हिवाळ्यात तुमचे हृदय आणि श्वसनाचे आरोग्य जपण्यासाठी व्यायाम करण्याची कोणती योग्य वेळ आहे का? गरम पाण्याने अंघोळ करणे फायदेशीर आहे का? नियमित वाफ घेतल्यास कफ निघून जाण्यास मदत होते का? हे असे प्रश्न आपल्या मनात येतात. अशा स्थितीमध्ये हिवाळ्यातील कमी तापमानामुळे शरीरात होणारे बदल महत्त्वाचे ठरतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “मुलांना नव्हे, आधी स्वत:ला शिस्त लावा”; आजच्या पिढीच्या पालकांचे नक्की चुकतंय कुठे? तज्ज्ञांकडून जाणून घ्या

“आरोग्याचे रक्षण करणाऱ्या गोष्टी टाळल्यामुळे हार्ट अटॅक, Arrhythmias किंवा हृदयाचे ठोके कमी जास्त होणे, हृदय बंद पडणे आणि स्ट्रोक होऊ शकतो”, असे चंदीगड येथील पोस्ट ग्रॅज्युएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्चच्या (PGIMER) कार्डिओलॉजी विभागाचे प्रा. राजेश विजयवर्गीय यांनी इंडियन एक्स्प्रसेला माहिती देताना सांगितले.

“अत्यंत थंड वातावरणाच्या संपर्कात आल्याने धमन्या आकुंचन (arterial constriction) पावतात, ॲड्रेनालाईन स्राव (adrenaline secretion) वाढतो, प्लेटलेट एकत्र होणे (platelet aggregation), रक्त गोठणारे घटक वाढतात आणि त्यामुळे हार्ट अटॅक आणि उच्च रक्तदाब होऊ शकतो”, असेही त्यांनी पुढे स्पष्ट केले.

“वायू प्रदूषणासारखे ताणतणाव निर्माण करणारे घटक जे हिवाळ्यात वाढतात, ज्यामुळे शरीरातील जळजळ वाढते, जे हार्ट अटॅक येण्याचे आणखी एक लक्षण आहे. म्हणूनच आपल्याला काही सोप्या गोष्टींची काळजी घेणे आणि हिवाळ्याचा आनंद घेणे आवश्यक आहे”, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला.

दिवसा व्यायाम करणे सर्वोत्तम : विशेषत: हृदयविकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी थंड वातावरणाचे प्रभाव टाळण्यासाठी व्यायाम/नियमित चालणे हे पहाटे किंवा संध्याकाळी करण्याऐवजी दिवसाच्या वेळी केले पाहिजे. खरं तर चालणे हा सर्वोत्तम व्यायाम आहे, कारण त्यामुळे तुमच्यावर ताण येत नाही. “व्यायामापूर्वी आणि नंतर योग्य उबदार कपडे घाला आणि पुरेश्या प्रमाणात पाणी प्या”, असे डॉ. विजयवर्गीय सांगतात.

इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना मोहाली येथील आयव्ही हॉस्पिटलच्या पल्मोनरी मेडिसिन विभागाच्या सल्लागार डॉ. सोनल यांनी अगदी सामान्य लोकांसाठीदेखील पहाटेच्या वेळी बाहेर जाऊन व्यायाम करणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. “वातावरणाच्या निच्चांकी आणि थंड पातळीमध्ये विषारी वायू आणि प्रदूषकांचे प्रमाण वाढते. परिणामी हानिकारक धुके तयार होते. दिवसा उन्हाच्या वेळी व्यायामाचा कालावधी आणि वारंवारता वाढवल्याने शरीरातील रक्त प्रवाह वाढतो”, असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा – एखाद्या व्यक्तीला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी कुटुंबाने काय केले पाहिजे? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

कोमट पाण्याने अंघोळ करा : डॉ. सोनल सांगतात की, एका जपानी अभ्यासात असे आढळून आले आहे की, “४० अंश सेंटीग्रेड तापमानात पूर्ण शरीर बुडवून अंघोळ करणे आणि कोमट पाण्याने अंघोळ करणे या दोन्हींमुळे धमन्यांचा विस्तार होतो आणि रक्त प्रवाह वाढतो. याशिवाय, कोमट पाणी शरीराच्या नैसर्गिक थर्मल संतुलनासाठी चांगले ठरते आणि सूक्ष्मजंतूंना दूर ठेवते.” फिटनेस मंत्र म्हणून हिवाळ्यात थंड किंवा अति गरम पाण्याने अंघोळ करण्यास प्रोत्साहन देणाऱ्या फॅडला बळी पडू नका. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. थंड आणि अति गरम दोन्ही पाण्याने अंघोळ करणे हे अतिरिक्त धोकादायक घटक आहेत, ज्यांच्याशी जुळवून घेण्यास शरीराला त्रास होतो म्हणून ते टाळले पाहिजे. “शरीराचे तापमान संतुलित ठेवा. कोमट पाण्याने अंघोळ करा, जे शरीराचे तापमान वाढवते आणि रक्ताभिसरणाला चालना देते”, असे प्रा. विजयवर्गीय सांगतात.

नियमित वाफ घ्या : हिवाळ्यात श्वसनाच्या विविध आजारांचा धोका वाढतो. याचे कारण असे की, थंड हवा वायुमार्गाच्या कोरडेपणाला प्रोत्साहन देते आणि श्लेष्माचे उत्पादन कमी करते, जी रोगजनकांना (pathogens) अडकवून संरक्षणाची पहिला संरक्षक पातळी म्हणून कार्य करते. थंड हवेमुळे वायुमार्गावर ताण येतो, ज्यामुळे ब्रोन्कियल दमा (bronchial asthma ) आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह लंग डिसीज (COPD) होण्याचा धोका वाढतो. “श्वसन मार्गात रक्तसंचय टाळण्यासाठी पुरेशा प्रमाणात पाणी प्या आणि वाफ घ्या. वाफेमुळे कफ बाहेर पडण्यास मदत होते”, असे डॉ. सोनल सांगतात.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why winter heart attacks are easy to prevent can a warm shower a daytime walk and some steam help snk
Show comments