Will I gain weight if I eat after 7 pm: आजवर वजन कमी करणे, वाढवणे किंवा एकूणच नियंत्रणात ठेवणे या सगळ्यासह फिटनेस राखण्यासाठी विविध टिप्स सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेक टिप्स या सेलिब्रिटी मंडळींच्या माध्यमातून समोर आल्याने आपल्यापैकी अनेकजण त्यावर विश्वासही ठेवतात. अशीच एक टीप म्हणजे तुमच्या जेवणाची विशेषतः तुमच्या रात्रीच्या जेवणाची वेळ काय असावी याबाबत आहे. अनेकांच्या मते संध्याकाळी ७ नंतर काहीही खाल्ल्यास त्याचे पचन होत नाही व यामुळे वजन वाढते. खरंतर हा नियम पाळणे तुमच्यासाठी नुकसानदायक नाही पण अनेकदा घाई गडबडीत, व्यस्थ रुटीनमुळे हे जेवणाचं वेळापत्रक पाळणं शक्य होत नाही. अशावेळी नियमानुसार आपण रात्रीचे जेवण ७ वाजल्यानंतर वर्ज्य केले तर कदाचित झोप लागण्यास अडचण येऊ शकते. या नियमाच्या दोन्ही बाजू काय आहेत व खरंच ७ नंतर जेवल्याने वजन वाढते का हे सगळं काही जाणून घेऊया..

शरीराने सर्काडियन लय पाळावीच.. म्हणजे काय?

मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, दिल्लीच्या पोषण व आहारशास्त्र वैभागाच्या प्रादेशिक प्रमुख रितिका समद्दार यांनी इंडियन एक्सस्प्रेसशी बोलताना रात्रीच्या जेवणाच्या वेळेविषयीच्या नियमाची माहिती दिली आहे. त्या सांगतात की, मानवी शरीराने सर्काडियन लय पाळायला हवी हे खरं आहे. म्हणजे काय तर दिवसाच्या पहिल्या टप्प्यात जेव्हा तुम्ही जास्त काम करता किंवा हालचाल जास्त असते तेव्हा जेवणाचा मोठा भाग रुटीनमध्ये असायला हवा. कारण यामुळे चयापचय होण्यास मदत होते. तसेच रात्रीच्या वेळी म्हणजे जेव्हा तुम्ही फार हालचाल करणार नाहीये किंवा शरीर आराम करणार आहे तेव्हा कमी कॅलरीज असणारे पदार्थ खायला हवे.

What to do when the car is stuck in traffic
ट्रॅफिकमध्ये गाडी अडकल्यावर काय काळजी घ्यावी? ‘या’ सोप्या टिप्सने होईल मदत
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
behavior, offensive, past, someone behavior,
माणसं अशी का वागतात?
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत
Bad sleep Routine can increase heart disease risk losing one hour of sleep takes four days to recover
झोपेचं रुटीन बिघडलंय! फक्त एक तासाची कमी झोप तुमच्या आरोग्यासाठी ठरेल धोक्याची घंटा? तज्ज्ञांनी केला खुलासा
Crime Scene
Crime News : मध्यरात्रीत गळा चिरून पत्नीची हत्या, पण शेजारी झोपलेल्या मैत्रिणीला सुगावाही नाही लागला; पतीच्या कृत्यामुळे खळबळ!

नियम पाळा पण ‘या’ चुका टाळा

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल आणि तुम्ही कॅलरीज मोजून सेवन करत असाल तर त्याचे वाटप दिवसभरात समसमान करायला हवे. जेवणाची वेळ कॅलरी निर्बंधासाठी निकष असते हे मिथ्य आहे. जर तुम्ही दिवसभर उच्च कॅलरीजयुक्त अन्नाचे सेवन केले आणि मग ७ नंतर काहीच खाल्लं नाही तर याचा काहीच उपयोग नाही उलट तुम्ही दिवसभरात मोजून कमी व आरोग्यदायी आहाराचे सेवन करायला हवे.

दुसरी एक चूक अनेकजण करतात ती म्हणजे, संध्याकाळीच शेवटचं जेवायचं असेल तर हे जेवण प्रमाणापेक्षा जास्त आणि उच्च कॅलरीजयुक्त ठेवून चालत नाही. कारण मग त्याचे पचन होण्यासाठी लागणारा वेळ जास्तच असणार आहे. शिवाय जर तुम्ही दिवसभर काही खात नसाल आणि मग आपण एकदाच संध्याकाळी ७ वाजता भरपूर खायचं असं ठरवून चालत असाल तरी दिवसभर उपाशी राहून जेवणाची तीव्र लालसा तयार होते आणि शेवटी खाताना जास्त खाल्लं जातं. त्यामुळे एक साधा नियम म्हणून आपण दिवसभरात ठरवून व समसमान प्रमाणात आहार घ्यायला हवा.

तुम्ही एक नियम मात्र नक्की पाळायला हवा तो म्हणजे जेवणाच्या वेळेत व झोपण्याच्या वेळेत दोन तासाचे अंतर असायला हवे. अनेकांसाठी रात्रीचे जेवण हे रिलॅक्स होण्याचे निमित्त असते म्हणजे जेवायचं आणि नुसतं अंथरुणावर पडायचं असं केल्याने चयापचय मंद होऊ शकते म्हणूनच निदान १५ मिनिटं चालून मग झोपावं. यामुळे पचनाला मदत होतेच शिवाय झोप सुद्धा नीट लागण्यास मदत होते.

लक्षात ठेवा वेळ काहीही असो आपले शरीर अन्नावर समान प्रकारे प्रक्रिया करते. जरी आपण झोपलो, तरीही आपल्याला आपल्या मेंदू आणि अवयवांना कार्य करण्यासाठी इंधन आवश्यक असते जे अन्नातूनच मिळते त्यामुळे रात्रीचे जेवण पूर्ण स्किप करणे हा पर्याय फायद्याचा ठरतोच असे नाही. याउलट पोषणाचे समसमान वाटप आवश्यक आहे.

हे ही वाचा<< तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता

तुम्ही रात्रीचे जेवताना उच्च कॅलरी, उच्च सोडियम किंवा साखरयुक्त पदार्थ आणि प्रक्रिया केलेले फॅट्स टाळा. आपल्या ताटात प्रथिने, भाज्या आणि बाजरीसारख्या जटिल कार्ब्सचा समावेश ठेवा, एवढं केल्याने सुद्धा तुम्ही आहारातील कॅलरीजवर नियंत्रण ठेवू शकता. योग्य पोषण व संतुलित आहार घेतल्याने तुमची भूकही नियंत्रणात राहते.