बटाटा हा आपल्यापैकी बऱ्याच जणांची आवडती भाजी आहे. समोसा, फ्रेंच फ्राईस, भजी, वडापाव, पराठा अशा अनेक पदार्थांमध्ये बटाटा वापरला जातो; जो या खाद्यपदार्थांची चव आणखी वाढवतो. महत्त्वाच्या प्रसंगी तळलेला असो की उकडलेला; बटाट्यांपासून बनविलेला कोणता ना कोणता पदार्थ हा हमखास असतोच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बटाट्याचा कोणताही पदार्थ करणे तसे सोपे काम आहे. पण, जेव्हा बटाट्याचे कोंब वाढू लागतात तेव्हा ते खाण्यासाठी सुरक्षित आहेत की नाही हे तपासणे महत्त्वाचे आहे. कधी कधी हे बटाट्याचे कोंब आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. म्हणून आपल्याला स्वयंपाकात बटाटे वापरण्यापूर्वी काय करावे ते जाणून घेणे आवश्यक आहे.

स्वयंपाक करताना कोंब आलेले बटाटे का वापरू नयेत याबाबत बेंगळुरूमधील ॲस्टर व्हाईटफिल्ड हॉस्पिटलमधील आहारतज्ज्ञ डॉ. वीणा व्ही. यांनी दी इंडियन एक्स्प्रेसला माहिती दिली आहे.

वीणा यांच्या मते, कोंब आलेल्या बटाट्यांमध्ये दोन हानिकारक घटक असतात: ग्लायकोआल्कलॉइड्स व सोलानाइन; जे मोठ्या प्रमाणात सेवन केल्यास आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. “हे खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते आणि हृदय व मज्जासंस्थेवर परिणाम होऊ शकतो. अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये ते प्राणघातक असू शकते.

हेही वाचा –गर्भवती महिलांना झिका विषाणूचा धोका जास्त? कशी घ्यावी त्यांची काळजी, डॉक्टरांकडून जाणून घ्या…

“जेव्हा बटाट्यांना कोंब फुटायला लागतात, तेव्हा लगेच कोंब आणि मऊ भाग किंवा काळा डागा असलेला भाग काढून टाका; जेणेकरून ते खाण्यासाठी सुरक्षित राहतील,” असेही त्यांनी सांगितले.

बऱ्याच काळापासून कोंब आलेले बटाटे फेकून देण्याचा सल्ला दिला जातो.

आयुर्वेदिक डॉक्टर आणि डिजिटल निर्माते डॉ. वरलक्ष्मी यनमंद्रा म्हणाल्या, “ग्लायकोआल्कलॉइड्सच्या वाढलेल्या पातळीमुळे बटाट्यांची चव कडू होऊ शकते.”

हेही वाचा- हिना खानला स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सर; ब्रेस्ट कॅन्सर तपासणीसाठी किती लवकर जाणे आवश्यक? कोणती चाचणी करावी?

बटाट्याचे कोंब कसे काढावे?

डॉ. वीणा या कोंब हाताने किंवा भाज्या सोलण्याच्या धारदार यंत्राने काढण्याची शिफारस करतात. “बटाटे सोलण्याचे यंत्र प्रभावीपणे कोंबाच्या मुळांना खरवडून काढू शकते. हे स्प्राउट्स काढून टाकल्यानंतर घाण काढून टाकण्यासाठी साल काढलेला बटाटा व्यवस्थित धुणे आवश्यक आहे”, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या, “प्रकाश, उष्णता व आर्द्रता यांसह कोंब वाढण्यास गती देण्याकरिता अनेक घटक कारणीभूत असू शकतात. कोंब फुटणे कमी करण्यासाठी, बटाटे थंड आणि सूर्यप्रकाश नसलेल्या व कोरड्या ठिकाणी ठेवा.”

सफरचंद आणि संत्री यांसारखी फळे बटाट्यांपासून दूर ठेवावीत. कारण- ती फळे इथिलीन वायू सोडतात आणि त्यामुळे बटाट्यांमध्ये कोंब फुटण्याची प्रक्रिया वेगाने होते.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Why you should steer clear of sprouted potatoes know what expert says snk
First published on: 30-06-2024 at 15:40 IST