आपण दररोज आपल्याबरोबर घडणाऱ्या पहिल्या गोष्टीबद्दल क्वचितच प्रश्न विचारतो? त्यापैकीच एक म्हणजे आपण झोपेतून कसे उठतो. ही अत्यंत छोटी गोष्ट वाटते; परंतु ही सवय आपला दिवस कसा जाईल हे निश्चित करते म्हणून त्याचे महत्त्व अविश्वसनीय आहे. योग प्रशिक्षक व पर्यायी उपचार तज्ज्ञ अनादी शर्मा सांगतात याबाबत, “बहुतेक लोकांना हे कळत नाही की, ते ज्या आवाजाने जागे होतात तो त्यांच्या मज्जासंस्थेला मिळणारा पहिला संदेश असतो आणि जेव्हा अचानक मोठ्या आवाजाचा अलार्म (गजर) वाजतो तेव्हा आपण घाबरून उठतो.
सकाळचा गजर ऐकून उठण्याऐवजी नैसर्गिक सूर्यप्रकाशामध्ये मदतीने का उठावे?
“गजरच्या आवाजाने दररोज सकाळी शरीराला उठण्यासाठी नाही, तर धक्का देण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्वास घेण्याचे नाही, तर कठीण किंवा नको वाटणाऱ्या गोष्टीसाठी स्वतःला तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. कारण- आता ती एक सामान्य घटना झाली आहे. परंतु, केवळ ही सवय सामान्य झाली आहे याचा अर्थ ते नैसर्गिक आहे, असे होत नाही. म्हणूनच घड्याळाचा नियमित गजर बंद करणे आणि नैसर्गिक सूर्यप्रकाशाच्या मदतीने तुमचा दिवस सुरू करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.
“जर तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे जागे येते तेव्हा शरीरात काय घडते? (What happens to the body if you wake up with sunlight?)
तुम्हाला सूर्यप्रकाशामुळे जाग येणे हे शारीरिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. तुमचे शरीर सूर्यप्रकाशाच्या सौम्य किरणांना प्रतिसाद देण्यासाठी तयार केले गेले आहे. असे केल्याने तुम्ही तुमचे कॉर्टिसॉल रीसेट करता, त्यामुळे तुमच्या पचनक्रियेला आधार मिळतो, मूड संतुलित राहतो आणि वेळेची जाणीवदेखील पुनर्संचयित होते.
जेव्हा सूर्यप्रकाशाऐवजी जेव्हा तुम्ही घड्याळ किंवा मोबाईलचा गजर ऐकून उठता तेव्हा तुम्ही फक्त एक चांगली सकाळच गमावत नाही, तर तुम्ही तुमची शारीरिक लयदेखील गमावता आणि एकदा तुमची लय गमावलीत की, इतर सर्व गोष्टींची भरपाई करावी लागते. याचा परिणाम केवळ तुमची ऊर्जा आणि लक्ष केंद्रित करण्यावरच होत नाही, तर तुम्ही इतरांशी कसा संवाद साधता यावरही होतो.
गजर वाजल्यानंतर तुम्ही तो तात्पुरत्या स्वरूपात बंद करता आणि पुन्हा झोप घेण्याचा प्रयत्न करता. पण, अशी झोप घेणे म्हणजे उशिरा जागे होणे नाही, तर त्यामुळे आपले आंतरिक संतुलन आणि नैसर्गिक लयदेखील बिघडत असते.
आणि जर तुम्ही अलार्म वापरत असाल तर..? (And if you use an alarm..?)
हैदराबाद येथील अपोलो हॉस्पिटल्सचे डॉ. सुधीर कुमार यांनी याबाबत दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती देताना सांगितले की, गजर ऐकून जागे होण्यामुळे रक्तदाब (BP) ७४ टक्के वाढू शकतो. हे प्रमाण गजर न लावता नैसर्गिकरीत्या जागे होणाऱ्यांच्या तुलनेत जास्त आहे, असे ‘UVA स्कूल ऑफ नर्सिंग’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटले आहे.
त्यांनी पुढे, “जागे होण्यापूर्वी सात तासांपेक्षा कमी वेळ झोपणाऱ्यांमध्ये रक्तदाब वाढण्याचे प्रमाण जास्त आहे. रक्तदाब वाढल्याने हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो,” असेही स्पष्ट केले. ज्यांना आधीच हृदय आणि हृदय व रक्तवाहिन्यांसंबंधीच्या समस्या आहेत त्यांच्यामध्ये हा धोका लक्षणीयरीत्या जास्त असतो.
कालांतराने, दररोज एकाच वेळी उठल्याने झोप आणि झोपेतून जागे होणे यांच्यादरम्यान एक सुसंगत दिनचर्या तयार करण्यास मदत होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या शरीराला जागे होण्यासाठी कोणत्याही गजराची आवश्यकता भासणार नाही. “तुमचे शरीर अखेर तुमच्या या दैनंदिन दिनचर्येशी जुळवून घेऊ शकते, ज्यामुळे दिवसाची सुरुवात करताना तुम्हाला उत्साही आणि ताजेतवाने वाटेल,” असे त्यांनी पुढे सांगितले.