. आहारतज्ज्ञ आरती सिंग पुढे सांगतात की, “गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीची पातळी कमी झाल्यास मधुमेह आणि गर्भपाताचा धोका होऊ शकतो. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेसाठी अनेक घटक कारणीभूत ठरू शकतात. यामध्ये सूर्यप्रकाशाचा मर्यादित संपर्क, खराब आहाराच्या सवयी, लठ्ठपणा आणि काही वैद्यकीय परिस्थितीचा समावेश आहे.”
हेही वाचा >> खोकल्यावर औषधं घेऊनही आराम नाही? डॉक्टरांनी सांगितलेलं हे संत्र्याचं सिरप बनवा घरच्या घरी
आहारतज्ज्ञ आरती सिंग पुढे सांगतात की, गर्भधारणेदरम्यान व्हिटॅमिन डीची सामान्य पातळी ३० एनजी/एमएल किंवा त्याहून अधिक असावी. व्हिटॅमिन डीची ही सामान्य पातळी राखून तुम्ही निरोगी गर्भधारणा करू शकता. यासाठी भाज्या, दुग्धजन्य पदार्थ, फळे, नट आणि दूध, दही, पनीर, फॅटी मासे, अंडी आणि मशरूम यांसारख्या व्हिटॅमिन डीच्या पुरेशा प्रमाणात समृद्ध असलेले अधिक पदार्थांचे सेवन करा. दररोज किमान २० ते ३० मिनिटे सूर्यप्रकाशाच्या संपर्कात या. यानंतरही व्हिटॅमिन डीची कमतरता कायम राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रभावी परिणामांसाठी डॉक्टर काही आहारातील बदल किंवा पूरक आहार सुचवू शकतात.