Sleep in Winter : आपल्यापैकी अनेक जणांना हिवाळा ऋतू आवडतो, कारण हिवाळा हा उष्ण आणि दमट वातावरणापासून आपली सुटका करतो. थंडीच्या दिवसांमध्ये वातावरणात गारवा जाणवतो. हिवाळ्यात आपल्याला अंथरुणावरून उठण्याची इच्छा होत नाही. तुम्ही कधी निरीक्षण केले का, उन्हाळ्याच्या तुलनेत आपण हिवाळ्यात जास्त वेळ झोपतो. असं का? कारण तज्ज्ञांच्या मते, ऋतूनुसार आपल्या झोपण्याच्या सवयी बदलतात. आज आपण त्याविषयीच सविस्तर जाणून घेऊ या.

हैदराबादच्या यशोदा हॉस्पिटल येथील पल्मोनोलॉजी आणि स्लीप मेडिसीनच्या सल्लागार डॉ. विश्वेश्वरन बालासुब्रमण्यम यांनी या विषयी द इंडियन एक्स्प्रेसच्या एका वृत्तात सांगितले, “माणसाच्या झोपेच्या सवयींवर दैनिक प्रक्रियांचा प्रभाव पडतो. आपल्या शरीरात ‘टाईम किपिंग’ म्हणजेच वेळ पाळणाऱ्या पेशी असतात. या क्लॉक पेशी पर्यावरणाशी संक्रमित होतात. तापमान आणि वातावरणात बदल होतो, यास स्वत:ला अनुकूल ठेवण्यासाठी शरीर तसे प्रतिसाद देतात.”
यामुळेच वातावरणात बदल होताच तापमानावर परिणाम होतो आणि आपला झोपेचा कालावधी बदलतो.

Morning dizziness reason
सात-नऊ तासांची झोप पूर्ण होऊनही तुम्हाला सकाळी थकवा जाणवतो?
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
cholesterol range these Six morning habits to lower cholesterol level says cardiologist expert
कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करायची आहे? मग सकाळी उठल्यावर ‘या’ सहा गोष्टी करा, तज्ज्ञ सांगतात…
seven ways to ensure you boost your water intake
Water Intake In Winter Season: हळदीच्या दुधात एक चिमूटभर काळी मिरी घातल्याने काय फायदा होतो? वाचा काय म्हणतात तज्ज्ञ
neck fat be causing breathing problems
तुमच्या मानेच्या चरबीमुळे श्वासोच्छ्वास घेण्यात अडथळे येऊ शकतात? तज्ज्ञ काय सांगतात…
Winter: Tips to Maintain Respiratory Health
हिवाळ्यात श्वास घेण्यास त्रास होतोय? श्वसनाशी संबंधित आरोग्य कसे जपावे? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
रात्री झोपण्यापूर्वी मोबाईलवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम (फोटो सौजन्य @ Freepik)
रात्री झोपण्यापूर्वी मोबाइवर रील्स पाहताय? आरोग्यावर होऊ शकतात गंभीर परिणाम
health benefits of Tilache Laddoos
हिवाळ्यात भरपूर प्रमाणात तिळाचे लाडू का खावेत? वजन कमी करण्यापासून ते रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यापर्यंत तज्ज्ञांनी सांगितले फायदे

यावर फरिदाबाद येथील अमृता हॉस्पिटलच्या मानसोपचार विभागाचे प्रमुख डॉ. विकास गौर सांगतात, “झोपेच्या सवयी या ऋतूनुसार बदलू शकतात. कारण प्रकाश आणि काळोख हे मानवी झोपेच्या चक्राचे नियमन करण्यासाठी महत्त्वाचे घटक आहे. प्रकाशामुळे मेंदूतील प्रमुख भाग उत्तेजित होतो, ज्यामुळे मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहते. पण, जेव्हा दिवस मावळतो तेव्हा या मेलाटोनिन हार्मोन आणि शरीराच्या तापमानाची पातळी वाढते आणि आपले शरीर आपल्याला झोपण्याची वेळ आली, असे सुचवते. सकाळी मेलाटोनिनची पातळी कमी होते, त्यामुळे आपण सकाळी उठतो.”
“उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर हिवाळ्यात रात्र मोठी असते. त्यामुळे याचा परिणाम मेलाटोनिन हार्मोन आणि झोपेच्या सवयीवर होतो”, असेही डॉ. गौर म्हणाले.

हेही वाचा : “मला काही मधुमेह नाही!” ही भूमिका सोडा, मधुमेह स्वीकारा; वजन आणि आहाराकडे द्या लक्ष; वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

तज्ज्ञांच्या मते, “मुळात फक्त प्रकाश आणि काळोखामुळेच झोपेवर परिणाम होत नाही, तर हिवाळ्यातील कमी तापमानसुद्धा झोपण्यास कारणीभूत असतात. उन्हाळ्यात अति उष्णता असते, त्यामुळे झोप येणे कठीण होते. उन्हाळ्याच्या तुलनेत हिवाळ्यात आपला मेंदू जास्त सक्रिय नसतो, ज्यामुळे आपल्या झोपेवर परिणाम होऊ शकतो.”

ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. ज्योती कपूर सांगतात, “हिवाळ्यात अधिक झोप येणे ही सामान्य गोष्ट आहे. हिवाळ्यात दैनंदिन झोपेच्या कालावधीत १.७५ ते २.५ तास अधिक वाढ होऊ शकते.”

डॉ. विकास गौर सांगतात, “खरं तर हिवाळ्यात झोपेचा कालावधी जास्त किंवा कमी होत नाही, पण एखाद्याला हिवाळ्यात जास्त झोपेची गरज भासू शकते; कारण दिवस लहान असतो आणि रात्र मोठी असते. हिवाळ्यात अंथरुणावर दिवसभर पडून राहणे चांगले नाही. कारण यामुळे आपल्या शरीरातील दैनंदिन प्रक्रियांवर आणि मेलाटोनिन हार्मोनवर परिणाम होतो.

हेही वाचा : Weight Loss : सणासुदीत गोड अन् तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे वजन वाढते; दिवाळीनंतर वाढलेले वजन कसे कमी करावे? 

हिवाळ्यात झोपेचे चक्र नियंत्रित ठेवण्यासाठी या खालील टिप्स जाणून घ्या…

  • हिवाळ्यात दिवसा जास्तीत जास्त प्रकाश घेण्याचा प्रयत्न करा.
  • दररोज नियमित १० ते ३० मिनिटे व्यायाम करा, यामुळे तुम्हाला रात्री चांगली झोप येईल.
  • दिवसा झोपू नका.
  • तुमच्या खोलीचे तापमान खूप जास्त थंड किंवा गरम नसावे.
  • हिवाळ्यात अति जास्त जेवण करू नका.
  • गरज भासल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Story img Loader