Home Made Curd In Summer : सध्या उन्हाळा सुरू आहे आणि तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. अशात उन्हाळ्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी आपण थंड पदार्थ आणि विविध थंड पेयांचे सेवन करतो. त्यापैकी सर्वांना आवडणारा पदार्थ म्हणजे दही. तुम्हीही बाजारातून दही खरेदी करता का? पण तुम्हीही घरच्या घरी सोप्या पद्धतीने दही बनवू शकता. या उन्हाळ्यात शरीराला आवश्यक पोषक घटक पुरविणारे दही तुम्ही घरीच बनवू शकता. द इंडियन एक्स्प्रेसने तज्ज्ञांच्या हवाल्याने दह्याचे फायदे सांगितले आहेत.

घरी तयार केलेल्या दह्याचे फायदे

दह्यामध्ये प्रो-बायोटिक्स असतात; जे आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते. जिंदाल नेचरक्योर इन्स्टिट्यूटच्या आहारतज्ज्ञ सुषमा पी. एस. सांगतात, “दही पौष्टिक आणि घट्ट असते. त्यामध्ये असलेले प्रोटिन्स, कॅल्शियम, फॉस्फरस व जीवनसत्त्व ब हे घटक शरीराच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.”

maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Rakul Preet Singh Diet
Rakul Preet Singh Diet : सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत; रकुलने सांगितले डाएटचे सीक्रेट, वाचा, तज्ज्ञ काय सांगतात….
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!
Malai cauliflower recipe Different style recipe of making cauliflower for winter special
रोज काय भाजी करावी सुचत नाही? १ कांदा चिरून करा मलाई फ्लावर; बोटं चाटत रहाल अशी चमचमीत फ्लॉवरची भाजी
Pankaj Tripathi shares recipe for his ‘special’ masala chai
पंकज त्रिपाठी मसाला चहामध्ये टाकतात तमालपत्र! चहामध्ये तमालपत्र घालावे का? तज्ज्ञांकडून जाणून घ्या फायदे

सुषमा यांच्या मते, जर आहारात दह्याचा समावेश केला, तर वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. दह्याच्या सेवनाने हाडे मजबूत होतात. आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते आणि आजार दूर पळतात. दह्याचे अनेक आरोग्यवर्धक गुणधर्म आहेत. आहारात दह्याचा समावेश केल्यामुळे आरोग्यास चांगला फायदा होऊ शकतो.

घरच्या घरी चांगले दही बनविण्यासाठी मास्टर शेफ शिप्रा खन्ना यांनी सांगितलेल्य टिप्स खालीलप्रमाणे :

ताजे दूध वापरा

चांगले दही बनवfण्यासाठी नेहमी ताजे दूध वापरा. अल्ट्रापेस्टुराइज्ड दूध (ultrapasteurised milk) वापरणे टाळा. कारण- असे दूध वापरल्यामुळे दही नीट तयार होत नाही.

स्टार्टर म्हणून थोडे ताजे दही वापरा.

दही बनवfण्यासाठी तुम्ही स्टार्टर म्हणून थोडे ताजे दही वापरू शकता.

योग्य तापमानात ठेवा

दही उष्ण तापमानात ठेवा. ४३ अंश सेल्सिअसवर ठेवू शकता.

स्वच्छ भांडे

दह्यात अतिप्रमाणात जीवाणू निर्माण होऊ नये म्हणून शक्यतो मातीचे भांडे किंवा स्वच्छ भांडे वापरा.

वेळ द्या

तापमानानुसार दही तयार होण्यासाठी ४ ते १२ तास लागू शकतात.

वारंवार तपासणी

उन्हाळ्यात जाड असे मलईदार दही तयार व्हावे साठी दही वारंवार तपासा.

फ्रिजमध्ये ठेवा

एकदा दही तुमच्या इच्छेनुसार तयार झाल्यानंतर आंबवण्याची प्रक्रिया थांबविण्यासाठी आणि दह्याचा ताजेपणा टिकवून ठेवण्यासाठी दही थंड करण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.

स्टार्टर म्हणून थोडे दही बाजूला काढा

घरच्या घरी तयार केलेल्या दह्याचा आस्वाद घेण्यापूर्वी थोडे दही स्टार्टर म्हणून बाजूला काढा. पुढच्या वेळी दही बनविताना तुम्ही या दह्याचा वापर करू शकता.

नवनवीन प्रयोग करून पाहा

दही बनविताना बकरी किंवा मेंढीचे दूध वापरून पाहा. दह्यामध्ये वेगळेपण आणण्यासाठी दही तयार झाल्यानंतर त्यात तुम्ही मध, गूळ व फळे टाकू शकता.