Loss Of Interest in Sex: आनंदी आयुष्यासाठी सेक्स हा एक महत्त्वाचा भाग असतो. सेक्स ही जोडप्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाची गोष्ट आहे. सेक्स ही शरीराची एक गरज आहे आणि जोडप्यांच्या सुखी नात्यामधील एक दुवा आहे. सेक्स हा आरोग्याच्या आणि मातृत्वाच्या (Pregnancy) दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. सुखद आणि प्रसन्न सेक्ससाठी ऊर्जादेखील गरजेची असते. वैवाहिक जीवन चांगलं असण्यासाठी लैंगिक आरोग्य आणि लैंगिक जीवन आनंददायी, सुरक्षित असणं गरजेचं असतं.

आजकाल व्यग्र दिनक्रमामुळे लोकांचं लैंगिक जीवन खूप कंटाळवाणं झालं आहे. विशेषत: पुरुषांमध्ये लैंगिक जवळीकतेची आवड कमी होताना दिसते आहे. वैवाहिक जीवनात सेक्स खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे पती-पत्नीचं नातं अधिक घट्ट होत जातं; पण जेव्हा त्यांच्या जीवनामधून सेक्सच्या भावनेचं महत्त्व कमी होत जातं तेव्हा नात्यामध्ये दुरावा निर्माण होण्याची शक्यता असते.

hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Offense against speaker along with organizer due to offensive statements
आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वक्त्यासह आयोजकावर गुन्हा
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच
woman police brutally beaten by brother in law in kalyan
कल्याणमध्ये महिला पोलिसाला दिराकडून बेदम मारहाण

लैंगिक इच्छा कमी होणे पुरुषांसाठी खूप त्रासदायक ठरू शकते. मुंबईतील ग्लोबल हॉस्पिटल्सचे डॉ. संतोष बांगर यांनी सेक्सची इच्छा कमी होण्यामागे कोणती कारणं असू शकतात, याबाबत माहिती दिली आहे.

डाॅक्टर म्हणतात, सेक्सची इच्छा कमी होण्यामागे अनेक कारणं असू शकतात. जसं की ताणतणाव, थकवा, रोजच्या आयुष्यात झालेला बदल, सेक्स करण्यासाठीचा वेळ इतरत्र घालवणं यांमुळे कामवासना कमी होऊ शकते. लैंगिक इच्छा कमी होण्यामागे अनेक अंतर्गत आणि बाह्य घटक कारणीभूत असतात. अनेकदा लैंगिक संबंधात रस वा कामेच्छा कमी होणं, अशक्तपणा, सुस्ती वय-संबंधित बदल दिसून येता. अनेक जण या गोष्टींना नैराश्याची लक्षणं मानतात.

(हे ही वाचा : पोहण्याने रक्तातील साखर वेगाने कमी होते का? जाणून घ्या डाॅक्टरांचे मत…)

पण, महत्त्वाचं म्हणजे रोजच्या जीवनात आवश्यक ती दक्षता न घेता, आपण काही औषधांचं सेवन करतो; अशा औषधांमुळेही लैंगिक इच्छा हळूहळू कमी होऊ शकते. बहुतांश जोडप्यांमध्ये एकमेकांप्रति असलेलं लैंगिक आकर्षण अथवा कामवासना कमी होत जाते. म्हणजेच सेक्स करण्याची ऊर्मी पहिल्यासारखी दिसत नाही. याला अनेकदा संबंधित व्यक्ती घेत असलेली औषधं कारणीभूत असतात. मग ही औषधं म्हणजे एखादा अमली पदार्थ असू शकतो; पण हळूहळू त्याचा परिणाम तर होतो.

त्यातील नैराश्यावरील उपचारांसाठी वापरली अँटीडिप्रेसंट औषधं ही कामेच्छा मारक म्हणून ओळखली जातात. कामवासना कमी होण्याशी संबंधित सर्वांत सामान्य लक्षणांमध्ये सेक्समधील रुची कमी होणे, कामोत्तेजना नसणे, अजिबात स्खलन न होणे व पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन यांचा समावेश होतो.

नैराश्य आणि चिंता विकार लैंगिक इच्छा कमी करू शकतात. अँटीडिप्रेसंट औषधांच्या वापरामुळे अल्प कामवासना, विलंबित कामोत्तेजना इत्यादी उत्तेजित होण्यामध्ये आव्हाने म्हणून प्रकट होऊ शकतात. कारण- या औषधांमध्ये सेरोटोनिन, नॉरपेनेफ्रिन व डोपामाइनसह न्यूरोट्रान्समीटरचे मॉड्युलेशन मेंदूमध्ये समाविष्ट आहे; जे सर्व लैंगिक प्रक्रियांच्या कार्याशी संबंधित आहेत.

तुमच्या लैंगिक आरोग्यावर होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी तुमचे डॉक्टर डोसचे समायोजन सुचवू शकतात. अलीकडील नैदानिक ​​तपासण्यांमध्ये लैंगिक दुष्परिणाम कमी करण्यासाठी फॉस्फोडीस्टेरेस इनहिबिटरसारख्या सहायक औषधांचा वापर करण्यात आले असल्याचेही डाॅक्टरांनी नमूद केले आहे.