दिवाळीत पालक, मुलं, घरातील ज्येष्ठ नागरिक सगळेच तसे रिलॅक्स असतात. सुट्टी असल्याने वेळही असतो. मुलांना सुट्टी असल्याने त्यांच्या हातातही भरपूर वेळ असतो. जर बाहेर कुठे ट्रीपला गेला नाहीत आणि घरीच किंवा कुठल्या नातेवाईकांकडे असाल तर या सगळ्या वेळाचं करायचं काय हा मोठा प्रश्न असतो. हल्ली घरातल्या टीव्हीवर बहुतेक OTTची कनेक्शन्स घेतलेली असतात. शिवाय प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये OTT अॅप्स असतात. त्यामुळे ज्याला जे हवं ते, कधीही आणि कितीही वेळ बघण्याची मुभा असते. मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळे याचा पुरेपूर उपभोग घेत असतात. विशेषतः सुट्टीच्या दिवसात बिंज वॉच केलंच जातं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कामातून ब्रेक मिळाला की, जेवताना, बाथरुममध्ये जिथे जिथे म्हणून जरा मोकळा वेळ मिळतो माणसं चटकन OTT चॅनल्सवर जातात आणि सीरिअल किंवा सिनेमे बघायला सुरुवात करतात. तर काहीवेळा सलग आठ, दहा, बारा तास बघणारेही असतात. OTT प्लॅटफॉर्म्सचं पण व्यसन लागू शकतं हे विसरून चालणार नाही. २०१७ मध्ये बंगळुरूच्या निमहांस संस्थेत पहिली नेटफ्लिक्स ऍडिक्शनची केस नोंदवली गेली होती.

हेही वाचा : Health Special: आवळा खा, आजारांना दूर ठेवा

दिवाळीची सुट्टी आहे, हातात वेळ आणि वेगवेगळे OTT आहेत, म्हणून घरादाराने या नव्या व्यसनाच्या अधीन जाण्याची गरज नाही. आताच्या चार दिवसांच्या सुट्टीत लागणारी सवय पुढे डोकेदुखी होणार नाही हे बघितलंच पाहिजे.

आता समजून घेऊया OTT चॅनल्स किंवा प्लॅटफॉर्म्स म्हणजे काय?

OTT म्हणजे ओव्हर द टॉप. नेटफ्लिक्स, प्राईम, हॉटस्टार, व्हूट, सोनी लिव्ह आणि अशी जी अगणित चॅनल्स आहेत, जी आपल्याला DTH वरुन दिसत नाहीत तर त्यांची ऍप्स डाउनलोड करावी लागतात. काहींचं सब्स्क्रिप्शन विकत घ्यावं लागतं काही मोफत असतात.

‘मॅरेथॉन व्हुईंग’ ते व्यसन

बिंज वॉचला मॅरेथॉन व्ह्यूइंगही म्हणतात. म्हणजे सतत एकापाठोपाठ एक सीरिअल्स आणि सिनेमे बघत बसणं. याचे आपल्यावर शारीरिक, मानसिक परिणाम होतात.

हेही वाचा : Dark chocolate : तुम्हाला डार्क चॉकलेट खायला आवडते? पण ते आरोग्यासाठी चांगले आहे की वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात….

काय परिमाण होतात?

१) पाठ, मान, डोळे यांचा त्रास मागे लागू शकतो.
२) सतत एकाच जागी बसून बघत असल्याने आणि बिंज वॉच करताना अनेकांना खाण्याची सवय असते, त्यामुळे वजन झपाट्याने वाढू शकतं.
३) व्यायाम होत नाही, त्यामुळे अंगदुखी आणि इतर त्रास मागे लागतात.
४) बिंज वॉचमुळे रात्री उशिरा झोपण्याची सवय लागते. जागरणाने डोकेदुखी, पचनाचे आजार, ताजेतवाने न वाटणे, थकवा अशा अनेक गोष्टी मागे लागतात.

हे व्यसन लागू नये म्हणून..

१) बिंज वॉचिंग सिंड्रोममधून बाहेर पडायचं असेल तर एकच उपाय आहे. थोडं थांबा. टेक अ ब्रेक. सलग किती तास आपण OTT प्लॅटफॉर्म्सवर सीरिअल्स आणि सिनेमे बघणार आहोत याचा विचार करून एक नियम करा. वेळेची ही शिस्त काटेकोरपणे पाळा.
२) बिंज वॉचिंगसाठी हातातली महत्वाची कामे आपण बाजूला ठेऊ लागलो आहोत का याकडे लक्ष असू द्या. जर तसं होत असेल तर तो रेड अलर्ट आहे. ताबडतोब बिंज वॉचिंगची वेळ कमी करा.
३) आपल्याला सतत मनोरंजनाची गरज नसते हे लक्षात ठेवा. त्यामुळे व्यायाम, काम, घरकाम, सकस जेवण, व्यवस्थित झोप, पुस्तक वाचन, आवडतं संगीत ऐकणं, मित्रमैत्रिणी, कुटुंबीय यांच्याशी ऑनलाईन /ऑफलाईन जसं शक्य आहे तशा माध्यमातून गप्पा मारणं या गोष्टी चुकूनही बाजूला ठेऊ नका. हे सगळं झाल्यावर काय सीरिअल, सिनेमे बघायचे ते बघा.
४) सीरिअल आणि सिनेमे ज्या त्या OTT चॅनल्सवरुन कुठेही जात नसतात. ते तिथेच असणार आहेत. त्यामुळे आरामात, हळूहळू एकेक करुन बघितलं तरी चालण्यासारखं असतं. घाईघाईने बकाबका सगळं बघून टाकण्याची गरज नसते.

हेही वाचा : विराट कोहलीने फिटनेससाठी घेतलेल्या मोठ्या निर्णयाचं ‘हे’ होतं कारण; तुम्हीही फॉलो करण्याआधी डॉक्टरांचं मत वाचा

दिवाळीत जर तुम्ही बिंज वॉचचा प्लॅन आखणार असाल तर या सगळ्या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. आणि दिवाळीत मजा म्हणून केलेलं बिंज वॉचिंग सवयीत बदलणार नाही हे बघा.

मराठीतील सर्व हेल्थ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Will you do binge watch in diwali you should know this about binge watch hldc css
Show comments