तुम्ही पार्ट्यांमध्ये मद्यपान करत असाल तर तुम्हाला हँगओव्हर काय असते याची चांगलीच कल्पना असेल. पार्टीमध्ये तुम्ही एखादे ड्रिंक जरी घेतले तरी तुम्हाला झोपेतून उठल्यानंतर तुम्हाला निर्जलीकरण, मळमळ, आणि नंतर सकाळी तीव्र डोकेदुखीसह सारखी लक्षणे जाणवातात- थोडक्यात सांगायचे तर हीच हँगओव्हरची लक्षण आहेत. अशी परिस्थिती टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे मद्य सेवन मर्यादित करणे (शक्यतो टाळणे) हा आहे, जर तुम्ही काही उपाय शोधत असाल तर, हार्वर्ड-प्रशिक्षित न्यूट्रिशन सायकॅट्रिस्ट डॉ उमा नायडू यांची दिलेली माहिती तुमच्यासाठी उपयूक्त ठरू शकते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
“मद्यसेवानामुळे शरीरातील पाणी कमी होते हे समजून घेणे आवश्यक आहे आणि हँगओव्हरमध्ये निर्जलीकरण हा एक महत्त्वाची गोष्ट आहे. हँगओव्हरसाठी मूलभूत उपचारांमध्ये भरपूर पाणी पिणे, झोपणे आणि विश्रांती या तीन गोष्टी समाविष्ट आहे: पण, फायबर-समृद्ध आणि जास्त पोषणमुल्य असलेल्या दाहक-विरोधी पदार्थांसह आपल्या शरीराचे पोषण करणे देखील आपल्याला पुन्हा बरे करण्यासाठी मदत करू शकते,” असे डॉ. नायडू यांनी इंस्टाग्रामावर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितले.
हँगओव्हर शरीरातील पाण्याची कमतरता भरुन काढणे आवश्यक
डॉ. नायडू पुढे सांगतात की, ”प्रथिने आणि विरघळणारे पदार्थ शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत करू शकतात, तर पौष्टिक आंबवलेले दही, फोलेट-समृद्ध पालेभाज्या आणि पौष्टिक नट्स यांसारखे पदार्थ मूड आणि आकलनशक्तीसाठी मेंदूला न्यूरोट्रांसमीटरचे नाजूक संतुलन पुनर्संचयित करण्यास मदत करू शकतात.”
“तुम्ही किती मद्यपान करत आहात हे जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. तुमचे ड्रिंक्स मोजण्याची आणि मद्यपानामुळे अस्वस्थता आणि तीव्र जळजळ होण्यास कारणीभूत ठरू शकते हे लक्षात ठेवण्याची मी शिफारस करते, म्हणून तुमच्या शरीराने दिलेले संकेत ओळखा,”असे त्यांनी सांगितले.
हेही वाचा : पॅनिक अटॅक आणि एंग्झायटी अटॅक, दोन्हीमध्ये काय आहे फरक?
हँगओव्हरवर मात करण्याचे मार्ग
हैद्राबाद येथील हाय टेक सिटीमधील केअर हॉस्पिटलच्या सिनिअर डाएटीशिअन आणि न्युट्रिशनिस्ट, समीना अन्सारी, यांनी इंडियन एक्सप्रेससोबत संवाद साधताना, हँगओव्हरचा सामना करण्यासाठी काही सोप्य टीप्स शेअर केल्या आहेत.
- भरपूर पाणी प्या: भरपूर पाणी प्यायल्याने मद्य सेवनामुळे होणारे निर्जलीकरण कमी होण्यास मदत होते.
- आरोग्यदायी पदार्थ खा: फळे आणि भाज्या यांसारखे आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने आवश्यक पोषक तत्वे मिळू शकतात आणि हँगओव्हरची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
- थोडी विश्रांती घ्या: विश्रांती घेतल्याने शरीराला अल्कोहोलच्या सेवनाच्या परिणामांपासून मुक्त होण्यास मदत होते.
- वेदना कमी करणारे औषधे : एस्पिरिन किंवा आयबुप्रोफेन सारख्या ओव्हर-द-काउंटर वेदना कमी करणारे औषधे डोकेदुखी आणि इतर हँगओव्हर लक्षणे कमी करण्यास मदत करू शकतात. पण यांचे सेवन डॉक्टरांच्या सल्ल्यानंतरच करावे.
- माफक प्रमाणात मद्यपान करा: हँगओव्हर टाळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे माफक प्रमाणात पिणे आणि आपल्या मर्यादेत राहणे.
हँगओव्हरमुळे तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा का होते?
विशेष म्हणजे, नायडू यांनी हे देखील निदर्शनास आणून दिले की, हँगओव्हरमुळे स्निग्ध/तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्याची इच्छा होऊ शकते. “पण, आपल्याला माहित आहे की, हे पदार्थ आतडे आणि मेंदूमध्ये दाह निर्माण करतात करतात, ज्यामुळे लक्षणे आणखी वाढू शकतात,” असे ती म्हणाली.
याबाबत स्पष्टीकरण देताना, नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे नोंदणीकृत डाएटीशिअन आणि क्लिनिकल न्युट्रिशनिस्ट उषाकिरण सिसोदिया यांनी सांगितले की,”यकृत, स्वादुपिंड आणि ग्लुकोजच्या नियमनावर मद्यसेवनाचा परिणाम होऊ शकतो आणि ते रक्तातील साखरेची पातळी देखील कमी करु शकते. “या कारणांमुळे, साखर आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थ खाण्याची इच्छा होते, हे हँगओव्हरचे सामान्य परिणाम आहेत,” असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : Ramadan 2023: रमजानमध्ये खजूर खाऊन उपवास का सोडतात? जाणून घ्या त्याचे शास्त्रीय कारण
तळलेले किंवा गोड पदार्थ खाण्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते, नंतर झपाट्याने घटू शकते, आणि तुम्हाला पूर्वीपेक्षा आणखी त्रास होऊ शकतो.
त्यांनी पुढे सांगितले की, “हे पदार्थ आणि ड्रिंक्स व्यक्तींच्या एकूण आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकतात. तळलेल्या पदार्थांच्या ट्रान्स फॅट्समुळे जळजळ, हृदयाच्या समस्या आणि लठ्ठपणा होऊ शकतो. त्याचप्रमाणे, अनियंत्रित साखरेचे सेवन केल्याने साखरेची पातळी अनैसर्गिकपणे वाढू शकते, ज्यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि मधुमेह होऊ शकतो”.