Best foods for gut health: आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव आपल्यासाठी लाखमोलाचा आहे. आतडे आपल्या एकूण आरोग्यात महत्त्वाची भूमिका बजावते. ते लाखो सूक्ष्मजीवांनी भरलेले आहे, ज्यांना एकत्रितपणे आतड्यातील मायक्रोबायोम म्हणून ओळखले जाते. हे सूक्ष्मजीव योग्य पचन, पोषक घटकांचे शोषण आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच तुमचा आहार आणि या सूक्ष्मजीवांमध्ये निरोगी संबंध राखला जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुमच्या आहारात सुपरफूड्सचा समावेश केल्याने तुमच्या आतड्यातील चांगल्या आणि वाईट जीवाणूंचे संतुलन साधता येते.

सुपरफूड्स म्हणजे नक्की काय?

सुपरफूड्स हे पोषक घटकांनी समृद्ध अन्न आहे, जे तुमच्या आहारातील मायक्रोबायोमची उणीव पुन्हा भरून काढते आणि पचनक्रिया वाढवते. भारतातील पारंपरिक आहारांमध्ये नैसर्गिक सुपरफूड्स भरपूर प्रमाणात असतात, जे आतड्यांना अनुकूल आहाराद्वारे मोठ्या प्रमाणात आधार देतात.

आतड्यांचे आरोग्य सुधारणारे ६ सुपरफूडस

दही

दही हा एक भारतीय पदार्थ आहे आणि त्याचे पचन, थंडावा आणि प्रोबायोटिक फायद्यांसाठी शतकानुशतके सेवन केले जात आहे. पोषण तज्ज्ञ व आहार तज्ज्ञ डॉ. प्रत्यक्षा भारद्वाज म्हणतात, “दही आतड्यांचे आरोग्य चांगले राखते. ते साधे, फळांसह खा किंवा ताक बनवून प्या.”

ताक

ताक, ज्याला छास म्हणूनही ओळखले जाते, ते अन्नाचे पचन करण्यास मदत करते आणि पोट फुगण्याची समस्या कमी करते. डॉ. प्रत्यक्षा भारद्वाज जेवणानंतर एक ग्लास मसालेदार ताक पिण्याची शिफारस करतात. कारण- ते आतड्यांसाठी आश्चर्यकारकपणे काम करते.

मूग डाळ

मूग डाळ हे तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणारे आणखी एक सुपरफूड आहे. ती सहज पचते आणि त्यात फायबरचे प्रमाण जास्त असते. डॉ. प्रत्यक्षा तुमच्या आतड्यांसाठी अनुकूल जीवाणूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्प्राउट्स, खिचडी व डाळ यांसारख्या पाककृतींमध्ये या डाळीचा वापर करण्याचा सल्ला देतात.

आंबवलेले पदार्थ

आंबवलेले पदार्थ आतड्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. प्रोबायोटिक्स नैसर्गिकरीत्या पारंपरिकरीत्या आंबवलेल्ल्या जेवणाला चालना देतात. आतड्यांच्या आरोग्यासाठी नाश्त्यात इडली, कांजी, डोसा खा, असा सल्ला डॉ. प्रत्यक्षा देतात.

आवळा

आवळा हे भारतात एक लोकप्रिय फळ आहे. हे फळ म्हणजे विषाक्त पदार्थ काढून टाकणारे आणि पचनसंस्थेचे एक नैसर्गिक विकसक आहे. कारण- त्यात फायबर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असते. पोषण तज्ज्ञ म्हणतात, “तुम्ही आवळ्याचा रस, मोरावळा किंवा चटणी म्हणून त्याचे सेवन करू शकता.”

तूप

भारतात तूप मोठ्या प्रमाणात वापरले जाते.पोषण तज्ज्ञांचा दावा आहे, “तूप आतड्यांच्या अस्तरांचे पोषण करते आणि पचनास मदत करते”. आतड्यांना अनुकूल पोषण देण्यासाठी, तूप पोळी, भात किंवा डाळीमध्ये एक चमचा मिसळून खाऊ शकता.