बरेच लोक सकाळी उठल्या उठल्या सर्वात आधी फळांचा रस पितात, कारण दिवस सुरू करण्याचा हा एक आरोग्यदायी मार्ग आहे असा त्यांचा विश्वास असतो. पण, याबाबत द इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना डॉ. लता पाटील यांच्या मते, “उपाशी पोटी फळांचा रस प्यायल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतात.” डॉ. लता पाटील या पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकच्या सामान्य चिकित्सक आहेत.

सामान्य नाश्ता न करता तुम्ही जर फळांचा रस पित असाल तर त्याचा शरीरावर अनपेक्षित परिणाम होऊ शकतो का आणि फळांच्या रसाऐवजी तुम्ही कोणता आरोग्यदायी पर्याय वापरू शकता, याबाबत सविस्तर जाणून घेऊ या.

Can 30 grams of protein within 30 minutes of waking help regulate cortisol and balance hormones
सकाळी उठल्यानंतर ३० मिनिटांत ३० ग्रॅम प्रथिने खाल्ल्याने कॉर्टिसोलचे नियमन आणि हार्मोन्स संतुलन होईल का? तज्ज्ञांनी केला खुलासा
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Neena Gupta says she was not allowed to carry homemade dhaniya powder
Why Spices Are Not Allowed On Flights: घरी बनवलेले मसाले विमान प्रवासात घेऊन जाऊ शकतो का? वाचा, नीना गुप्ता यांचा अनुभव आणि तज्ज्ञांचे मत…
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
Milk paneer or curd Which is healthiest dairy product
दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….
lead in turmeric FSSAI
तुमच्या आहारातील हळद विषारी आहे का? संशोधनात हळदीत आढळून आली ‘या’ हानिकारक धातूची भेसळ
Dr Abhijeet and Dr Gauri Desais research for brown skin in America
… मोहे शाम रंग दई दे
Sweet or savoury breakfast
सकाळच्या नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खावे का? त्याचा आरोग्यावर काय होतो परिणाम? तज्ज्ञांकडून घ्या जाणून…

उपाशीपोटी फळांचा रस पिण्याचे तोटे

  • दातांचे नुकसान : फळांच्या रसाच्या आंबटपणामुळे दातांना मुलामा चढवण्याचा धोका वाढतो. डॉ. पाटील यांनी स्पष्ट केले की, “फळांच्या रसामध्ये असलेले ॲसिड्स दातांचे इनॅमल कमकुवत करतात, ज्यामुळे दांताचे नुकसान होण्याची अधिक शक्यता असते.”
  • रक्तातील साखरेची पातळी कमी-जास्त होणे : रसामध्ये असलेल्या साखरेमुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते आणि त्यानंतर अचानक रक्तातील साखरेची पातळी कमी होऊ शकते, ज्यामुळे तुम्हाला लवकर थकवा येतो आणि भूक लागते.
  • फायबर कमतरता : फळांच्या रसामध्ये फायबर नसतात, जे पचन नियंत्रित करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर वाढण्यास प्रतिबंध करते.

हेही वाचा – अंडे ब्रेडबरोबर खावे की ब्रेडशिवाय? रक्तातील साखर वाढू नये म्हणून अंडे कसे खावे? जाणून घ्या अंडी खाण्याचा उत्तम मार्ग

फळांचा रस केव्हा प्यावा?

फळांचा रस एक परिपूर्ण सकाळचे आरोग्य पेय आहे, हा विश्वास कदाचित फळांच्या रसामध्ये असलेले जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट्सच्या उपस्थितीमुळे उद्भवतो. पण, डॉ. पाटील यासाठी एक चांगला मार्ग सुचवतात: “फळांचा रस पिण्याची योग्य वेळ जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर असू शकते.”

  • योग्य पोषण : जेवणाबरोबर फळांचा रस प्यायल्याने तुम्हाला तुमच्या अन्नातून इतर फायदेशीर पोषक घटकांसह त्यातील जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
  • क्तातील साखरेचे नियमन : अन्न हे फळांच्या रसामध्ये असलेल्या साखरेचे शोषण कमी करू शकते, संभाव्यत: रक्तातील साखर नियंत्रणास मदत करते, विशेषतः मधुमेहासाठी हे फायदेशीर ठरते.
  • तृप्ती मिळते : जेवणाबरोबर फळांचा रस प्यायल्यास जेवणाची चव वाढवू शकते, ज्यामुळे जेवणानंतर तृत्प झाल्याची भावना जाणवते आणि वजन नियंत्रणास मदत होते.
  • आहारातील विविधता : संतुलित आहारामध्ये फळांच्या रसाचा समावेश केल्याने आवश्यक पोषक तत्वांचे सेवन वाढू शकते.

हेही वाचा – उन्हाळ्यात थंडगार बर्फाचे पाणी पीत आहात? आजचं सोडा ही वाईट सवय, तज्ज्ञांनी सांगितले कारण…

उपोशीपोटी फळांच्या रसाऐवजी काय खाऊ शकता?

डॉ. पाटील यांनी सकाळी उठल्यानंतर सर्वात आधीफळांचा रस पिण्याऐवजी काही पर्याय सुचवले आहेत.

  • संपूर्ण फळ: फायबर, जीवनसत्त्वे आणि दीर्घकाळ टिकणाऱ्या ऊर्जेसाठी संपूर्ण फळाचा आनंद घ्या.
  • स्मूदीज: प्रथिने किंवा निरोगी फॅट्स्ने परिपूर्ण संपूर्ण फळे दह्यासह खा.
  • लिंबू पाणी – ताजे लिंबू पाणी उत्तम पर्याय आहे.

तुम्ही फळांचा रस आणि इतर पेये सेवन करताना थोडे सजग राहून तुम्ही त्यांचे फायदे वाढवू शकता आणि संभाव्य हानी कमी करू शकता. निरोगी आणि उत्पादनक्षम दिवसासाठी ऊर्जा आणि आवश्यक पोषक मिळवण्यासाठी फळांच्या रसाऐवजी आरोग्यदायी आहाराचा समावेश असलेल्या संतुलित नाश्त्यावर लक्ष केंद्रित करा.