बारावीचे वर्ग सुरू झाले होते. कॉलेजमध्ये नव्याने सुरू झालेल्या समुपदेशन केंद्रात लगबग सुरू झाली. तिथे तीन समुपदेशक- मानसोपचारतज्ज्ञ अशी टीम काम करत होती. नोटीस बोर्डवर पोस्टर्स झळकली. समुपदेशन केंद्राच्या वेळा, उपलब्ध सेवा यांची माहिती देणारी. त्याच्या बरोबर पहिल्या दोन आठवड्यात अकरावी- बारावीच्या सगळ्या वर्गांमध्ये एक एक सत्र झाले. समुपदेशकांनी थोडक्यात समुपदेशन केंद्राची ओळख करून दिली, त्याचे उद्दिष्ट सांगितले, कॉलेजच्या आवारात विद्यार्थ्यांच्या मानसिक ताण तणावावर उपाय योजना करण्यासाठी, शैक्षणिक अडचणी असतील तर त्याचे योग्य निदान व्हावे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आणि काही प्रमाणावर करीअर कौन्सेलिंग (career counselling) सुद्धा करण्यासाठी एक मोठी सोय उपलब्ध झाली होती.

काही विद्यार्थी या समुपदेशन केंद्रात येऊही लागले. काही महिन्यांमध्येच समुपदेशकांच्या लक्षात आले की आलेले विद्यार्थी नेहमीच मनोविकाराने ग्रस्त नसतात. म्हणजे उदासपणा (depression), अतिचिंतेचे विकार (anxiety disorders) किंवा स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक आजार झालेलेच विद्यार्थी केवळ येत नाहीत; अनेकवेळा मानसिक संघर्षाचे कारण रिलेशनशिपमधील तणाव, अपयशाची भीती, समोर लक्ष्य स्पष्ट नसणे, आर्थिक अडचणीमुळे येणारे टेन्शन अशा विविध गोष्टी असतात. या सगळ्याचा मानसिक त्रास होतो, पण मानसिक विकार नसतो. आयुष्याला सामोरे जाताना येणारे हे संघर्ष असतात, पण काही जण स्वतःला अक्षम मानतात. एखादा विद्यार्थी मात्र आत्म्हत्येसारखा विचार मनात घेऊन येई आणि मग त्याला लवकरात लवकर पुरेशी मदत मिळण्यासाठी समुपदेशकांची धावपळ उडे.

interesting facts about formation of the himalayas
कुतूहल : हिमालयाची निर्मिती
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Happy Makar Sankranti 2025 Wishes Messages in Marathi
Makar Sankranti 2025 : मकर संक्रांतीनिमित्त प्रियजनांना WhatsApp, Instagram, Facebook वर पाठवा मराठी भाषेतून खास गोड शुभेच्छा अन् Greeting cards; पाहा यादी
Amazon Flipkart announce Republic Day sale 2025
ॲमेझॉन, फ्लिपकार्टचा ‘Republic Day sale’ कधी होणार सुरू? काय असणार ऑफर्स; जाणून घ्या एका क्लिकवर
balmaifal story for children
बालमैफल : मी… अनादी, अनंत!
aquarius Yearly Horoscope 2025 in Marathi | kumbha Rashibhavihsya 2025 in Marathi
Aquarius Yearly Horoscope 2025 : कुंभ राशीला नोकरी, व्यवसायात कधी होणार लाभ? आरोग्य ते नातेसंबंध… कसे असेल वर्ष; वाचा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतचे भविष्य
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025
Weekly Lucky Zodiac Sign 13 To 19 January 2025: बुध आणि शुक्र बदलणार राशी! ‘या’ चार राशी ठरतील भाग्यशाली, अचानक होईल धनलाभ

हेही वाचा… Mental Health Special: ‘पेरेंटल कंट्रोल’ आणि संशयाचा किडा!

अशा अनुभवांमधून प्रेरित होऊन समुपदेशकांनी अनेक उपक्रम हाती घेतले. आपले जीवनातील ध्येय म्हणजे काय, कोणतेही ध्येय गाठायचे तर त्याच्या पायऱ्या कशा असतात, यशापयशाची संकल्पना, वेळेचे नियोजन, ताणतणावाचे नियोजन, मनाची लवचिकता अशा वेगवेगळ्या विषयांवर व्याख्याने, कार्यशाळा यांचे आयोजन केले. त्याच बरोबर विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा म्हणून एक निबंध स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, स्लोगन स्पर्धा अशा स्पर्धांचे आयोजन केले.

