How Does Brain Tell Your stomach Is Full : आवडीचा पदार्थ असेल किंवा नसेल जेवताना आपल्याला पोट भरल्याचा सिग्नल हा येतोच. मग त्यानंतर एकही जास्तीचा घास घशाखाली उतरत नाही किंवा मग जबरदस्ती खाल्ल्यावर अगदीच मळमळते किंवा उलटीसारखे वाटते. पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की, अशाप्रकारे सिग्नल येण्यासाठी शरीर नक्की कसे कार्य करते (Why You Feel Full After Eating )याबद्दल जाणून घेऊ…

याआधी इंडियन एक्स्प्रेसने कोपराचे हाड एखाद्या वस्तूवर आदळल्यानंतर वेदना का होतात किंवा पुरुषांपेक्षा स्त्रियांचे फॅट हळूहळू बर्न का होतात (चरबी हळूहळू घटते) यासह अनेक गोष्टींबद्दल जाणून घेतले. तर आज मेंदू-आतड्याच्या संबंधित आणखी एक पैलू समोर आला आहे, जो तुम्हाला आश्चर्यचकित करेल. तुम्हाला माहीत आहे का की, तुम्ही जेव्हा काही खाता तेव्हा तुमचे पोट आणि मेंदू वारंवार चिन्हांद्वारे एकमेकांशी संवाद साधतात आणि तुम्हाला पोट भरल्याचा सिग्नल देतात. मेंदूला पोट भरले आहे हे समजण्यासाठी जवळजवळ आठ मिनिटे लागतात? (Why You Feel Full After Eating ) तर यामध्ये काय सत्य आणि काय खोटं याबद्दल जाणून घेऊया…

मुंबईच्या परेल येथील ग्लेनेगल हॉस्पिटलच्या इंटर्नल मेडिसिनच्या वरिष्ठ सल्लागार डॉक्टर मंजुषा अग्रवाल यांनी स्पष्ट केले की, तुम्ही जेव्हा अन्नाचे सेवन करता तेव्हा तुमचे पोट ताणले जाते, परिणामी लेप्टिन आणि कोलेसिस्टोकिनिन (CCK) सारखे हार्मोन्स बाहेर पडतात. हे संप्रेरक (हॉर्मोन्स) मेंदूच्या हायपोथालेमसला संदेश पाठविण्यास जबाबदार असतात. भूक आणि पोट भरले आहे हे निश्चित करण्यासाठी ते जबाबदार असतात. ही संपूर्ण प्रक्रिया मेंदूला हे समजण्यास मदत करते की, तुम्ही पुरेसे अन्न कधी घेतले आहे आणि तुमचे पोट कधी भरले (Why You Feel Full After Eating )आहे. पण, एखाद्याने हे समजून घेणे आवश्यक आहे की, ही संपूर्ण प्रक्रिया त्वरित होऊ शकत नाही.

तर हा मेसेज आणि या संदर्भातील चिन्हे तुमच्या शरीरातून तुमच्यापर्यंत पोहचण्यासाठी काही वेळ लागू शकतो. तुमचे पोट भरले आहे (Why You Feel Full After Eating ) हे समजण्यासाठी तुमच्या मेंदूला खरंच थोडा वेळ लागू शकतो, पण त्यासाठी नेमका किती वेळ लागेल हे सांगणे खरं तर कठीण आहे. काहींसाठी यास आठ मिनिटांपेक्षा कमी वेळ लागू शकतो, तर काही प्रकरणांमध्ये यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो. चयापचय, जेवणाचा आकार आणि शेवटी तुम्ही कोणत्या प्रकारचे अन्न खात आहात यासारख्या विविध घटकांवर अवलंबून हा कालावधी व्यक्तीनुसार भिन्न असू शकतो’; असे डॉक्टर मंजुषा अग्रवाल म्हणाल्या आहेत.

या विलंबाचे व्यवस्थापन करण्यासाठी काळजीपूर्वक खाण्याच्या पद्धती आवश्यक आहेत, त्याबद्दलची माहिती पुढीलप्रमाणे…

हैदराबाद येथील ग्लेनेगल्स हॉस्पिटल्सचे सल्लागार आणि एचओडी डॉक्टर मनेंद्र म्हणाले की, जास्त खाण्याचा धोका टाळण्यासाठी, एखादी व्यक्ती त्यांचे अन्न हळूहळू खाऊ शकते आणि त्यांचे शरीर देत असलेल्या सिग्नलकडे लक्ष (Why You Feel Full After Eating ) देऊ शकते. हळूहळू अन्न चघळणे, प्रत्येक घासाचा आस्वाद घेणे आणि जेवण वाढण्यादरम्यान विराम दिल्याने मेंदूला तृप्ततेचे संकेत नोंदवण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो. पण, विलंबामुळे जास्त खाल्ल्याने वजन वाढणे, पचनात अस्वस्थता आणि दीर्घकालीन चयापचय विकार होऊ शकतात. याव्यतिरिक्त, फायबर आणि प्रथिने समृद्ध आहार पोट भरल्याची भावना वाढवू शकतो आणि संपूर्ण आरोग्यास समर्थन देऊ शकतो.

Story img Loader