हे सगळे करण्यासाठी त्यांना निमित्त मिळाले, ‘जागतिक मानसिक आरोग्य साप्ताहा’चे! दरवर्षी ४ ऑक्टोबर ते १० ऑक्टोबर या काळात जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा केला जातो आणि १० ऑक्टोबरला ‘जागतिक मानसिक आरोग्य दिन’ साजरा केला जातो.

हॉस्पिटलमध्ये मनोरुग्णांचा एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केला होता. मानसिक विकारांना तोंड देणारे रुग्ण स्वतःचे अनुभव सांगत होते, त्यांनी मानसिक आजार कसा स्वीकारला आणि त्याचा सामना केला ते सांगत होते. स्कीझोफ्रेनियासारख्या गंभीर आजाराचे नियमित उपचार घेऊन, आपले आयुष्य उत्तम प्रकारे, आनंदाने जगणारे रुग्ण मानसिक विकार असतानाही मानसिक समाधान कशात शोधता येते, आपल्या कुटुंबाच्या आधाराने समाजात आपली प्रतिष्ठा कायम ठेवून कसे वावरता येते असे अनुभव वर्णन करत होते आणि उपस्थितांना त्यातून प्रेरणा मिळत होती. दारूच्या व्यसनापासून गेली दहा वर्षे दूर राहिलेला एक जण आपल्या वस्तीमध्ये किती विविध प्रकारचे उपक्रम करतो आणि तरुणांच्या सहभागाने पर्यावरण संवर्धनासाठी कसा झटतो हे ऐकून आलेले सगळे चकित होत होते. बाळंतपणात डिप्रेशन आलेले असताना आपल्या मुलाला टाकून द्यायला निघालेली आलेली आता बरी झाल्यावर पुन्हा एकदा शिक्षिकेची नोकरी उत्तम प्रकारे करू लागली, आपल्या मुलाचा समर्थपणे सांभाळ करू लागली अशी कहाणी ऐकून अनेकांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

हेही वाचा… Mental Health Special: भावनात्मक बुद्धिमत्तेचा (EI) फायदा काय?

कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्रात येणारे विद्यार्थी असे होते की त्यांना मानसिक ताणतणाव आणि संघर्ष होता, पण मानसिक विकार नव्हता आणि दुसरीकडे बरे झालेले (recovered) रुग्ण होते. आरोग्याची व्याख्या करताना केवळ आजार असणे किंवा आजार नसणे हे महत्त्वाचे नाही, तर जगताना मानसिक समाधान असणे, स्वतःविषयी चांगली भावना असणे, आयुष्यातल्या सर्वसाधारण ताण तणावांना सामोरे जाण्याची क्षमता असणे, आवश्यक ती कार्यक्षमता असणे आणि या सगळ्यायोगे आपल्या परिसरामध्ये काही योगदान करणे अशा सगळ्या गोष्टींचा मानसिक आरोग्याच्या संकल्पनेत समावेश होतो.

मानसिक आरोग्य सप्ताहाच्या निमित्ताने याच काही गोष्टींचा पुनरुच्चार केला जातो, समाजात या संकल्पना पोहोचवण्यासाठी अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कॉलेजच्या समुपदेशन केंद्रानेही हेच केले. विद्यार्थ्यांच्या सहभागातून अनेकांपर्यंत मानसिक आरोग्याची संकल्पना पोहोचवली. मानसिक आरोग्याचे विविध पैलू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत म्हणून कार्यशाळांचे आयोजन केले.

रुग्णांच्या अनुभावामधूनही त्यांचा मानसिक विकार ते मानसिक आरोग्य असा प्रवास सगळ्यांना समजला. मानसिक विकार झाला म्हणजे आपल्याला स्वतःविषयी कधीच चांगले वाटणार नाही, ही समजूत यातून दूर व्हायला मदत झाली. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आणि प्रत्येकाचे मानसिक आरोग्य तितकेच महत्त्वाचे असा संदेश जणू मानसिक आरोग्य साप्ताह आपल्याला देतो!

Story img Loader